ज्युलिअर डिसल्वा, फुटबॉल प्रशिक्षक 

शारीरिक व्यायामासाठी धावणे, खेळणे, योगा असे वेगवेगळे प्रकार केले जातात. त्यातील खेळ या प्रकारामुळे शारीरिक व्यायामाबरोबरच मानसिक व्यायामही होत असतो. त्यामुळे फुटबॉलसारख्या एखाद्या मैदानी खेळाच्या सततच्या सरावामुळे चांगला फिटनेस राखता येतो.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
homemade mango ice cream recipe
Mango Ice-cream: मुलांसाठी घरच्या घरी बनवा आंब्याचे थंडगार आइस्क्रीम! वापरा फक्त ‘हे’ तीन पदार्थ
What Are The Seven Types Of Rest how to incorporate these types of rest In Your Life Follow This Tips ltdc
आराम म्हणजे फक्त झोप घेणे का? विश्रांतीचे नेमके किती आहेत प्रकार? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
Use coco peat to flower your home garden
घरातील बाग फुलवण्यासाठी वापरा कोकोपीट, घरच्या घरी कसे तयार करावे कोकोपीट

शारीरिक व्यायाम

फुटबॉल या खेळासाठी धावणे ही महत्त्वाची कृती असते. फुटबॉल खेळत असताना पायाने चेंडू दूर ढकलत दुसऱ्या खेळाडूंच्या हाती लागू न देता पुढे नेला जातो. यासाठी हा खेळ खेळत असताना खेळाडू मैदानभर धावत असतो. दैनंदिन जीवनात व्यायाम म्हणून एकाच रस्त्यावरून धावणे किंवा चालणे कंटाळवाणे वाटू शकते. मात्र हा खेळ खेळत असताना चेंडू विरोधी गटाच्या जाळीपर्यंत नेणे हे ध्येय दिलेले असल्यामुळे ते पूर्ण करीत असताना धावण्याचा कंटाळा येत नाही. धावणे या प्रकारामुळे शरीराचा व्यायाम होतो आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. धावल्यामुळे शरीराच्या क्षमतेत (स्टॅमिना) वाढ होते. याशिवाय फुटबॉल या खेळात चेंडू पायाने पुढे ढकलावा लागतो. यात सतत दिशा बदलावी लागते. यामुळे खेळाडू विविध दिशेने जलद गतीने धावण्याचा व्यायाम करतात. या व्यायामामुळे अधिक जलग गतीने चेंडू हलविणे शक्य होते. यात जलद गतीबरोबरच चपळाईचीही आवश्यकता असते. त्यामुळे फुटबॉल खेळत असताना पायांच्या स्नायूंनाही बळकटी मिळते. पायाच्या साहाय्याने चेंडू भिरकावताना अंतर, वेग आणि नेमके ठिकाण या तीनही गोष्टीची सांगड घालावी लागते. त्यामुळे पायामध्ये फक्त ताकद असून चालत नाही तर तितकेच नियंत्रण आणि परिस्थितीनुसार कृतीचीही गरज असते. या व्यायामामुळे तळपाय, गुडघ्याच्या वरच्या पायाचे स्नायू बळकट होतात.

मानसिक आरोग्य

मैदानी खेळांमध्ये शारीरिक व्यायामाबरोबरच मानसिक आरोग्यही राखले जाते. आपल्याकडे आलेला चेंडू पायाने मारत त्याला विरोधी गटाच्या जाळीपर्यंत नेण्याच्या काळात खेळाडूला अतिशय सतर्क राहावे लागते. त्या चेंडूवर लक्ष केंद्रित करीत असतानाच विरोधी गटातील खेळाडूंनी तो चेंडू घेऊ  नये यासाठी शक्कलही लढवावी लागते. आपल्या गटातील दुसऱ्या खेळाडूस चेंडू द्यावयाचा असताना परिस्थिती लक्षात घेऊन चटकन निर्णय घ्यावे लागतात. या घडामोडीतूनच मेंदूची क्षमता वाढते. गती, एकाग्रता यांसारख्या क्रिया एकाच वेळी कराव्या लागतात. शरीरातील विविध अवयवांचा वापर एकाच वेळी करावा लागत असल्यामुळे अवयवांचा समन्वय राखण्याची सवय लागते. त्यामुळे या खेळातून शारीरिक व्यायाम तर होत असतोच, त्याशिवाय मनोबलही वाढीस लागते. याचा परिणाम खेळाडूच्या दैनंदिन जीवनातही होत असतो.

शैक्षणिक क्षेत्रात वावरत असतानाही या कौशल्याचा खेळाडूला फायदा होतो. मात्र यासाठी खेळात सातत्य असणे आवश्यक आहे. खेळणे आणि खेळापूर्वी आवश्यक असलेला व्यायाम केल्याने चांगले शरीर संपादन करता येऊ  शकते. दररोज नित्यनियमाने खेळ खेळल्यास व्यायामासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज भासत नाही. फुटबॉल या खेळात क्षणाक्षणाला खेळाडूसमोर आव्हाने येत असतात. खेळ तुम्हाला प्रत्येक क्षणाला काही तरी मिळाल्याचा आनंद देत असतो. हा व्यायामप्रकार तुम्हाला आनंदी ठेवतोच, त्याबरोबर अपयश पचवण्याची शक्तीही देतो. फुटबॉल हा सामूहिक खेळ आहे. गटाला सोबत घेऊन खेळत असल्यामुळे सर्वाना एकत्र घेऊन काम करण्याची सवय लागते.

पोषक आहार

खेळताना आहारावरही लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असते. बाहेरील तेलकट, तूपकट, फास्टफूड अन्न टाळावे. चौकस आहार असावा. यात सर्व प्रकारच्या भाज्या, फळे, मांस यांचा समावेश असावा.

शरीर सुदृढ

तरुण वयापासून खेळाची सवय असल्यामुळे वृद्धापकाळातही शरीर चांगली साथ देते. वृद्धापकाळी हाडांच्या व अवयव निकामी होण्याच्या अनेक समस्या निर्माण होत असतात. मात्र सातत्याने खेळात रमणारी व्यक्ती वयाच्या ७० किंवा त्याहून अधिक काळापर्यंत शारीरिकदृष्टय़ा कणखर राहू शकते. खेळासाठी आवश्यक असलेला आहार व व्यायाम यामुळे अवयवांची पुष्टी झालेली असते. मात्र वृद्धापकाळात खेळ जमत नसल्यास हलका व्यायाम किंवा चालणे, धावणे सुरू ठेवले तर वृद्धापकाळही आनंदात जाऊ  शकतो.