आपल्या शरीरातील हृदय हा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. हृदयाला जपणं म्हणजे त्याच्या कामात येणाऱ्या अडथळ्यांना दूर करणं. रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या आकुंचित होणं किंवा त्यांच्या मार्गात काही साठल्याने रक्त वाहण्याला अडचण येणं म्हणजे हृदयाचे अडथळे. जगातील एकूण मृत्यूंपैकी एकतृतीयांश मृत्यू हृदयविकारामुळे होतात.

आपलं हृदय दर मिनिटाला साधारण ७० वेळा धडकतं. उंदरासारख्या लहान सस्तन प्राण्याचं हृदय मिनिटाला ६०० वेळा धडकतं तर महाकाय हत्तीचं हृदय मिनिटाला फक्त ३० वेळा धडकतं! उंदाराचं आयुष्यमान असतं ४ र्वष तर हत्तीचं सुमारे ८६ र्वष. म्हणजे संपूर्ण आयुष्यात त्यांचं हृदय सुमारे २५० कोटी वेळा धडकतं. आता हाच निकष माणसांबाबत लावला तर ७० वर्षांच्या आयुष्यात माणसाचं हृदय २५० कोटी वेळा धडकतं. सदासर्वकाळ, अजिबात न थांबता हृदय काम करत असतं. त्यामुळच त्याची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे.

What Mahesh Manjrekar Said About Veer Savarkar Film
Exclusive : ‘वीर सावरकर’ चित्रपट का सोडला? अखेर महेश मांजरेकरांनी सांगितलं कारण, म्हणाले, “रणदीप हुड्डाने…”
Nitish Bharadwaj Second Wife Ias Officer Smita Ghate
“१३ वर्षे शारीरिक संबंध नाही, मी पुण्याला…”, नितीश भारद्वाज यांचं विधान; म्हणाले, “मला घटस्फोट हवाय, कारण…”
Uddhav Thackeray, Mahayuti, campaign,
उद्धव ठाकरे यांना आयतेच कोलीत
Engineer bribe Dhule district
धुळे जिल्ह्यात ग्रामसेविकेसह अभियंता लाच स्वीकारताना जाळ्यात

हृदयविकाराची माहिती घेण्यासाठी डॉक्टर काही वैद्यकीय चाचण्या सुचवतात. रक्तातील होमोसिस्टीनचं प्रमाण ही त्यांपैकीच एक चाचणी. होमोसिस्टीन हा घटक अन्नातून मिळत नाही तर तो शरीरात तयार होत असतो. साधारण ८० वर्षांपूर्वी या घटकाचा शोध लागला. एका विशिष्ट जनुकीय आजारात शरीरातलं होमोसिस्टीनचं प्रमाण खूप वाढतं हे १९३२ साली आढळून आलं. त्यानंतर ७०च्या दशकात त्याचा हृदयविकाराशी असलेला संबंध उजेडात आला. या काळापर्यंत हृदयविकार होण्याची शक्यता वाढवणाऱ्या अनेक घटकांचा शोध लागला होता. हे घटक म्हणजे धूम्रपान, उच्च रक्तदाब, रक्तातील वाढलेलं कोलेस्टेरॉल, मधुमेह. पण या साऱ्यांसोबतच एका नवीन घटकावर प्रकाश पडला होता तो म्हणजे रक्तातलं होमोसिस्टीन.

शरीरातील दोन महत्त्वाच्या अमिनो आम्लांच्या मधला दुवा म्हणजे होमोसिस्टीन. ‘ब’ जीवनसत्त्वामुळे होमोसिस्टीनचे सीस्टिनमध्ये रूपांतर होतं. रक्तात ब जीवनसत्त्व पुरेशा प्रमाणात उपलब्ध असेल हे रूपांतर होत राहतं आणि होमोसिस्टीनचं प्रमाण मर्यादित राहतं. अर्थातच ही जीवनसत्त्वं कमी पडलं तर रक्तातील होमोसिस्टीन वाढू लागतं. सामान्यत: ३० मायक्रोमोल्स प्रति लिटर हे प्रमाण योग्य मानलं जातं. यापेक्षा अधिक प्रमाण म्हणजे ३० ते १०० किंवा १००पेक्षा अधिक हे धोकादायक ठरू शकतं.

