निरोगी राहण्यासाठी मानवाने योगसाधना करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांपासून ते आयुर्वेदापर्यंत सर्वांचे सांगणे आहे. परंतु, श्वानालादेखील योगसाधनेचे सहाय्य घेणे गरजेचे आहे का? प्राण्यांसाठी योगसाधना आवश्यक असल्याचे कुठेही लिहिलेले आढळून येत नसले, तरी एका श्वानास योगसाधनेची सवय जडल्याचे पाहायला मिळते. त्याच्या योगसाधनेसाठी घड्याळात अलार्म लावण्यात येतो. अलार्म वाजल्याक्षणी योगसाधनची वेळ झाल्याचे त्याला समजते. धावत जाऊन तो मॅट घेऊन येतो आणि योगसाधना करण्यास सुरुवात करतो. व्हिडिओ पाहा -