डोळे बोलतात, डोळ्यातून भाव व्यक्त होतात असे वाकप्रचार आपण अनेकदा वापरतो. पण याचा नेमका अर्थ काय तर आपल्या डोळ्यातून आपल्या मनातील भाव व्यक्त होतात. त्यामुळे डोळ्यांची चमक कायम ठेवायची असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या अनेकांचे दिवसभरातील ८ ते १० तासांचे काम हे कॉम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर असते. उरलेला वेळ आपली नजर मोबाईलवर असते. त्यामुळे सातत्याने स्क्रीन डोळ्यासमोर राहिल्याने त्याचा आरोग्याला त्रास होऊ शकतो. यामध्ये डोळे कोरडे पडणे, डोळ्याखाली काळे डाग येणे, डोळ्यांची आग होणे अशा समस्या उद्भवतात. अशावेळी डोळे निस्तेज दिसू लागतात. मात्र डोळ्यांचे सौंदर्य कायम राहावे यासाठी काही किमान उपाय करणे आवश्यक आहे. काय आहेत हे उपाय जाणून घेऊया

१. डोळे छान दिसावेत यासाठी योग्य प्रमाणात झोप आवश्यक असते. किमान आठ तासांची झोप मिळाल्यास आरोग्याच्या अनेक समस्या दूर होणे शक्य होते. त्यामुळे डोळ्याच्या सौंदर्यासाठी पुरेशी झोप गरजेची असते.

Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
2024 Bajaj Pulsar N125
Hero, Honda चा खेळ खल्लास करण्यासाठी बजाज खेळतेय नवा गेम, देशात आणतेय नवी Pulsar, किंमत…
Marriage to a minor girl
पुणे : अल्पवयीन मुलीशी विवाह, मारहाण करून गर्भपात; पतीसह पाचजणांवर गुन्हा

२. व्यायाम हा आरोग्यासाठी उत्तम असतो हे आपण नेहमीच ऐकतो मात्र डोळ्यांचे आरोग्यही योग्य पद्धतीने व्यायाम केल्यास फायदेशीर ठरु शकतो. डोळ्यांना योग्य प्रमाणात रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन पुरवठा व्हावा यासाठी व्यायाम उपयुक्त ठरतो.

३. आहारातील घटक डोळ्यांची चमक टिकविण्यासाठी उपयुक्त ठरतात. जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे आहारातील संतुलित प्रमाण डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते.

४. सातत्याने कॉम्प्युटर किंवा मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांना त्रास होतो. ठराविक कालावधीने अंधुक दिसण्याची समस्या उद्भवते. असे होऊ नये यासाठी विशिष्ट काळाने स्क्रीनवरुन नजर हटविणे गरजेचे असते. जवळपास प्रत्येक २० मिनीटांनी २० सेकंदाचा ब्रेक घ्यावा.

५. सूर्यकिरणांपासून डोळ्यांचे योग्य पद्धतीने संरक्षण करण्यासाठी उन्हात फिरताना चांगल्या दर्जाचा गॉगल वापरणे आवश्यक आहे.

६. आपल्याला डोळ्यांचा कोणताही त्रास होत नसेल तरीही वर्षातून दोनदा न चुकता डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. यामुळे चुकून काही समस्या निर्माण झाल्यास तीचे वेळेत निदान होते आणि उपचार वेळेत सुरु करणे शक्य होते.

७. काम करत असताना ठराविक वेळाने झाडांच्या हिरव्या रंगाकडे पाहणे किंवा आकाशाकडे पाहणे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास निश्चित उपयुक्त ठरु शकते.