गेल्या वर्षी भारतात काम करणाऱ्या जीवशास्त्रज्ञांना प्राण्यांच्या एकूण १७६ नवीन प्रजाती सापडल्या आहेत, असे भारतीय प्राणिशास्त्र सर्वेक्षण संस्थेने म्हटले आहे. संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की आमची संस्था केंद्रीय पर्यावरण खात्याअंतर्गत काम करते. गेल्या वर्षी प्राण्यांच्या १७६ प्रजाती सापडल्या असून त्यांची माहिती तसेच वर्णन सादर करण्यात आले आहे.
कीटकांच्या प्रजाती सापडणे अवघड असते पण आता त्यांच्या १९ नवीन प्रजाती सापडल्या आहेत. यादीत माशांच्या २३, उभयचरांच्या २४ (बेडूक, टोळ), सरीसृप प्राण्यांच्या दोन, कोळ्यांच्या १२, खेकडे व  कोळंबीच्या (कठीण कवचाचे जलचर प्राणी) १२ प्रजाती आढळून आल्या आहेत. भारतीय प्राणिशास्त्र सर्वेक्षण संस्थेच्या वैज्ञानिकांनी या प्रजाती शोधून काढल्या आहेत. संस्थेचे संचालक डॉ. के. व्यंकटरामन यांनी सांगितले, की ज्या प्रजाती आम्ही शोधल्या आहेत त्या फार लहान भूभागात अस्तित्वात आहेत. त्यामुळे त्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत कारण त्यांचा अधिवास नष्ट होत आहे. पूर्व घाट, पश्चिम घाट व ईशान्येकडील राज्यात जैवविविधता जास्त असून तेथे या प्रजाती सापडल्या आहेत. पूर्व हिमालय व पश्चिम घाट हे भारतातील जैवविविधता असलेले भाग आहेत.
ईशान्येकडील भाग हा इंडो-बर्मा जैवविविधता भागात येतो तर अंदमान-निकोबार बेटे ही सुंदालँडचा भाग आहेत. भारतात प्राण्यांच्या एकूण ९६,५०० प्रजाती शोधल्या असून त्यात एकपेशीय प्रोटोझोआचा समावेश आहे. जगात शोधल्या गेलेल्या प्राण्यांच्या तुलनेत ही संख्या ६.७ टक्के आहे. नवीन प्रजातींच्या शोधाशिवाय यंदा प्रथमच प्राण्यांच्या ६१ नवीन प्रजाती शोधल्या गेल्या आहेत. नवीन शोधलेल्या प्रजातींमध्ये कीटकांच्या १९, प्रवाळांच्या १६, कोळ्यासारखे अष्टपाद प्राणी व इतरांच्या ७, माशांच्या २ सरीसृप प्राण्यांच्या १ याप्रमाणे प्रजाती शोधल्या आहेत.
जैवविविधता क्षेत्रे
पूर्वघाट, पश्चिम घाट, ईशान्येकडील राज्ये,
भारतात प्राण्यांच्या ९६,५०० प्रजाती शोधण्यात यश
जगातील शोधल्या गेलेल्या प्राण्यांच्या तुलनेत संख्या ६.७ टक्के

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
CJI DY Chandrachud
केंद्रीय तपास यंत्रणांना सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोलाचा सल्ला; म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित…”
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!