एकेकाळी बाईकच्या कंपन्यांमध्ये सर्वात आघाडीवर असणारी बाईक कंपनी कोणती असे कोणी विचारले तर यामाहा असे आपण अगदी सहज सांगतो. याच यामाहा गाडीचे कस्टमायझेशन करण्यात आले असून नवीन कस्टमाईझ बाईक बाजारात दाखल झाली आहे. यामाहा आरडी ३५० ही मागच्या पिढीतील पॉवरफुल गाडी मानली जायची. या गाडीने भारतीय बाईकप्रेमींना अक्षरशः वेड लावले होते. एका कस्टमायझेशन कंपनीने या गाडीला असा काही नवा लूक दिला आहे की तुम्ही पाहताच या गाडीच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल. मोटोएग्जॉटिका इंडिया या कंपनीने या बाईकला अतिशय युनिक असा लूक दिला आहे. या बाईकची डिझाईन आणि इंजिन यामुळे हा वेगळा लूक देणे शक्य झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. मात्र इतक्या सगळ्या सुविधा आणि उत्तम लूक असणारी ही गाडी ऑन रोड किती रुपयांना मिळेल याबाबत अद्याप काही स्पष्ट करण्यात आलेले नाही.

व्हॉटसअॅपची ‘ही’ नवीन फीचर्स माहितीयेत?

Buying a house on the occasion of Gudi Padwa 2024
गुढीपाडव्यानिमित्त खरेदीचा उत्साह; घरखरेदीची कोट्यवधींची गुढी, वाहनांची आगावू नोंदणी, सराफा बाजारात गर्दी
mumbai petrol pump crime marathi news, petrol pump employee dragged by car marathi news
पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मोटरीसोबत फरफटत नेले
market is loaded with cakes candies chocolates for Easter festival
ईस्टर सणासाठी बाजारात केक, कॅन्डी, चॉकलेटची रेलचेल
Navi Mumbai
नवी मुंबई : विदेशी सफरचंद बाजारात दाखल, जाणून घ्या दर

ही कस्टमाईज करण्यात आलेली बाईक यामाहा एससीआर९५० सारखी दिसत आहे. या गाडीची लाल आणि पांढरी रंगसंगती लक्ष वेधून घेणारी आहे. यासोबतच बाईकमध्ये असणारे काळ्या रंगाचे स्पोक व्हीलमुळे या गाडीला चांगला लूक येत आहे. गाडीला कस्टमाईझ करणाऱ्या कंपनीने जुन्या मॉडेलमध्ये असणारा प्रत्येक अनावश्यक भाग काढून टाकला आहे. चाकांचा आकारही मोठा आहे ज्यामुळे चांगला रस्ता नसलेल्या ठिकाणी काही अडचण येणार नाही असा दावा करण्यात आला आहे. पुढच्या चाकासाठी मोठा डिस्क ब्रेकही देण्यात आला असून मागच्या चाकातही हा डिस्कब्रेक दिला आहे. त्यामुळे तुम्ही नवीन बाईक घेण्याचा विचार करत असाल तर या बाईकचा नक्की विचार करु शकता.