आपण दीर्घायुषी जगावं असं जन्माला आलेल्या जवळपास प्रत्येकाला वाटत असते. मात्र कोणीच अमरत्व घेऊन येत नाही. त्यामुळे जन्माला आलेल्या प्रत्येकाला कधी ना कधी मृत्यूला सामोरे जावेच लागते. तुमच्या दिनचर्येतील काही गोष्टींमध्ये थोडेसे बदल केल्यास तुम्हाला दीर्घायुष्य मिळू शकते. मात्र त्यासाठी काही सवयी बदलणे आवश्यक असते. पाहूयात कोणत्या सवयींमुळे तुम्हाला दीर्घायुष्य मिळू शकते.

जास्तीचे खाऊ नका

medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
5 home remedies to get rid from mosquitoes how to get rid from mosquito home
डासांच्या उच्छादामुळे रात्री झोपणंही कठीण? मग किचनमधील ‘या’ ५ गोष्टींचा करा वापर, डास होतील गायब
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 
Personality Traits
तुमची जन्मतारीख ३, १२, २१ किंवा ३० आहे का? जाणून घ्या, कसा असतो अशा लोकांचा स्वभाव…

तुमच्या शरीराला आवश्यक तेवढेच अन्न खा. एकावेळी जितकी भूक आहे तितकेच खाल्लेले चांगले. तुम्हाला १०० वर्षे जगायचे असेल. जपानी लोक आपले पोट ८० टक्के भरल्यानंतर खाणे थांबवायचे असे एका अभ्यासकाने म्हटले आहे. याबरोबरच सेंट लुईस विद्यापीठातील संशोधकांनीही कमी खाल्ल्यामुळे दीर्घायुष्य मिळत असल्याचे संशोधन केले आहे. कमी खाल्ल्यामुळे तुमचे वय वाढत असल्याचे लवकर दिसत नाही. त्यामुळे तुम्ही दिर्घकाळ तरुण दिसता असेही या अभ्यासात म्हणण्यात आले आहे.

टीव्ही काही काळ बंद ठेवा

दिवसातील जास्त काळ टिव्हीसमोर बसणे आरोग्याच्यादृष्टीने धोक्याचे असते. त्यामुळे दिवसातील ठराविक वेळ टीव्ही बंद ठेवणे आवश्यक आहे. अनेकांना दिवसातील बराच वेळ टीव्ही पाहण्याची सवय असते. मात्र ही सवय तुमचे आयुष्य कमी होण्यासाठी धोक्याची असते. दिवसातील ४ तासांहून जास्त काळ टीव्ही पाहणाऱ्या लोकांचे आयुष्य कमी होते असेही काही संशोधनातून समोर आले आहे.

सतत उन्हात वावरु नका

ज्या लोकांना खूप वेळ उन्हात काम असते अशा लोकांचे आयुष्य कमी होते असे म्हणतात. प्रखर उन्हाचा त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. यामुळे त्वचेला तर त्रास होतोच पण इतरही अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे खूप वेळ प्रखर उन्हात थांबणे टाळा.

लोकांमध्ये मिळून मिसळून राहा

हृदयरोग ही सध्या अतिशय सामान्य समस्या झाली आहे. हृदयाला कार्यक्षम आणि चांगले ठेवायचे असल्यास तुम्ही समाजात मिळून मिसळून राहणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही मित्रमंडळींमध्ये वेळ घालवणे आणि मजामस्ती करणेही तितकेच आवश्यक असते. एकटेपणा हा हृदयासाठी धोकादायक असतो.

आहारात भाज्या आणि फळांचा समावेश ठेवा

भाज्या आणि फळे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. त्यामुळे त्यांचा आहारात समावेश कऱणे अत्यावश्यक आहे. भाज्यांमध्येही पालेभाज्या, सलाड आणि इतरही सगळ्या भाज्यांचा समावेश असावा. हृदयरोगापासून दूर राहायचे असल्यास भाज्या आणि फळे अतिशय उपयुक्त ठरतात.

फिटनेसकडे लक्ष द्या

नियमित व्यायाम हा उत्तम आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतो. व्यायामाने शरीर फीट राहण्यास मदत होते. त्यामुळे दीर्घायुष्य मिळण्यास मदत होते.