ब्रिटिश लोक आपल्याला चहाची सवय लावून गेले ती काही जाणार तर नाहीच, उलट दिवसेंदिवस त्याची तल्लफ वाढतेच आहे. आता हर्बल चहा, ग्रीन टी असे त्याचे अनेक औषधी प्रकारही आले आहेत. पण पावसाळ्यात धुवाधार पाऊस कोसळत असताना आपल्याला चहाची तल्लफ येते, त्या वेळी जवळच्या टपरीवर किंवा अगदी घरातही मिळालेला चहा वेगळी चव घेऊन येतो. ते आपल्याला जाणवतेही, पण प्रत्यक्षात मान्सूनच्यावेळी उत्पादित झालेला चहा व इतरवेळी उत्पादित झालेला चहा यांच्या चवीत उलट अर्थाने फरक असतो. मान्सूनच्यावेळी उत्पादित झालेला चहा गुणवत्तेने फार चांगला नसतो, असे वैज्ञानिक सत्य उघड झाले आहे.
 पावसाच्या बदलत्या स्वरूपानुसार चहाचा स्वाद बदलत जातो व त्याचे आरोग्य गुणधर्मही बदलतात असे नवीन अभ्यासात निष्पन्न झाले आहे. मोंटाना स्टेट युनिव्हर्सिटीच्या सेलेना अहमद यांच्यासह वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार चहात मोठय़ा प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, त्यामुळे चहात आरोग्यासाठी फायद्याचे गुण असतात.नैऋत्य चीनमध्ये जेव्हा मान्सून तीव्र असतो तेव्हा इतर संयुगांचे प्रमाण चहात वाढते व एपिगॅलोकॅटेचिन व एपिगॅलोकॅटेचिन गॅलेट व कॅटेचिन या संयुगांचे प्रमाण ५० टक्के कमी होते. काही चहा उत्पादकांची कमाई तीव्र मान्सून काळात ५० टक्के कमी होते. वैज्ञानिकांनी नैर्ऋत्य चीनमध्ये चहाच्या पिकाचे नमुने घेतले. ते, मान्सून जास्त असलेल्या व दुष्काळ असलेल्या अशा दोन टोकाच्या परिस्थितीत वाढलेल्या चहाच्या उत्पादनाचे होते. त्यांनी चहा उत्पादकांच्या मुलाखतीही घेतल्या. त्यावरून मान्सूनचे प्राबल्य नसलेल्या ठिकाणी वाढवलेला चहा जास्त दर्जेदार असतो व मान्सूनच्या काळात वाढवलेला चहा कमी दर्जाचा असतो. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करणारे हे संशोधन आहे, असे अहमद यांनी त्यांच्या संशोधनात म्हटले आहे.
कमालीचा पाऊस व कमालीचा दुष्काळ यामुळे चहा उत्पादकांची कमाई कमी जास्त होते; म्हणजे ती कमाई हवामान बदलांवर अवलंबून आहे असे अहमद यांचे मत आहे.
फ्लोरिडा विद्यापीठातील सांस्कृतिक मानववंशशास्त्राचे प्राध्यापक रिक स्टेप यांच्या मते आम्हाला चहाच्या दर्जावर हवामान बदलांचा कसा परिणाम होतो व शेतकऱ्यांची रोजीरोटी कशी बदलते, याच्याबरोबरच शेतकरी अशी जोखीम कशी पत्करतात याचाही अभ्यास करायचा आहे. ‘प्लॉसवन’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
चहात मोठय़ा प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, त्यामुळे चहात आरोग्यासाठी फायद्याचे गुण असतात.नैऋत्य चीनमध्ये जेव्हा मान्सून तीव्र असतो तेव्हा इतर संयुगांचे प्रमाण चहात वाढते व एपिगॅलोकॅटेचिन व एपिगॅलोकॅटेचिन गॅलेट व कॅटेचिन या संयुगांचे प्रमाण ५० टक्के कमी होते.