22 October 2017

News Flash

एक रुपयात मिळणार शिओमीचा Mi फोन; जाणून घ्या कसा, कधी आणि कुठे?

ग्राहकांना खरेदीची अनोखी संधी

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 4, 2017 11:38 AM

भारतीय सणवार म्हणजे खरेदीचे विशेष कारण. दसरा-दिवाळीच्या निमित्ताने अशाप्रकाच्या ऑफर्सना अक्षरशः उधाण येते. शिओमी या सध्या मोबाईलच्या गाजणाऱ्या कंपनीने नुकतीच आपली दिवाळी स्पेशल ऑफर जाहीर केली आहे. यामध्ये ग्राहकांना एमआयचे फोन अतिषय आकर्षक किंमतीत मिळू शकतील. ‘Diwali with Mi’ असे या बंपर सेलचे नाव असून यामध्ये ग्राहकांना अतिशय आकर्षक अशा ऑफर्स मिळणार आहेत. तीन दिवस ऑनलाइन असणारा हा सेल २७ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत सुरु राहणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये एक अनोखी ऑफर देण्यात आली आहे. ज्यात ग्राहकांना १ रुपयांत फोन खरेदी करता येणार आहे. ही ऑफर एमआयची मेंबरशीप असणाऱ्यांसाठी ऑफर असेल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत ग्राहकांना mi.com या वेबसाईटवर फोनची खरेदी करता येणार आहे. यातील १ रुपयांत फोन मिळण्याची फ्लॅश ऑफर ११ ते ५ वाजेपर्यंत असेल असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. मात्र फ्लॅश सेलसाठी कंपनीने काही अटी लागू केल्या आहेत. हे फोन मर्यादित उपलब्ध असल्याने ‘फर्स्ट कम फर्स्ट बेसिस’वर या ऑफरचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. जर या फ्लॅश ऑफरमधून तुम्हाला १ रुपयात फोन उपलब्ध झाला तर त्या ग्राहकाचे नाव वेबसाईटवर दिले जाणार आहे.

मोबाईल फोनशिवाय एमआयच्या इतर अॅक्सेसरीजही वेबसाईटवर ग्राहकांना सवलतीत मिळू शकतील. दिवाळी फ्लॅश सेलमध्ये रेडमी ४, एमआय राऊटर ३ सी, एमआय ब्लूटूथ मिनी स्पिकर, रेडमी ४ ए, एमआय बँड एचआरएक्स एडिशन, एमआय कप्सूल इयरफोन्स, एमआय वायफाय रिपीटर, एमआय वायफाय, एमआय व्हीआर प्ले इत्यादी उपलब्ध होणार आहे. नुकताच कंपनीने ४८ तासांत आपले १० लाखहून अधिक मोबाईल विकले गेल्याचा दावा केला होता. त्यानंतर आलेला हा सेल कंपनीच्या विक्रिमध्ये विक्रमी वाढ करेल असे म्हणता येईल.

First Published on October 4, 2017 11:30 am

Web Title: xiaomi diwali exciting offers with mi grand sale