रक्तवाहिनीचा आपण आडवा छेद घेतला तर एकूण तीन स्तर दिसतात. यांपैकी आंतरस्तर हा सर्वात महत्त्वाचा थर. याचं काम म्हणजे रक्ताला कोणत्याही अडथळ्याविना वाहू देणं. या स्तराच्या आतील भागावर रक्तातल्या कोणत्याही पेशी किंवा इतर घटक चिकटू शकत नाहीत. त्यामुळे रक्त विनाअडथळा वाहत राहतं. शिवाय आंतरस्तरातील पेशी एक विशिष्ट वायू- नायट्रिक ऑक्साइड (एनओ)- सतत तयार करत असतात. या वायूमुळे मध्य व बाह्य़ स्तरातल्या स्नायूपेशी प्रसरण पावतात. त्यामुळे रक्तदाबावर नियंत्रण राहतं.

रक्तातील होमोसिस्टीन वाढलं तर काय घडू शकतं? होमोसिस्टीनचं ऑक्सिडीकरण होऊन दोन नवीन घटक तयार होतात. एक म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साइड व दुसरा सुपर ऑक्साइड रॅडिकल.

होमोसिस्टीनमधील हायड्रोजन पेरॉक्साइड व सुपर ऑक्साइड रॅडिकल हे दोन्ही घटक शरीराला घातक असतात. दोनही घटक अत्यंत क्रियाशील असतात. यांपैकी सुपर ऑक्साइड रॅडिकल या घटकाकडे तर स्वैर इलेक्ट्रॉनच्या रूपात जणू एक शस्त्रच असते. या शस्त्राने कोणत्याही पेशीला सहज इजा पोहोचू शकते. जर हा घटन नायट्रिक ऑक्साइडशी संयुग पावला तर नवे उपद्रवी पदार्थ तयार होतात.

..तर हृदयविकार

मुख्य म्हणजे यामुळे रक्तातील नायट्रिक ऑक्साइडचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे रक्तवाहिनी आकुंचन पावायला लागते. तसेच हायड्रोजन पेरॉक्साइड व सुपर ऑक्साइड रॅडिकल या घटकांमुळे आंतरस्तराला छेद जातात. त्यामुळे सुरक्षित वाहणाऱ्या रक्ताला अडथळे, खाचखळगे निर्माण होऊ लागतात. मग त्यात रक्तातले अन्य घटक पेशी, प्रथिने, मेदयुक्त घटक हे अडकण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू होते. मग तेथे रक्तवाहिनीचा मार्ग अधिकच लहान लहान होत जातो व रक्तप्रवाह पूर्ण थांबूही शकतो. ही वाहिनी जर हृदयाला रक्त पुरवणारी असेल तर याचा परिणाम हृदयविकाराचा झटका येण्यात होईल. जर ही रक्तवाहिनी मेंदूला रक्त पुरवत असेल तर माणसाला लकवा होईल. त्यामुळेच रक्ताची चाचणी करताना होमोसिस्टीनची चाचणी केली जाते. प्रमाण वाढलं असेल तर डॉक्टर फॉलिक अ‍ॅसिड व ब जीवनसत्त्वांच्या गोळ्या घेण्यास सांगतात. हिरव्या पालेभाज्यांमधून फॉलिक अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात मिळू शकतं. मांसाहार, दुधाचे पदार्थ, सोयाबिन यातून बी १२चा पुरवठा होतो. तर विविध फळांमधून बी ६ मिळतं. हे सर्व पदार्थ आपल्या आहारात असले की होमोसिस्टीनसारख्या घटकावर नियंत्रण ठेवण्याचा नैसर्गिक उपाय ठरू शकतो.

rrvartak@gmail.com