आपली कंबर सडपातळ हवी असे प्रत्येक स्त्रीला वाटत असते. तर पोटाचा वाढणारा घेर कमी करण्यासाठी पुरुषही अनेक उपाय आजमावून पाहत असतात. परंतु, विविध कारणांनी वाढणारा हा कंबरेचा आणि पोटाचा घेर काही केल्या कमी होत नाही. मग जीम लावा, नाहीतर डाएट करा, असे पर्याय महिला स्वीकारताना दिसतात. मात्र, त्यानेही म्हणावा तितका फरक पडतोच असे नाही. त्यातही जीममधील व्यायाम करण्याचे काही नियम असतात. पण योगामध्येही या समस्येवर अतिशय चांगला असा उपाय आहे. नियमित महावीरासन केल्यास त्याचा कंबर सडपातळ होण्यासाठी चांगला फायदा होतो. इतकेच नाही तर लहान मुलांची उंची वाढण्यासाठीही हे आसन अतिशय उपयुक्त असते.

दंडस्थितीतील या आसनात शरीराची अवस्था वीर हनुमानाप्रमाणे होते म्हणूनच याला महावीरासन म्हटले जाते. हे करायला अतिशय सोपे आहे. प्रथम दंड स्थितीत उभे रहावे, भरपूर श्वास घ्यावा, मग श्वास रोखून डावा किंवा उजवा पाय जेवढा जास्ती जास्त लांब टाकता येईल तेवढा टाकावा. साधारण तीन फूट पुढे नेला तरी चालेल. कंबरेतून खाली जावे. पुढे नेलेला पाय काटकोनात राहील असे पहावे. मग दोन्ही हातांच्या मुठी बंद कराव्या आणि हात कोपरामध्ये दुमडून वर हवेत न्यावेत. हात बाहेरच्या बाजूला स्ट्रेच करावेत.  हे आसन एकदा डावा पाय पुढे घेऊन आणि एकदा उजवा पाय पुढे घेऊन करावे. आसन सोडताना सावकाश श्वास सोडावा, हळूहळू पुढे घेतलेला पाय मागे घ्यावा. हे आसन भरभर केल्यास त्याचे जास्त फायदे होतात.

IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
How to Identify Chemically Injected Watermelon FSSAI Suggestion
कलिंगड सुया टोचून, पावडर घालून पिकवलाय का हे एका झटक्यात ओळखा; ‘या’ खुणा पाहूनच करा खरेदी
Use coco peat to flower your home garden
घरातील बाग फुलवण्यासाठी वापरा कोकोपीट, घरच्या घरी कसे तयार करावे कोकोपीट
Why HbA1c test important for diabetes diagnosis Who should do it and how consistently
विश्लेषण : HbA1c चाचणी मधुमेह निदानासाठी महत्त्वाची का आहे? ती कुणी आणि किती सातत्याने करावी?

या आसनामुळे उंची वाढायला मदत होते. हात पाय बळकट होतात. पोट साफ आणि हलके होते. छाती भरदार होते. शरीर तेजस्वी आणि मजबूत बनते. महावीरासनामुळे कंबरेला ताण बसतो आणि कंबरेभोवतीचे सर्व स्नायू लवचिक होतात. त्यांची कार्यक्षमता वाढते. आपली प्रकृती उत्तम राखण्यासाठी महावीरासन नियमित करावे. यामुळे पोटाचे विकार बरे होते. मासिक पाळीतील आरोग्य सुधारते. हाता-पायातील रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होऊन हाता-पायांची हाडे मजबूत होतात. हे आसन करायला सोपे असल्याने त्याचा कालावधी हवा तेवढा ठेवता येतो. हाताच्या पंजांच्या मुठी आवळल्यामुळे बोटांचे कार्य सुधारते. तेथील स्नायू आणि हाडांना बळकटी येते. आसनस्थिती घेतल्यानंतर श्वास घेऊ नये आणि सोडूही नये म्हणजेच श्वास रोखून कुंभक करावे. आसन सोडताना श्वास सोडत नेहमीचे संथ श्वसन करावे. हे आसन करताना मागचा पाय थोडासा उचलला जातो.