scorecardresearch
  • Lokankika 2016

सविस्तर वेळापत्रक

‘लोकसत्ता लोकांकिका’च्या व्यासपीठावर पूर्ण तयारीनिशी आपले नाटय़विचार घेऊन उतरणाऱ्या राज्यभरातील तरुणाईने पहिल्याच वर्षीपासून या स्पर्धेला आपलेसे केले आहे. त्याच आपलेपणाने २६ नोव्हेंबरला ‘अस्तित्व’च्या सहकार्याने ‘लोकांकिका’ स्पर्धेची कवाडे नाटय़वेडय़ांसाठी खुली होणार आहेत. यंदाही सर्वोत्तम ठरणाऱ्या गुणवंतांना मालिका-चित्रपटातून संधी देण्यासाठी ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे या स्पर्धेचे टॅलेंट पार्टनर आहेत.

‘लोकांकिका’ची प्राथमिक फेरी मुंबई, पुणे, ठाणे यांच्यासह रत्नागिरी, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि अहमदनगर अशा आठ केंद्रांवर रंगणार आहे. या आठही केंद्रांवरच्या प्राथमिक फेरीतून उत्तम एकांकिका त्या विभागांमधील अंतिम फेरीसाठी निवडल्या जातील आणि त्यानंतर विभागीय अंतिम फेरीत पहिली आलेली एकांकिका त्या विभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी महाअंतिम फेरीत दाखल होईल. ही स्पर्धा थोडी उशिरा म्हणजे २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याने तरुणाईला परीक्षेचा ताण बाजूला ठेवून पूर्ण जोशाने स्पर्धेवर लक्ष केंद्रीत करता येणार आहे. स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे.

राज्यातील आठ केंद्रांवर प्राथमिक आणि विभागीय अंतिम फेरी पार पडल्यानंतर स्पर्धेची महाअंतिम फेरी यंदा १७ डिसेंबर रोजी मुंबईतील यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे रंगणार आहे. त्यासाठी तालमीच्या तयारीला लागण्यापूर्वी ‘लोकांकिका’मध्ये आपल्या महाविद्यालयाची नोंद करणे आवश्यक आहे. स्पर्धेचा प्रवेश अर्ज  indianexpress-loksatta.go-vip.net/lokankika2016 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

केंद्र : मुंबई, पुणे, ठाणे, रत्नागिरी, नाशिक, नागपूर, अहमदनगर आणि औरंगाबाद
प्राथमिक फेरी : २६ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०१६
विभागीय अंतिम फेरी : ५ ते ११ डिसेंबर २०१६
महाअंतिम फेरी : १७ डिसेंबर २०१६

प्रवेशअर्ज सादर करण्याची तारीख
अंगीभूत नाटय़गुणांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या आणि नवोदित कलाकारांना ताऱ्यांच्या पंक्तीत नेऊन बसवणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत प्रवेश घेण्याची अंतिम मुदत रविवार, २० नोव्हेंबर २०१६ आहे.

प्राथमिक फेरी
सर्व आठ केंद्रांवर २६ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०१६ या काळात प्राथमिक फेरी पार पडेल.

विभागीय अंतिम फेरी
सर्व आठ केंद्रांवर ५ ते ११ डिसेंबर २०१६ दरम्यान विभागीय अंतिम फेरी पार पडेल. प्रत्येक केंद्रावर ४ ते ६ एकांकिका सादर होतील.

महाअंतिम फेरी
शनिवार, १७ डिसेंबर २०१६ रोजी मुंबईच्या यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे स्पर्धेची महाअंतिम फेरी पार पडेल. महाअंतिम फेरीमध्ये आठ केंद्रांवरील प्रथम क्रमांकाच्या एकांकिका सादर होतील.

क्र.केंद्रप्राथमिक फेरी विभागीय अंतिम फेरी
 रत्नागिरी ६ डिसेंबर २०१६ १३ डिसेंबर २०१६
 ठाणे २७ नोव्हेंबर २०१६ ८ डिसेंबर २०१६
 नाशिक २८ आणि २९ नोव्हेंबर २०१६ ६ डिसेंबर २०१६
 अहमदनगर २९ नोव्हेंबर २०१६ ५ डिसेंबर २०१६
 औरंगाबाद २ आणि ३ डिसेंबर २०१६ ९ डिसेंबर २०१६
 नागपूर ३ आणि ४ डिसेंबर २०१६ ९ डिसेंबर २०१६
 पुणे ३ आणि ४ डिसेंबर २०१६ ७ डिसेंबर २०१६
 मुंबई ३ आणि ४ डिसेंबर २०१६ ११ डिसेंबर २०१६