दिवाळीत खूप गोडधोड खाणं होतं. घरातला फराळ त्याव्यतिरिक्त पाहुण्यांनी आणलेली मिठाई, चॉकलेट् यांसारखे पदार्थ खाणं आलंच. वर्षभर आपण गोड पदार्थांकडे पाठ फिरवली तरी दिवाळीच्या पाच दिवसात डाएटचा प्लान पूर्णपणे फिस्कटतो. याकाळात कॅलरिज्, मधुमेह अशा छोट्या मोठ्या तक्रारीकडे काहीसा कानाडोळा करून सर्रास पदार्थांवर ताव मारला जातो, पण हा अतिरेक करण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. कारण अतिप्रमाणात गोड पदार्थांचे सेवन आरोग्याला हानिकारक ठरू शकतं.

नंबर बदलला, चिंता नको! व्हॉट्स अॅपचे हे नवे फिचर ठरणार फायदेशीर

– दिवाळीच्या काळात मिठाई हमखास काही दिवस फ्रिजमध्ये ठेवली जाते. अनेक मिठाईचे पदार्थ हे दुग्धजन्य पदार्थांपासून तयार केले जातात, त्यामुळे ते लवकर खराब होतात. अशावेळी मिठाई २४ तासांच्यावर ठेवू नका कारण खूप दिवस ठेवलेली मिठाई खाल्ल्याने फूड इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. हल्ली मिठाईच्या बॉक्सवरदेखील अशा सूचना दिल्या असतात. त्यामुळे ठराविक काळापेक्षा अधिक काळ मिठाई साठवून ठेवू नका.
– रिकाम्या पोटी कधीही गोड पदार्थ खाऊ नका.
– लहानमुलांना देखील रिकाम्या पोटी गोड पदार्थ देऊ नका, यामुळे जंताचा त्रास होतो.
– रात्री झोपण्यापूर्वी गोड पदार्थ खाऊ नका, यामुळे कॅलरीज वाढतात पण त्याचबरोबर रक्तातील साखरेचं प्रमाणही वाढतं.
– जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याऐवजी जेवणासोबत ते खाल्ले तर अधिक फायदेशीर ठरेल.

‘अशी’ ओळखा मिठाईतील भेसळ