गेल्या काही वर्षांत भारतामध्ये ख्रिसमस आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनचे प्रमाण वाढताना दिसत आहे. सध्या बाजारपेठेवरही नजर टाकल्यास ख्रिसमसचा उत्साह अनुभवयास मिळेल. दिवाळीप्रमाणे आता भारतीय स्वयंपाकघरातही ख्रिसमससाठी विविध पदार्थ बनवण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये ‘स्विस रोल विथ चॉकलेट’ची रेसिपी सध्या हॉट फेव्हरिट ठरताना दिसत आहे.

                         स्विस रोल विथ चॉकलेट
swiss-rolls-with-chocolate


साहित्य:- २ अंडी, ५० ग्रॅम मैदा, १/८ चमचा बेकिंग पावडर, १० ग्रॅम कॉर्नफ्लॉवर, ७५ ग्रॅम बारीक साखर, चार चमचे तेल, एक चमचा व्हॅनिला इसेन्स, वितळलेले चॉकलेट, अर्धा कप फेटलेले बटर, पाऊण कप पिटी साखर आणि साधारण पाव कप कोको

कृती:-

* मैदा, बेकिंग पावडर आणि कॉर्नफ्लॉवर चाळून घ्या.
* एक ७x८ आकाराचा एक ट्रे घ्या.
* संपूर्ण ट्रेवर बटर पेपर पसरा. मात्र, बटर पेपर ट्रेच्या चारही बाजूंनी बाहेर राहील याची खात्री घ्या.
* एका बाऊलमध्ये दोन अंडी फोडून घ्या आणि त्यामध्ये इसेन्स मिसळवा.
त्यामध्ये साखर टाकून मिश्रण सात ते आठ मिनिटे मऊ, हलके आणि थोडसे जाडसर होईपर्यंत फेटावे.
* मिश्रण जोरात फेटत असतानाच त्यामध्ये हळुहळु तेल टाका.
* त्यानंतर या मिश्रणात मैदा टाकून ते हळुहळु एकत्र करा.
* संपूर्ण मिश्रण ट्रेमध्ये ओतून एकसारखे करून घ्या
* त्यानंतर ट्रेमधील मिश्रण १८०/३५० डिग्री सेल्सिअस तापमानावर १५ मिनिटांसाठी ओव्हनमध्ये ठेवून द्या.
* जेव्हा केक नरम होऊन ट्रेपासून वेगळा होईल तेव्हा तो ओव्हनमधून बाहेर काढा.
* त्यानंतर एका पेपरवर पिटी साखर पसरून ट्रेमधील केक त्यावर उपडा करा.
* रोलमधील फिलिंग तयार करण्यासाठी कोको आणि बारीक साखर नीट चाळून घ्या. त्यानंतर एक तवा घेऊन त्यामध्ये बटर टाका. बटर पुरेसे हलके होईपर्यंत हलवल्यानंतर त्यामध्ये तुमच्या चवीनुसार कोको आणि साखर टाका.
* तयार झालेले मिश्रण स्पंज केकवर पसरा आणि केक रोलच्या आकारात वरच्या दिशेने गुंडाळायला सुरूवात करा.
* रोल केलेला केक प्लॅस्टिक किंवा अॅल्युमिनिअम फॉईलच्या सहाय्याने बांधून फ्रिजमध्ये ठेवावा. संपूर्ण रोलचे १२ समान भाग करून सर्व्ह करावेत.