आपल्या आजूबाजूला वृद्ध व्यक्तींच्या पडण्याच्या घटना आपण नेहमीच ऐकतो. पडल्यामुळे ज्येष्ठांना मोठय़ा दुखापतीला सामोरे जावे लागते आणि परिणामत: वृद्धापकाळात बराच काळ रुग्णालयातही घालवावा लागतो. या वृद्ध व्यक्ती नेमक्या कोणत्या कारणामुळे पडतात, त्याची शाष्टद्धr(२२९ीय मीमांसा करणे गरजेचे आहे.

वैद्यकीयदृष्टय़ा विचार केला तर माणसाचे शरीराची उंची आणि त्याच्या दोन्ही तळव्यांच्या आकाराच्या तुलनेत खूप जास्त आहे आणि त्यामुळे शरीराचा तोल सावरणे हे नेहमीच कठीण असते. माणूस उभा असताना किंवा चालत असताना शरिरातील अनेक गुंतागुतीच्या क्रियांमुळे शरीराचा तोल सांभाळला जातो. शरीरातील स्नायू, त्यांना जोडणारे सेन्सर, दृष्टी आणि कानात असलेल्या ग्रंथी या मेंदूला माहिती पुरवत असतात, त्यातून शरीराचा तोल सांभाळण्याची प्रक्रिया सुरू राहते. जेव्हा काही प्रसंगांमध्ये शरीराचा तोल ढळतो, तेव्हा मेंदूद्वारे शरीरातील अवयवांना तातडीने सूचना पोहोचतात आणि मनुष्याला पडण्यापासून वाचविले जाते.

mumbai, registered vehicle number, RTO, traffic jam, vehicular pollution
मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर
Budh Rahu Yuti 2024
१८ वर्षांनी एप्रिलमध्ये २ ग्रहांची महायुती; ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी? कोणाला मिळणार भरपूर पैसा?
Increase in average life expectancy of Indians
भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात वाढ
17 Days Later Surya Nakshatra Gochar In Revati These Three Rashi To Earn Money
येत्या १७ दिवसात ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत सूर्याची किरणं दाखवतील श्रीमंतीचा मार्ग; गुढीपाडव्यानंतर बदलणार नशीब

दरवर्षी सुमारे ४० ते ६० टक्के वृद्ध हे घरात किंवा बाहेर पडण्याचा घटना घडतात. त्यात ८० वर्षांहून अधिक वय असलेल्या वृद्धांचे प्रमाण अधिक आहे. घरात स्वच्छतागृहात,  स्वयंपाकघरात किंवा झोपण्याच्या खोलीत वृद्ध पडण्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर आहे. शरीराची हालचाल करताना ज्यावेळी गुरुत्वाकर्षण क्रियेत बदल घडतो, त्यावेळी उदा. जागेवरुन उठताना, वाकताना किंवा पायऱ्या चढ-उतार करताना पडण्याच्या घटना सर्रास घडतात. सहा महिन्यांतून दोनदा किंवा त्याहून अधिक अशा घटना घडल्यास त्याला वारंवार पडणे, असे म्हणता येईल.

पडण्याची कारणे –

शारीरिक आजार उदा. हाडे ठिसूळ होणे, पेरिफरल सेन्सरी न्युरोपथी, दृष्टीदोष, कर्णदोष तसेच मेंदूचे विकार उदा. सेरीब्रल स्ट्रोक्स, अल्झायमर, पार्किंनसन्स, डिमेन्शिआ रुग्णांबाबत असे प्रकार घडतात. वृद्धत्वामुळे शरीराच्या रचनेत आणि चालण्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या बदलांमुळेही पडण्याची क्रिया घडते.

बाह्य कारणे : आधाराची काठी, चाकाची खूर्ची, चपला, डोळ्यांचे सदोष लेन्स यामुळेही पडण्याचे प्रकार घडतात. काही वेळा औषधे किंवा कमी प्रकाश वा निसरडी जमीन यांसारखी कारणेही पडण्यासाठी पुरेशी ठरतात.

