दिवसभर विविध प्रकारची कामे करायची असतील तर आपल्या हातापायाचे स्नायू बळकट असणे आवश्यक असते. नमस्कारासन हात आणि पायांच्या बळकटीसाठी अतिशय उपयुक्त असे दंडस्थितीतील आसन आहे. हे आसन करताना दोन्ही हात छातीच्या खोबणीपाशी घ्यावेत. हातांची नमस्कार स्थिती करावी. श्वास घेत टाचा वर उचलत ही स्थिती करावी. काही वेळ श्वास रोखून धरावा. या दरम्यान डोळे मिटलेले असावेत. श्वास जितका रोखता येईल तितका रोखावा. नंतर श्वास सोडत आसन सोडत टाचा जमिनीला टेकवाव्यात व शेवटी हातांची नमस्कार स्थिती सोडावी. हे आसन नमस्कारासन म्हणून परिचित आहे.

यामध्ये श्वास घेत आपण छाती वर उचलतो म्हणजेच छातीत पूर्णपणे श्वास भरून घेतो व थोडा वेळ रोखून मग हळूहळू श्वास सोडत आसनस्थिती सोडतो. टाचा उचलल्यामुळे पोटऱ्यांना व गुडघ्यांना चांगला व्यायाम मिळतो. खांदे, दंड बळकट होतात. हात कोपरात दुमडून आपण नमस्कार स्थिती घेतल्याने खांदे व दंड यांना योग्य तो व्यायाम मिळतो. श्वास रोखल्यामुळे व दीर्घ श्वसन केल्यामुळे हृदय मजबूत व्हायला मदत होते. हे आसन बराच वेळ टिकवता येते. डोळे मिटून या आसनाशी एकरूप व्हावे.

Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
summer vacation at home
उन्हाळ्याच्या सुट्टीतलं घर
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
How To Avoid White Clothes Getting Stain Of Color Dresses
Video: कपडे धुताना ‘हा’ पांढरा खडा वापरून वाचवा पैसे; बादलीत एका कपड्याचा रंग दुसऱ्याला लागणारच नाही

आसन सुरुवातीला १५ सेकंद टिकवावे मग हळूहळू कालावधी वाढवता येतो. सूर्यनमस्काराच्या आसनांच्या साखळीतील हे प्रथम आसन आहे जे आपल्या शरीराला, हातापायांना बळकटी तर देतेच शिवाय शरीरसौष्ठत्व व सौंदर्य प्राप्त करून देते म्हणून हे आसन नियमित करावे. सकाळच्या कोवळ्या उन्हात स्वच्छ मनाने रोज मोकळ्या जागेत सूर्योदयाच्या वेळी सूर्यास वंदन करून हे आसन करावे. या आसनाने शरीराला एक वेगळेच सौंदर्य प्राप्त होते तसेच यामुळे शारीरिक, बौध्दिक विकास होतो. शरीराची चपळाई वाढते. आंतरेंद्रीय व स्नायू बलवान होतात.

सुजाता गानू-टिकेकर, योगतज्ज्ञ