आपण एखादी नवीन बॅग, पाण्याची बाटली किंवा नवीन शूज विकत घेतले की त्यासोबत आपल्याला ही छोटीशी पुडी किंवा पॉकेट मिळतेच. बरं त्यात नेमकं काय असतं? आणि याचा उपयोग तरी काय हेच आपल्याला अनेकदा कळत नाही. ‘ही छोटीशी पुडी फाडू नका’ किंवा ‘ती लहान मुलांच्या हातात देऊ नका’ अशा सूचनाही त्यावर लिहिलेल्या असतात. या पुडीत शेकडो छोटे छोटे पारदर्शक दाणे असतात. ही पुडी आपण निरुपयोगी म्हणून फेकून देतो. पण ती निरुपयोगी नसून खूपच उपयोगी वस्तू आहे. तिला सिलिका जेल पॉकेट असंही म्हणतात.

– जर तुमच्या मोबाईलमध्ये पाणी गेलं असेल तर सिलिका जेल पॉकेट त्यावर ठेवावं. सिलिका बॉल्स आर्द्रता शोषून घेतात. त्यामुळे रिमोट किंवा मोबाईलमध्ये पाणी गेलं असेल तर हे पाणी लगेच निघून जातं.
– तुमच्या जीम बॅगमध्येही तुम्ही सिलिका जेल पॉकेट ठेवू शकता. जीम बॅगमध्ये घामाचे टी-शर्ट, टॉवेल असतात, त्यामुळे बॅगेला कुबट वास येतो. ही दुर्गंधी घालवण्यासाठी तुम्ही बॅगमध्ये सिलिका जेल पॉकेट आवर्जून ठेवा.
– शूजमधली दुर्गंधी दूर करण्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता.
– पावसाच्या दिवसात अनेकदा बॅग भिजते, दमट हवामानामुळे ती नीट सुकत नाही. अशावेळी बॅगमध्ये सिलिका जेल पॉकेट ठेवावं. ओलाव्यामुळे येणारी दुर्गंधी निघून जाते.
– तुमच्या फोटो बुक किंवा फोटो अल्बमच्या बॅगमध्येही तुम्ही हे छोटे पॉकेट आवर्जून ठेवा. वर्षभरानंतर अल्बमवर दमट हवेमुळे बुरशी चढते. अल्बमची पानं एकमेकांना चिकटतात. अल्बमचं मोठं नुकसान होतं तेव्हा अल्बम दीर्घकाळ टिकवण्यासाठी तुम्ही याचा वापर करु शकता.
– पुस्तकं जुनी झाली की त्यांना देखील कुबट वास येऊ लागतो. तेव्हा तुमच्या पुस्तकाच्या कपाटात हे पॉकेट ठेवणं जास्त फायदेशीर ठरतं

viral video of rainbow panipuri
हळदीच्या पुऱ्या, पालकाचे पाणी… पाहा ‘रेनबो पाणीपुरी’चा व्हायरल Video!; नेटकरी म्हणतात, “नको…”
What happens to your body if you use expired makeup repeatedly is it harmful to use expired cosmetics products
एक्सपायर्ड मेकअप प्रोडक्ट्स वारंवार वापरल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होतात? डॉक्टर सांगतात…
Money mantra Finance What is Ponzi Scheme
Money mantra: वित्तरंजन:‘पॉन्झी’ म्हणजे काय (कोण) रे, भाऊ? (भाग १)
How to use urad or black gram in food in cold weather
Health Special: थंडीत उडदाचा वापर जेवणात कसा करावा?