हल्ली अनेक स्त्रियांना थायरॉईड या कंठातील ग्रंथीचा त्रास जाणवतो. या ग्रंथीचे कार्य व त्यातील संतुलन समजून घेतले तरी ते आरोग्यासाठी हितावह आहे.

थायरॉईड ग्रंथीतून प्रामुख्याने दोन संप्रेरके स्रवतात. थायरॉक्सीन, टेट्राआयोडाईड संयुग म्हणजे टी ४. यात ६५ टक्के आयोडीन असते. याचे कार्य हळू पण दीर्घकाळ चालते. यामुळेच लहान मुलांच्या बुद्धीची वाढ, चयापचय क्रिया सुरळीत चालते. दुसरे संप्रेरक म्हणजे ट्रायआयोडोथायरोनिन म्हणजे टी ३. हे जलद परंतु कमी काळापुरते कार्य करते. थायरॉईड ग्रंथीचे काम हे बाळ गर्भात असल्यापासून सुरू होते. त्यामुळे मातेच्या गर्भारपणी थायरॉईड ग्रंथीची अकार्यक्षमता आढळली तर ती वेळीच हाताळणे जरुरीचे आहे. या मुख्य संप्रेरकाखेरीज आणखी एक संप्रेरक- कॅल्सिटोनिन- हे रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण कायम राखण्याचे कार्य करते.

Ashish patil shared experience of those who perform lavni and dance in women's clothes sometimes being raped
स्त्री पात्र निभावणाऱ्या पुरुषांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं; ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सांगितला अनुभव, म्हणाला, “काहीजणांवर बलात्कार…”
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’

आपल्या शरीरातील या कंठस्थ ग्रंथीचे कार्य संपूर्णत: स्रावावर अवलंबून आहे. मेंदूतील हायपोथॅलॅमस हा त्याचे नियंत्रण करतो. त्यातून स्रवणारे थायरोट्रॉपीन हे पिट्युटरी या वाटाण्याच्या आकाराच्या ग्रंथीला कार्यान्वित करते. त्यातून पाझरणारे स्राव (थायरॉइड स्टिम्युलेटिंग संप्रेरक) थायरॉईड ग्रंथीला चालना देते व त्यातून वर नमूद केलेली टी ३, टी ४ ही संप्रेरके स्रवतात. थायरॉईड स्टिम्युलेटिंग संप्रेरक कमी प्रमाणात तयार झाले तर ही ग्रंथी अधिक कार्यशील होते व गरजेपेक्षा अधिक टी ४ तयार करीत राहते. या हायपरथायरॉईड अवस्थेत स्त्री रुग्णास छातीत धडधड जाणवते, दम लागतो, वजन कमी कमी होत जाते, मासिक पाळी अनियमित होऊन कधी कधी येतच नाही, घाम येण्याचे प्रमाण वाढते, मानसिक संतुलन बिघडते, चयापचय क्रिया असंतुलित राहते. याउलट थायरॉईड ग्रंथी अकार्यक्षम असेल तर आळशीपणा येतो, झोप अधिक येते, नराश्य जाणवते, अंग दुखत राहते, कधी कधी हातापायांवर सूज येते, वजन वाढत जाते, मासिक पाळी अनियमित होते, कधी कधी स्तनाग्रातून द्रव पाझरतो, पायात पेटके येतात, थोडेसे काम केल्यावरही थकवा जाणवतो.

हायपर व हायपोथॉयरिडझम ही अवस्था म्हणजे स्वयंचलित प्रतिकारकशक्ती निर्माण करण्याच्या अवस्थेत बिघाड म्हणूनच याला ‘ऑटोईम्युन डिसीज’ म्हटले जाते.

या प्रत्येक अवस्थेतील औषधे वेगवेगळी आहेत. ती घेताना स्त्रीरुग्णाने दक्ष राहणे आवश्यक आहे.

  • एकदा औषध व त्याचे प्रमाण ठरविल्यावर दर दोन-तीन महिन्यांनी त्यात कमी-जास्त बदल होऊ शकतो.
  • या प्रकारची औषधे घेताना लोह, कॅल्शियमसाठी किंवा आम्लपित्त, क्षयरोग, आकडी येऊ नये म्हणून घेण्याची औषधे तसेच इस्ट्रोजेन-प्रोजेस्टेरॉन तत्सम द्रव्ये असलेली औषधे एकत्रित घेऊ नयेत. थायरॉईडसंबंधित औषधे सकाळी उठल्यानंतर लगेच घेऊन मग अध्र्या तासाने इतर पदार्थाचे सेवन करावे.
  • या औषधांचे प्रमाण ठरविताना प्रत्येक स्त्री रुग्णाचे वजन, वजन व उंचीचे प्रमाण, चयापचय वेग, गर्भारपणाची अवस्था, हृदयरोग असल्यास त्यावेळची स्थिती, इतर आजारपणसदृश अवस्था, काही वेळेस अ‍ॅलर्जीचाही विचार करावा लागतो. गोळी स्वरूपात औषधे घेताना ती टॅबलेट आहे वा जिलेटीन आवरणातील आहे याचा विचार करावा लागतो. कारण ही औषधे पुढील आयुष्यभर कमी-अधिक प्रमाणात चालू ठेवणे भाग असते.

थायरॉईड ग्रंथी व वयोपरत्वे बदल

  • वयोपरत्वे हायपर वा हायपोथॉयरॉईड या अवस्थेत बदल होत नाही. मात्र वयोपरत्वे होणारा शारीरिक बदल, वयानुसार एखादा प्रदीर्घ आजार झाल्यास, रक्तदाब, मधुमेह, संधिवात, पक्षाघात, तत्सम आजारातील घेण्यात येणारी औषधे याचा विचार करावा.
  • ६० पेक्षा अधिक वय असेल तर औषधांत बदल नक्कीच होतो. वाढत्या वयापरत्वे औषधांचे प्रमाण कमी करावे, अन्यथा रक्तवाहिन्यांचा आजार, हृदयरोग, मूत्रिपड अकार्यक्षमता, यकृताचा आजार अशा गोष्टी अनुषंगाने उद्भवतात. याशिवाय अ‍ॅट्रिअल फ्रीबिलेशन, डोळ्यांवर परिणाम, विशेषत हाडांमधील ठिसूळता वाढू शकते. म्हणूनच वयाच्या साठाव्या वर्षांनंतर प्रत्येकाने आपण घेत असलेल्या गोळ्यांचे प्रमाण, रक्ततपासणी, डॉक्टरी सल्ला यांचा विचार करावा.

डॉ. रश्मी फडणवीस,  स्त्रीरोगतज्ज्ञ

rashmifadnavis46@gmail.com