आपण कोणताही पदार्थ खातो तेव्हा फक्त त्याची चव कशी लागते यावर लक्ष देतो. मात्र कोणते पदार्थ एकमेकांबरोबर खायचे याबाबत आपल्याला फारशी माहिती नसते. काही पदार्थ एकमेकांसोबत खाल्ल्यास ते आरोग्यास हानिकारक ठरु शकते. परंतु बऱ्याचदा काही पदार्थात असे घटक असतात की त्यांच्यामुळे दुसऱ्या पदार्थातील घटक नीट काम करू शकत नाहीत. याउलट अन्नपदार्थातील जीवनसत्वे आणि खनिजे अन्नामधून रक्तात मिसळण्यासाठी इतर काही घटकांची आवश्यकता असते. त्या वेळी ते दोन पदार्थ एकमेकांबरोबर खाणे गरजेचे असते. म्हणून कशाबरोबर काय खायचं किंवा खायचे नाही हे माहित असेल तर त्या अन्नाचा शरीराला फायदा होतो. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत जाणून घेऊया.

१. घाईच्या वेळी किंवा एरव्हीही चहा पोळी हा नाश्ता अनेकदा आवडीने केला जातो परंतु हे दोन पदार्थ सोबत खाणे अतिशय चुकीचे आहे. कारण चहामधील अॅसिड पोळीमधील सत्व रक्तात मिसळू देत नाही.
कोणत्याही नाश्त्यानंतर किंवा खाण्याबरोबर चहा घेऊ नये.

२. रिकाम्या पोटी चहा घेऊ नये

३. फळांबरोबर चहा घेऊ नये.

४. पालकाची भाजी, मसूराची उसळ याबरोबर लिंबू घ्यावे.

५. कोणत्याही पदार्थावर लिंबू पिळताना तो शिजत असताना पिळू नये त्याने त्यातील जीवनसत्त्वे नष्ट होतात. तो पदार्थ खायला घेतल्यानंतर त्यावर लिंबू पिळावे. पोहे खाताना आवर्जून लिंबू पिळावे त्यांनी पोह्यांची पौष्टिकता वाढते.

६. कोणत्याही खाण्याबरोबर सोडा अजिबात पिऊ नये.

७. पित्तशामक औषधे अति वापरल्याने कॅल्शियमचे अभीशोषण कमी होते व शरीरात कॅल्शियमची कमतरता भासू लागते. म्हणून या औषधांचा सतत व अति वापर टाळावा.

८. आंबट फळे व दुध यांचा एकत्र वापर टाळावा.

९. दुध व मीठ यांचा एकत्र वापर टाळावा.

१०. धान्ये व कडधान्ये यांच्या एकत्र वापरण्याने त्यांची पौष्टिकता वाढते.

श्रुती देशपांडे, आहारतज्ज्ञ