हल्ली सेल्फी काढणे हे जणू कामच होऊन बसलंय. याहूनही महत्त्वाचे म्हणजे हा एक ट्रेंड झाला आहे. ज्यांना स्वतःचे खूप सारे फोटो काढण्याची आवड असते त्यांच्यासाठी मोबाईलमधली सेल्फी मोड म्हणजे पर्वणीच. अनेकांना यातही बहुतांश मुलींना फोटो काढण्याचे जणू वेडच असते. या सारखे फोटो काढणाऱ्या व्यक्तींवर मात्र त्यांच्यासोबतचे लोक फारच वैतागतात. पण सेल्फी आल्याने त्यांचा हा वैतागही संपला.

त्यामुळे सेल्फी हे प्रकरण आता काही फारसे नवे राहीले नाही. बाजारातील अनेक कंपन्यांनी उत्तम सेल्फी काढता येतील असे नवनवीन फोनही आणले. त्यामुळे सेल्फीवेड्या लोकांचे काम आणखीच सोपे झाले. याशिवाय अशीही काही अप्लिकेशन्स आहेत ज्यामुळे तुमचे हे सेल्फी आणखी वेगळे आणि खास बनू शकतात. कोणती आहेत ही अॅप्स जाणून घेऊया…

B 612 सेल्फी अॅप

या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला सेल्फीचे वेगवेगळ इफेक्ट मिळू शकणार आहेत. आता हे स्पेशल इफेक्टस आपल्याला चेहऱ्यावर आणि चेहऱ्याच्या बाजूलाही दिसू शकतील. या दोन्ही इफेक्टचा एकत्रित वापरही आपल्याला करता येऊ शकतो. जर तुम्हाला तुमचा सेल्फी साधा हवा असेल तर नॅचरल इफेक्ट देणारे काही पर्यायही या अॅप्लिकेशनमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये ऑटोसेव्हचा पर्याय देण्यात आल्याने तुम्ही काढलेला फोटो डिलीट होण्याची शक्यता नाही. यामध्ये काही कोलाजचे पर्यायही आहेत ज्यामुळे वेगवेगळे फोटो काढून त्याचे छान एखादे कोलाज तुम्ही बनवू शकता.

यूकॅम फन

या अॅपमुळे आपल्या फोटोंमध्ये आणि व्हिडिओमध्ये काही रिअलटाईम इफेक्ट देण्यासाठी हे अॅप्लिकेशन अतिशय उपयुक्त आहे. आपण वेगवेगळ्या लोकांच्या भूमिकेत जाऊ शकता. यात परी, शेफ, मॉडेल, चेटकीण अशा रुपात दिसू शकता. आपल्या मित्रमंडळींवर या फिल्टर्सचा वापर करुन तुम्ही त्यांना आश्चर्यचकित करु शकता. सेल्फी ऑप्शनचा वापर करुन १५ सेकांदांचा व्हिडिओ काढू शकता. त्यानंतर रिटेक, सेव्ह आणि शेअर असे तीन पर्याय यामध्ये दिलेले आहेत. याशिवाय पारंपरिक सेल्फी एडीटींग टूल्सही या अॅपमध्ये देण्यात आलेले आहेत.

स्वीट सेल्फी

या अॅपमुळे आपण चमकते तारे, अंगावर पडणारा बर्फ, गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव असे अतिशय अप्रतिम इफेक्टस देऊ शकता. पाठीमागची डिझाईन बदलणे आणि सेल्फींचा अतिशय आकर्षक असा कोलाज तयार करणेही यातून अगदी सहज जमू शकते. सेल्फी काढल्यानंतरही त्यामध्ये एडिटींग करण्याची सुविधा या अॅपमध्ये देण्यात आली आहे. यात तुम्ही डोळ्याखालील काळी वर्तुळे, केसांच्या पुढे आलेल्या बटा या गोष्टी एडीट करु शकता.