* कोरफडीच्या पाच मिलिलीटर रसात अर्धा चमचा मध घालून रोज सकाळी नाशत्यापूर्वी घ्यावा. त्यामुळे भूक लागते. शौचास साफ होते.
* कोरफडीच्या रसात सैंधव मीठ (एक चमचाा रस + चिमूटभर मीठ) घालून सकाळ-रात्री दिल्सास कफ, खोकला, डांग्या खोकला थांबतो. दम्याने मुलांचे पोट उडते. त्यावर कोरफडीच्या रसात तूप व मध घालून वारंवार चाटवावे. दम कमी होतो. पोट उडणे थांबते.
* रोज बारीक ताप, भूक न लागणे, वजन कमी होत जाणे, थकवा वाढत जाणे यावर मध आणि पिंपळी चूर्णातून कोरफड रसाचा खूपच चांगला उपयोगा होतो.
* यकृत-प्लीहा वाढणे (लिव्हर व स्पलीन) तसेच जलोदर यांसारख्या जुनाट व भयंकर व्याधीतही कोरफड अत्यंत उपयोगी आहे.
* नाकातून वारंवार रक्त येणे, अनेक प्रकारचे त्वचाविकार, पित्त उठणे, रक्ताच्या गाठी, खाज -खरूज- फोड यासाठी मंजिष्ठ, हळद आणि कोरफडीचा उपयोग होतो.
* डोळे येणे, मूळव्याधीची आग किंवा ठणका, मार लागून रक्त साखळणे, भाजलेल्या जागेची आग होणे अशा विकारांत कोरफडीचा गर बाहेरून लावल्यानेही खूप उपयोग होतो.
* कोरफडाच्या गरापासून बनविलेला ‘काळा वोळ’ हा स्त्रियांच्या पाळीच्या विकारांत अत्यंत गुणकारी आहे.
वैद्य राजीव कानिटकर

 

gooseberry benefits
आवळ्याचे फायदे माहित असूनही आहारात समाविष्ट करत नाही का? मग, आवळ्याचे हे सहज तयार होणारे पदार्थ खा
aloe vera apply on face for skin benifits
Aloe Vera Benifits: रात्रीच्या वेळेस चेहऱ्यावर ‘या’ प्रकारे कोरफड लावल्यास चमकेल त्वचा, जाणून घ्या
Curry leaves
कढीपत्ता- चरबी कमी करणारे सुपरफूड; वजन कमी करण्यासाठी कसे ठरते फायदेशीर? जाणून घ्या
Dodder plant
पिंपळपान : अमरवेल