शरीरावर कायमस्वरूपाचा टॅटू (गोंदण) काढल्यामुळे विषारी अतिसूक्ष्म घटक शरीरातील लसिका ग्रंथीमध्ये जातात. त्यामुळे आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक प्रणालीला हानी पोहोचते, असा इशारा अभ्यासात देण्यात आला आहे.

लसिका ग्रंथी या मानेभोवती, काखेत, जांघेत आणि शरीराच्या इतर भागात असतात. शरीराच्या संरक्षक अशा रोगप्रतिकारक्षम यंत्रणेत त्या मोलाची भूमिका बजावत असतात. मात्र टॅटू काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईतील विषारी अशुद्धी अतिसूक्ष्म घटकांच्या मार्फत शरीरामध्ये पोहोचते. त्यामुळे लसिका गंथीला हानी पोहोचते, असे संशोधकांनी सांगितले.

Skin care tips jaggery face pack helpful to glowing your skin
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या? गुळाचा करा खास वापर; त्वचा दिसेल तरुण- चमकदार
How to Identify Chemically Injected Watermelon FSSAI Suggestion
कलिंगड सुया टोचून, पावडर घालून पिकवलाय का हे एका झटक्यात ओळखा; ‘या’ खुणा पाहूनच करा खरेदी
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

अगदी कमी प्रमाणात शरीरात गेलेल्या शाईतील अशुद्धी घटकांमुळे त्वचेमध्ये रंगाचे जमा होते. बहुतांश टॅटूंच्या शाईमध्ये सेंद्रिय रंगद्रव्ये असतात. मात्र त्यामध्ये संरक्षण आणि प्रदूषक असणारे निकेल, क्रोमियम, मँगनीझ आणि कोबाल्ट असते.

कार्बन ब्लॅकव्यतिरिक्त टॅटूच्या शाईमध्ये दुसरा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणून टीटॅनियम डाय ऑक्साइड (टीआयओटू) चा वापर करण्यात येतो. तर पांढरे रंगद्रव्य इतर रंगासह काही छटा दाखविण्यासाठी वापरण्यात येते, असे संशोधकांनी सांगितले.

टीआयओटूचा वापर सामान्यपणे अन्नपदार्थ, सनस्क्रीन आणि पेंट्समध्ये करण्यात येतो. जर्मनीतील संशोधकांनी टॅटूच्या शाईबाबतचे धोक्यांबाबतचे संशोधन केले. शाईतील घटक शरीरावरील त्वचेवर असतात. मात्र त्यातील अतिसूक्ष्म घटक लसिका ग्रंथीमध्ये जातात. यामुळे शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, तसेच तिला बाधा निर्माण होण्याची शक्यता असते, असे संशोधकांनी सांगितले. सायन्टिफिक रिपोर्ट या नियतकालिकामध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.