लाल रंगाच्या रसाळ स्ट्रॉबेरीची तिच्या मोहक सुगंध आणि चवीमुळे लोकप्रिय फळ म्हणून ओळख आहे. ज्यांनी एकदा हे फळ खावून पाहिले आहे त्यांच्या समोर स्ट्रॉबेरीचे नाव काढताच त्यांच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहाणार नाही. अगदी अपवादात्मक काही लोकांना कदाचीत हे रसाळ फळ आवडत देखील नसेल. मात्र, स्ट्रॉबेरीचा अनेक खाद्य पदार्थांमध्ये उपयोग केला जातो. वेगवेगळ्या आइसक्रीम, मिल्क शेक, चॉकलेट आणि जाम बणवण्यासाठी स्ट्रॉबेरीचा वापर होतो. आपल्याकडे महाबळेश्व, पाचगणी आणि अगदी पुण्याच्या सासवडमध्ये देखील स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेतले जाते. सध्या स्ट्रॉबेरीचा मोसम असून, चांगल्या दर्जाची स्ट्रॉबेरी फळ बाजारात सहज मिळते.
स्ट्रॉबेरी केवळ चविला चांगली लागते म्हणून खायची नाही तर, तिचे आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत.  
स्ट्रॉबेरी का खावी
-स्ट्रॉबेरी सेवणामुळे हृद्यविकार आणि मधुमेहावर मात करता येते.
-स्ट्रॉबेरीमध्ये ‘क’ जीवनसत्व मोठ्याप्रमाणात असल्यामुळे दिवसभराच्या कामामुळे येणारा थकवा कमी होतो.
-स्ट्रॉबेरी ऑक्साइड प्रतिकारक असल्याने डोळ्यांसाठी देखील लाभकारक आहे. स्ट्रॉबेरीमुळे मोतिबिंदू होण्यापासून संरक्षण होते. स्ट्रॉबेरीतील ‘क’ जीवनसत्वामुळे डोळ्यांना प्रखर प्रकाशापासून दिलासा मिळतो.
-स्ट्रॉबेरीत असणारे अँटीऑक्‍सीडेंट, फ्लेवोनॉइड, फोलेट आणि केंफेरॉल ही तत्व कॅन्सर होण्यास कारणीभूत असणाऱ्या पेशी नष्ट करतात.
-यातील ‘क’ जीवनसत्व त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या कमी करते. त्यामुळे त्वचा तजेलदार होते.
-पोटॅशिअम हे द्रव्य स्ट्रॉबेरीमध्ये मुबलक असल्याने हृद्यविकाराचा झटका टाळण्यास मदत करते.
– तांबड्या रक्तपेशींच्या अभावाने महिलांमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण आपल्याकडे मोठे आहे. स्ट्रॉबेरीमधील फोलेट हे तत्व तांबड्या रक्तपेशींची वाढ करण्यास मदत करतात.
-सायट्रीक आम्ल आणि इतर आरोग्यास आवश्यक आम्ल स्ट्रॉबेरीमध्ये असल्याने दात चमकदार होतात आणि हिरड्या मजबुत होण्यास मदत होते.
-सांधेदुखीपासून देखील स्ट्रॉबेरी दिलासा देते. यातील अँटीऑक्सीडंटस आणि फायटोकेमिकल सांधे मजबूत होण्यास मदत करतात.
-स्ट्रॉबेरीमधील पोटॅशिअम उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवून देते.
-मँगेनिज हे खनिजद्रव्य देखील स्ट्रॉबेरीत असल्याने हाडांचा ठिसूळपणा कमी होतो आणि हाडेदुखीपासून दिलासा मिळतो.
-स्ट्रॉबेरी मेदरहीत असल्याने वजनावर नियंत्रण मिळवण्यास फायदा होतो.
जर एवढ्या मोठ्याप्रमाणावर फायदे स्ट्रॉबेरी खाण्यामुळे होणार असतील तर, हे आरोग्यदायी फळ खाण्यास काहीच हरकत नाही.

Why a sunscreen over SPF 50 is still the best bet for the beach
तुम्हीही उन्हात जाताना ‘SPF 50’ सनस्क्रीन वापरताय का? मग त्वचारोग तज्ज्ञ काय सांगतात वाचाच
How to use urad or black gram in food in cold weather
Health Special: थंडीत उडदाचा वापर जेवणात कसा करावा?
Gas Stove vs Electric Stove
गॅस की इलेक्ट्रिक: कोणती शेगडी आहे चांगली? दोन्हीपैकी कोणती शेगडी वापरणे आहे फायदेशीर?
Morning Drinks to Lower Cholesterol Levels
वाईट कोलेस्ट्रॉलच्या समूळ नाशासाठी सकाळी घ्या ‘हे’ पेय; त्रास झटक्यात होऊ शकतो कमी