अनेकांना नेहमी किरकोळ दुखण्यासाठीही गोळ्या घेण्याची सवय असते.अगदी  थोडा ताप व अंग दुखत असले की, आपण हमखास पॅरासिटेमॉलच्या गोळ्या घेतो. परंतु जे लोक नेहमी पॅरासिटेमॉलच्या गोळ्या घेतात त्यांच्यात पाठीच्याखालच्या भागातील दुखणे थांबत नाही. मेरूरज्जूच्या ठिकाणी दुखत असेल तर या गोळीने काहीही परिणाम होत नाही. हाडांच्या संधिवातासाठी त्यांचा काही उपयोग होऊ शकत नाही, असे वैज्ञानिकांचे मत आहे. पॅरासिटेमॉलची सुरक्षितता व उपयोग यावर आता पुन्हा एकदा नव्याने चर्चेस सुरूवात झाली आहे. पाठीच्या दुखण्यात पॅरासिटेमॉलचा काहीही परिणाम होत नाही व त्यामुळे कुठलीही अक्षमता दूर होत नाही किंवा आरोग्यात सुधारणा होत नाही. या गोळीची प्लासेबो म्हणजे खोटय़ा गोळीशी तुलना करता सारखेच परिणाम दिसून आले आहेत.
हाडांच्या संधिवातात त्याचा फार कमी परिणाम होतो आणि दुखणेही थांबत नाही, असे ब्रिटिश मेडिकल जर्नलने प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधात म्हटले आहे. सिडनी विद्यापीठातील गुस्ताव मॅकाडो यांनी लिहिलेल्या शोधनिबंधात म्हटले आहे की, पॅरासिटेमॉलची परिणामकारकता शोधण्यासाठी पद्धतीशीर माहितीचा आधार घेऊन त्याचे विश्लेषण करण्यात आले.
 १३ नमुन्यांच्या आधारे केलेल्या नियंत्रित घटकयुक्त अभ्यासात या गोळीचा परिणाम खोट्या गोळीइतका म्हणजे प्लासेबो इतका आढळला. पॅरासिटेमॉलचा वापर हाडांच्या संधिवातावर केला तर फायदा होण्याऐवजी यकृताचे कार्य बिघडते असे काही चाचण्यात दिसून आले आहे. हाडाचा संधिवात किंवा गुडघेदुखी व खुब्याच्या दुखण्यासाठी पॅरॉसिटेमॉल देऊ नये अशीही शिफारस शोधनिबंधात केली आहे. जर पॅरासिटेमॉल हे नियंत्रित प्रमाणात घेतले नाही तर आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. हाम्डांच्या दुखण्यासाठी औषधांव्यतिरिक्त पर्यायी पद्धतींचा वापर करावा. त्यात व्यायामाने बराच फायदा होतो व मेरूरज्जूचे दुखणे व हाडांचा संधिवात बराच आटोक्यात ठेवता येतो. हाडांच्या संधिवाताने जगात अनेक लोक विकलांग होतात तसेच मेरूरज्जूच्या दुखण्यानेही जायबंदी होतात.
 वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वानुसार पॅरासिटेमॉल हे मेरूरज्जूचे दुखणे व हाडांचा संधिवात यात पहिल्या पातळीवरील औषध आहे. असे असले तरी त्याचा वापर जास्त करणे धोक्याचे असते. दिवसाला ४००० मिलिग्रॅम इतकी कमाल मात्रा दिली जाऊ शकते, परंतु त्याचा सतत वापर करणे अयोग्य ठरते, असे शोधनिबंधात म्हटले आहे.

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
how to get rid of house rats tips
Cleaning tips : घरातील उंदरांना पळवून लावण्यासाठी ‘गव्हाचा’ करा वापर! पाहा या दोन टिप्स…
how to water a plant tips in marathi
Garden tips : उन्हाळ्यामध्ये झाडांना पाणी देण्याची योग्य वेळ काय? रोपांच्या वाढीसाठी पाहा ‘१०’ टिप्स
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धती