वैज्ञानिकांनी आता नैराश्यावर नवीन औषधे शोधून काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नैराश्यावर सध्या फार कमी औषधे उपलब्ध असून त्यांची परिणामकारकताही कमी आहे. त्यामुळे वेदनामुक्ती व व्यसन न लागणे अशी दोन्ही गुणधर्माची सांगड घालण्याचे प्रयत्न केले जात आहेत, सध्याची अँटीडिप्रेसंट औषधे ही मेंदूत सेरोटोनिन निर्माण करतात हे खरे असले, तरी त्यांचे कार्य नेमके कसे चालते तेच समजलेले नाही. किमान ३० ते ५० टक्के  रुग्ण औषधांना प्रतिसाद देत नाहीत. अनेक आठवडे ते औषधे घेत राहतात. औषधाचे चांगले परिणाम दिसण्यापेक्षा वाईट परिणामच अधिक दिसतात, शिवाय उपाय झालाच तर त्याचा परिणाम दिसायला खूप कालावधी लागतो. आता बाथ विद्यापीठाने बुप्रेनॉपफाइन या शस्त्रक्रियेच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या वेदनाशामकाचा व नॅलट्रेक्सोन या व्यसनमुक्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचे मिश्रण तयार केले आहे. ते मेंदूत एसएसआरआय ही आताची औषधे ज्या भागावर काम करतात. त्यापेक्षा वेगळ्या भागावर काम करतात. उंदरांमध्ये त्याचे परिणाम अँटीडिप्रेसंटसारखे दिसून आले आहेत. आता या औषधांच्या चाचण्या केल्यानंतरच उपचारांचा किती फायदा होतो हे समजणार आहे. सध्या ज्या दोन औषधांचे मिश्रण वापरले आहे, त्या दोन्ही औषधांना परवानगी आहे. बाथ विद्यापीठाच्या औषधनिर्माणशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. सारा बेली यांनी सांगितले, की एसएसआरआय औषधे रुग्णांवर उपयोगी ठरत असली, तरी त्यांचे वाईट परिणाम जास्त आहेत, शिवाय ही औषधे सर्व रुग्णांना चांगला परिणाम देतात असा भाग नाही.
नैराश्यावर गेल्या काही दशकात संशोधन झाले असले, तरी औषधे मात्र नवीन तयार झालेली नाहीत, जुनीच औषधे वेगवेगळ्या नावाने वापरली जात आहेत. ती सर्व सारख्याच पद्धतीने काम करणारी आहेत, त्यामुळे नैराश्यावर नवीन औषधे शोधण्याची गरज आहे. ब्रिटनमध्ये ४० लाख लोक नैराश्याने ग्रस्त आहेत.
डॉ. बेली यांच्या मते नॅलट्रेक्सोन व ब्युप्रेनॉरफिन या औषधांचा एकत्रित वापर उंदरांमध्ये करण्यात आला असला, तरी त्याच्या सुरक्षा चाचण्या चालू आहेत पण जवळपास हे मिश्रण सुरक्षित सिद्ध झाले आहे, अजून काही चाचण्या घेतल्यानंतर त्यापासून औषध तयार केले जाईल.
डॉ. स्टीव्ह हजबंड्स यांच्या मते या औषधांचा वापर करता येणार नाही कारण त्यांचे गुणधर्म वेगळे आहेत, येथे आपण ब्युप्रेनॉरफिन या औषधाचे रसायनशास्त्रच बदलण्याचा द्राविडी प्राणायाम करीत आहोत, त्यामुळे ते कठीण आहे. ‘सायकोफार्माकोलॉजी’ या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.
नवीन औषधाचे कार्य
बुप्रेनॉरफिन हे रुग्णांचा ताणाला असलेला प्रतिसाद बदलतात, त्यात मेंदूतील कप्पा ओपियॉइड हा संग्राहक बंद केला जातो. म्यू ओपियॉइड हा संग्राहक उद्दीपित केला जातो. त्यामुळे ही औषधे घेणाऱ्यांना त्यांची सवय लागू शकते. ही एक समस्या यात आहे पण त्यावर उपाय म्हणून नॅलट्रेक्सोन हे औषध वापरून म्यू ओपियॉइड हा औषधांची सवय लावणारा संग्राहक बंद केला जातो. उंदरांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे.

How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Apple CERT-In Security Alert Marathi News
लाखो iOS – Android युजर्सचा डेटा चोरी होण्याचा धोका! फोनमध्ये ‘हे’ बदल करून घ्यायचा CERT-In चा इशारा