गुंतागूंत – वृद्धांच्या पडण्याच्या घटनांमुळे त्यांना अनेक नव्या संकटांना सामोरे जावे लागते. जखमा होणे, डोक्याच्या कवटीला मार लागणे किंवा मेंदूला दुखापत होणे यांसारख्या घटना घडू शकतात. त्याचबरोबर कंबरेच्या माकड हाडाला दुखापत होणे, घोटे आणि मनगटाला दुखापत होते. काही घटनांनंतर तर रुग्णालयात दाखल करणे, कायमचे अपंगत्व येणे, आपत्कालीन मृत्यू यासह रूग्णालयाचा आर्थिक भारही सोसावा लागतो.

म्हातारवयात पडण्याचा धोका हा सगळ्यांनाच असतो. अशी घटना घडल्यानंतर डॉक्टरांना रुग्णाची माहिती पुरविल्यास पुढील धोके आणि भविष्यातील पडण्याच्या घटना टळू शकतात. पडल्यानंतर दुखापतीची शक्यता ही तेथील परिस्थितीवर अवलंबून असते. क्रियाशील वृद्ध व्यक्तींच्या बाबत पडण्याची शक्यता जास्त असते मात्र कमी क्रियाशील असलेल्या वृद्धांना क्वचितच अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते. घरातील नेहमीची कामे करतानाही पडण्याच्या आणि दुखापतीच्या घटना घडण्याची शक्यता अधिक असते. त्यातही क्रियाशील वृद्धांच्या

बाबत हे प्रमाण जास्त असते. सातत्याने पडण्याच्या घटनांमुळे वृद्धांच्या मनात भीती निर्माण होते. वृद्धापकाळात शरीरातील हाडे नाजूक झालेली असतात. अशा हाडांना दुखापत झाल्यास किंवा कंबरेच्या खालील अवयवांना मार लागल्यास चालणे फिरणे अशक्य होवून जाते, तसेच यामुळे वृद्धांच्या आयुष्यावरही त्याचा परिणाम होतो.

ज्यांच्या घरात वृद्ध आहेत किंवा जे वृद्ध एकटे राहतात, ते या घटना टाळू शकतात. धोक्याच्या शक्यतांचा पूर्वीच विचार केलेला असावा. योग्य प्रकाश, जिन्यांना आणि बाथरूममध्ये कठडे, घसरणार नाहीत, अशा फरशा असतील तर घरात पडण्याच्या घटना टळू शकतात. यासह रक्त आणि शरीरातील साखर, रक्तदाबाची नियमित तपासणी, औषधांच्या दुष्परिणामांची माहिती, कानाची तपासणी हे नियमित करुन घेणे आवश्यक आहे.

याचबरोबर कुटुंबातील किंवा काळजी घेणा-यांना पडल्यानंतर काय करावे याचे प्रशिक्षण देण्याचीही आवश्यकता आहे. हाड मोडण्यासारख्या घटना टाळण्यासाठी हाडे ठिसूळ होणारम्य़ा ऑस्टियोपॉरोसिससारख्या आजाराची तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. वरिष्ठ नागरिकांनीही स्नयूंचे कमी ओढाताण करणारे व्यायाम करावेत, तसेच ताय ची (या व्यायाम प्रकारात योग, ध्यान यासारखे प्रयोग केले जातात) सारखे व्यायाम करावेत. तोल राखला जावा यासाठी आधाराशिवाय चालण्यासारखे व्यायाम करावेत. ज्यांचा तोल आणि चालण्याची ढब चांगली आहे, त्यांनी सायकल चालविणे किंवा पोहणे यासारखे व्यायाम केल्यास त्याचा फायदा होवू शकेल. ५० वर्षांहून अधिक वर्ष असलेल्यांनी नियमित काळाने टीटीचे इंजेक्शन घ्यायलाच हवे.

डॉ. पी.जे. खलप

ज्येष्ठांच्या आरोग्याचे तज्ज्ञ