माणसाच्या आयुष्यात सुखापेक्षा दुख:च अधिक असते हे खरे आहे. संयुक्त राष्ट्रांनी जागतिक सुख-समाधान निर्देशांकानुसार देशांची क्रमवारी जाहीर केली असून त्यात भारताचे स्थान फारसे चांगले नाही. १५८ देशात भारताचा क्रमांक ११७ वा लागला आहे.
चित्ती नसू द्यावे समाधान…
जागतिक सुख-समाधान निर्देशांकात देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न, आयु:मर्यादा, सामाजिक आधार व जीवनातील पर्यायांच्या निवडीतील स्वातंत्र्य या निकषांचा विचार केला जातो. अपेक्षेप्रमाणे स्वित्र्झलडने सुखी-समाधानी देशात जगात पहिला क्रमांक पटकावला आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्यूशन्स नेटवर्क म्हणजे ‘एसडीएसएन’ या संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेच्या वतीने हा अहवाल दरवर्षी जाहीर केला जातो. २०१५ या वर्षांचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
सुखी-समाधानी देशांच्या यादीत आइसलँड, डेन्मार्क, नॉर्वे व कॅनडा यांचा पहिल्या पाचात समावेश आहे. भारत ११७ वा असून पाकिस्तान ८१ वा आहे. पॅलेस्टाइन (१०८), बांगलादेश (१०९), युक्रेन (१११) इराक (११२) या प्रमाणे इतर देशांची क्रमवारी आहे. भारताचा क्रमांक २०१३ च्या तुलनेत सहा स्थानांनी घसरला आहे, त्यावेळी भारताचा क्रमांक १११ वा होता.
अहवालात म्हटले आहे की, सुखी-समाधानी देशांची क्रमवारी ठरवताना देशाची प्रगती विचारात घेतली जाते. दरडोई उत्पन्नाचाही त्यात समावेश आहे. भ्रष्टाचार व औदार्य या घटकांचाही यादी ठरवण्याच्या निर्देशांकात समावेश आहे.
अमेरिका श्रीमंत असली तरी तिचा क्रमांक १५ वा लागला असून ब्रिटन (२१), सिंगापूर (२४). सौदी अरेबिया (३५), जपान (४६) व चीन (८४) या प्रमाणे क्रमवारी आहे. अफगाणिस्तान, युद्धग्रस्त आठ सहारा-आफ्रिकन देश ज्यात टोगो, बुरूंडी, बेनिन, रवांडास बुर्किना फासो, आयव्हरी कोस्ट व गिनी, चॅड यांचा समावेश होतो; ते १५८ देशांमधील सर्वात कमी सुखी देश आहेत.  सुखी समाधानी देशांची निवड करतानाचे निकष हे शाश्वत विकासाचे निदर्शक आहेत असे अहवालात म्हटले आहे.
 ‘सुखाचा भूगोल’ या विभागात २०१५ व २०१३ या वर्षांची तुलना करता २०१३ मध्ये जे पहिल्या दहात होते ते आताही पहिल्या दहात आहेत. त्यात स्वित्र्झलडचा क्रमांक बदलला असून तो पहिल्या स्थानावर आला आहे. फिनलंड, नेदरलँडस, स्वीडन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया यांचा पहिल्या दहात समावेश आहे व त्यांचे सरासरी गुण ७.२८ आहेत.
या अहवालात म्हटल्यानुसार जगात अठरा वर्षांखालील लोकसंख्या एक तृतीयांश असून त्यांच्या मानसिक व इतर स्थितीचा विचार करण्यात आला आहे. जन्म ते प्रौढावस्था तसेच बालविकास (शैक्षणिक, वर्तनात्मक, भावनिक) यांचाही विचार केला आहे. भावनात्मक विकासात काही देशांची स्थिती चांगली असून शैक्षणिक विकासात स्थिती खूप वाईट आहे.
जगातील २० कोटी मुलांचे मानसिक स्वास्थ्य चांगले नसून त्यांना उपचारांची गरज आहे. श्रीमंत देशातही एक चतुर्थाश मुलांनाच उपचार मिळत आहेत. मुलांच्या सुख समाधानास महत्त्व देणे ही जगाच्या सुखातील गुंतवणूक आहे असे अहवालात म्हटले आहे. सुख-समाधान हे समाजातील लोकांच्या सामाजिक वर्तनावर अवलंबून आहे, असे या अहवालाचे एक संपादक व कोलंबिया विद्यापीठाच्या अर्थ इन्स्टिटय़ूटचे संचालक जेफ्री सॅश यांनी म्हटले आहे.

*२० कोटी मुलांना मानसिक उपचारांची गरज
*सहारा-आफ्रिकेतील आठ देशांची स्थिती वाईट
*सामाजिक वर्तन हा मूलभूत निकष
*दरडोई उत्पन्न, आयु:मर्यादा, शैक्षणिक स्थिती, पर्याय निवडीचे स्वातंत्र्य या घटकांचा विचार
*पहिल्या दहा देशांना सरासरी ७.२८ गुण

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
knight frank wealth report 2024
अग्रलेख : अधिक की व्यापक?
First Secretary Anupama Singh
“जम्मू-काश्मीरच्या प्रकरणात…”, भारताच्या प्रतिनिधी अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल
dubai five year multiple entry visa
विश्लेषण : दुबईने भारतीय पर्यटकांना पाच वर्षांसाठी ‘मल्टीपल एंट्री व्हिजा’ देण्याची घोषणा का केली? याचा भारतीयांना कसा फायदा होईल?