वैद्य विजय कुलकर्णी, आयुर्वेद चिकित्सक

How to Identify Chemically Injected Watermelon FSSAI Suggestion
कलिंगड सुया टोचून, पावडर घालून पिकवलाय का हे एका झटक्यात ओळखा; ‘या’ खुणा पाहूनच करा खरेदी
Overhydration: This is what happens if you drink too much water What Is Overhydration
सावधान.! जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी ठरते धोकादायक; वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे?
diy homemade natural chemical free floor cleaner recipe for a Healthier Home
फक्त २० रुपयांत घरच्या घरी तयार करा फ्लोअर क्लिनर; वापरताच आरश्यासारखी चमकेल फरशी
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स

अ‍ॅल्युमिनियम हे प्रामुख्याने आपल्या स्मरणशक्तीवर घातक परिणाम करते, असे जगात अनेक ठिकाणी झालेल्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. ब्रिटन, नॉर्वे, फ्रान्स आदी ठिकाणी हे संशोधन झाले आहे. अल्झायमर्स रीसर्च इन्स्टिटय़ूटचे संचालक डॉ. मायकेल वैनर यांनी केलेल्या संशोधनात अ‍ॅल्युमिनियमच्या अधिक वापराने स्मृतिभ्रंश निर्माण होतो, असे म्हटले आहे.

अ‍ॅल्युमिनियमच्या भांडय़ात अन्न शिजवणे घातक

युनिव्हर्सिटी ऑफ सिनसिनाट मेडिकल सेंटर येथे झालेल्या संशोधनात अ‍ॅल्युमिनियमच्या भांडय़ात शिजवलेल्या अन्नाचे सातत्याने सेवन केले तर त्यातील अ‍ॅल्युमिनियम २ ते ४ मिलिग्रॅम प्रत्येक वेळी शरीरात जाते. सामान्यत: एका दिवसात जास्तीत जास्त २० मिलिग्रॅम एवढे अ‍ॅल्युमिनियम शरीरात निधरेकपणे शोषले जाऊ शकते. आपल्या देशात अन्न शिजवण्यासाठी तसेच चहा बनविण्यासाठी अ‍ॅल्युमिनियमची भांडी मोठय़ा प्रमाणावर वापरली जातात. त्यातील अन्न किंवा चहा घेणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. हे लक्षात घेऊन त्या भांडय़ाचा सर्रास होणारा वापर थांबविणे गरजेचे आहे.

औषधातूनही अ‍ॅल्युमिनियम

आधुनिक वैद्यकाच्या काही जंटासिडस्मधून (अ‍ॅसिडिटीसाठीचे औषध) अ‍ॅल्युमिनियम हायड्रोक्साइड हा घटक धोकादायक प्रमाणात शरीरात जातो, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. आपल्याकडे थोडे पित्त वाढले की, अशा गोळ्या खाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी या गोळ्यांचा वापर कमीत कमी करणे आवश्यक आहे.

कुपोषण रोखण्यासाठी गेल्या २५ ते ३० वर्षांपासून अंगणवाडी योजना तसेच गेल्या १५ वर्षांपासून शालेय पोषण आहार योजना अशा विविध योजना सरकारच्या वतीने राबवल्या जातात. या योजनांमध्ये बहुतांशी ठिकाणी अन्न शिजवताना अ‍ॅल्युमिनियमच्या भांडय़ांचा उपयोग केला जातो. वरील संशोधनात सांगितलेला स्मृतिभ्रंशाचा आणि अ‍ॅल्युमिनियमचा संबंध लक्षात घेता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने स्टेनलेस स्टीलची किंवा चांगली कल्हई केलेली पितळेची पातेली वापरात येणे आवश्यक आहे. सोडियम अ‍ॅल्युमिनियम फॉस्फेट नावाचा घटक बेकिंग पावडरमध्येही वापरला जातो. विशेषत: काही केक्स तसेच काही प्रकारचे चीज बनविण्यासाठी याचा वापर केला जातो. याचे सेवनही बरीच मंडळी करत असतात. त्यातून आपल्या पोटात अ‍ॅल्युमिनियम जाते. काही रासायनिक शाम्पूमध्येही अ‍ॅल्युमिनियमचा वापर केला जातो. त्यामुळे नेहमी असे शाम्पू वापरणाऱ्यांनीही सावध राहणे गरजेचे आहे, कारण अ‍ॅल्युमिनियम हे शरीरामध्ये पोटातून, त्वचेवाटे तसेच फुप्फुसावाटेही शोषले जाते. त्याचबरोबर सौंदर्य प्रसाधनांमध्ये घाम न येण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काहींमध्ये अ‍ॅल्युमिनियमचा वापर होतो हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

‘मेडिकल जर्नल ऑफ ऑस्ट्रेलिया’ या नियतकालिकातील काहींमध्ये अ‍ॅल्युमिनियमचे प्रमाण आढळले. अर्थात अशुद्ध पाण्यातूनही अ‍ॅल्युमिनियम आपल्या पोटात जाऊ शकते. ‘युनिव्हर्सिटी ऑफ इन्स्टिटय़ूट ऑफ एन्व्हायरन्मेंटल स्टडीज्’मधील संशोधकांनी अ‍ॅल्युमिनियमच्या अति वापराबद्दल अशीच चिंता व्यक्त केली आहे. विशेषत: त्यामुळे फार मोठय़ा प्रमाणात अ‍ॅल्युमिनियम पोटात जाते, असे त्यांचे म्हणणे आहे. या सर्वाचा विचार करता अ‍ॅल्युमिनियम हा घटक आरोग्याला घातक असून स्मृतिभ्रंशाचे एक मोठे कारण आहे हे सिद्ध होते. त्यामुळे त्याचा वापर टाळणे हेच आवश्यक असून अ‍ॅल्युमिनियमची भांडी न वापरणे गरजेचे आहे.