ईशान केबिनमध्ये आला आणि न सांगताच थेट तपासणीसाठी झोपला. नेहमी तपासणीसाठी घाबरणारा ईशान या वेळी मात्र घाईघाईने येऊन झोपला म्हणजे त्याला प्रचंड थकवा आलाय आणि काही तरी संसर्ग आहे एवढे लगेच लक्षात आले. ‘डॉक्टर, गेले तीन दिवस काहीच खात नाही आणि कालपासून हे लालसर चट्टे आणि फोड येत आहेत. ईशान, शर्ट काढून दाखव डॉक्टरांना.’ आई हे म्हणाल्यावर लगेचच मनात निदान पक्के झाले. त्यातच रॅशची तपासणी केल्यावर लक्षात आले की फोड विविध टप्प्यांवरचे होते. म्हणजे काही फोड सुरू झाले, काही अधिक लालसर झालेले आणि काही पिकण्याच्या बेतात असलेले. या सगळ्या लक्षणांवरून कांजण्यांच्या निदानावर शिक्कामोर्तब झाले.

Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
kannada producer Soundarya Jagadish found dead
घरात मृतावस्थेत आढळले प्रसिद्ध चित्रपट निर्माते, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पबविरोधात दाखल झाला होता गुन्हा
Abigail Lupi
फेनम स्टोरी: केअर गर्ल अबिगेल
fraud of Jewellery worth rupees crores in thane
ठाण्यात सराफा दुकानात कर्मचाऱ्याकडून कोट्यवधींच्या दागिन्यांचा अपहार

डॉक्टर मला वाटले की गोवर असेल. आधीच्या काळी गोवरचे प्रमाण इतके होते की अजूनही अंगावर लाल चट्टे असलेला प्रत्येक आजार गोवरच वाटतो. पण गोवर आणि कांजण्यांच्या अंगांवर येणाऱ्या चट्टय़ांमध्ये एक मूलभूत फरक असतो. गोवरामध्ये अंगावर रंगाचा डब्बा ओतल्यावर तो जसा अंगावरून खाली जाईल, तसे अंगावरील पुरळ खाली सरकत जाते आणि कांजण्यांमध्ये सूर्य उगवतो तसे छातीच्या मध्यावरून पुरळ उगवते. तसेच कांजण्या सहसा शाळकरी म्हणजे ५ ते १० वर्षांच्या मुला-मुलींमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात आणि गोवर मात्र सहसा पाच वर्षांखाली जास्त आढळतो. हे समजून सांगितल्यावर ईशानच्या आईलाही कांजण्यांच्या निदानाचा विश्वास पटला. खरेतर गेल्या महिन्यात सर्दी खोकल्यासाठी दाखवायला आल्यावर मी ईशानच्या आईला सतर्क केले होते. कांजण्यांची लस घेऊन टाका, सध्या गावात साथ सुरू आहे. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांना वाईट वाटेल म्हणून मी तो विषय घेतला नाही. शेवटी बोलण्याच्या ओघात त्याच बोलून गेल्या. तरी मला ईशान म्हणत होता. वर्गात सध्या बरीच मुले आजारी पडत आहेत. मागेच तुमचा सल्ला ऐकायला हवा होता. तो विषय सोडून मी त्यांना पुढची चूक सुधारायला सांगितली. आता बाकीचे पालक करत आहेत ती चूक तुम्ही करू नका. पूर्ण बरा झाल्याशिवाय याला शाळेत पाठवू नका. कारण कांजण्या हा संसर्गजन्य आजार आहे.

डॉक्टर मग ईशानला रुग्णालयात दाखलच करून घ्या ना. एखादे सलाईन लावा. तसाही काही खात नाही तो. ईशानच्या आईचा हट्ट समजण्यासारखा होता. अहो, त्याला दाखल करण्याची मुळीच गरज नाही. कारण कांजण्या हा मुदतीचा आजार आहे. कुठल्याही विषाणूजन्य आजारासारखा तो आपोआप बरा होईल. जेवण थोडे कमी जात असेल तरी हरकत नाही. भरपूर पाणी पाजा. सलाईन म्हणजे तरी काय, मीठ साखरेच्या पाण्यासारखेच असते ते. आजाराच्या काळात पचनशक्ती मंदावते म्हणून भूक कमी होते. चार-पाच दिवस कमी जेवल्याने असा फार फरक पडणार नाही. फळे-फळांचा रस किंवा ईशानला जे आवडते ते आणि जितके आवडते तितके खाऊ  द्या. पुढचे चार-पाच दिवस अंगावरचे हे फोड वाढत जातील. फोड वाढले म्हणून लगेच माझ्याकडे धावत येण्याची गरज नाही. ते कमी होतील आपोआप. त्यांना खाज येईल. मी खाज कमी होण्याची औषधे देतोय पण ईशानची नखे कापून घ्या. कारण फोडांना खाजवल्यामुळेच जंतुसंसर्ग होतो. मी ही तापाची सर्दी-खोकल्याची औषधे देतोय तेवढी मात्र न चुकता बरे होईपर्यंत घ्या.

‘डॉक्टर या फोडांमुळे चेहऱ्यावर व्रण तर पडणार नाहीत ना?’ सहसा संसर्ग झाला नाही तर व्रण पडत नाहीत. पडले तरी काही आठवडय़ात जातील. बरे डॉक्टर परत कांजण्या होऊ  नये म्हणून हा बरा झाल्यावर आता लसीकरण करता येईल का? मी म्हणालो- अहो लसीकरण झाले. म्हणजे? ईशानच्या आईने आश्चर्याने विचारले. एकदा कांजण्या झाल्या की तेच लसीकरण ठरते आणि परत कांजण्या होत नाहीत. पण म्हणून या अशा लसीकरणाची वाट पाहत बसू नका. ईशानच्या धाकटय़ा भावाला लवकर कांजण्यांची लस द्या.

amolaannadate@yahoo.co.in