खारीक माहीत नाही असा माणूसच विरळ. नव्याने जन्माला आलेल्या बालकाला नऊ महिन्यांनंतर किंवा अगोदरही जर बाहेरचे दूध द्यावयाचे असले तर त्या दुधातून खारीक उगाळून, मगच ते दूध देण्याची प्रथा महाराष्ट्रात खेडोपाडी आहे. वरवर पाहता कृश असणारी खारीक नियमितपणे सेवन केली तर तुमचे-आमचे मानवी शरीर अत्यंत काटक व भरपूर श्रम करायला ताकद देते. बाजारात एकदम कडक खारीक व पिवळसर साखरी खारीक अशा दोन जाती आहेत. खूप कडक खारीक ही गुणांनी चांगली, पण त्याला लवकर कीड लागते. त्याऐवजी सुकामेवा खाणारे लोक पिवळी साखरी खारीकच पसंत करतात. एकेकाळी आपल्या देशात खारीक अफगाणिस्तान व बलुचिस्तान या उष्ण हवामानाच्या पर्वतीय प्रदेशांतून येत असे. हिंदी भाषीय खारकेला ‘छुआरा’ या शब्दाने संबोधतात.

दिवसभर भरपूर श्रम करणाऱ्या श्रमिकांसाठी खारीक हे वरदान आहे. सकाळी एक खारीक खाऊन बाहेर पडले आणि चार-सहा तास पोटात काही नसले तरी निभावून नेता येते. ज्या स्त्रियांची मासिक पाळी अनियमित आहे, त्यांनी सकाळ-संध्याकाळ रोज एक खारीक खावी. मासिक पाळी निश्चयाने सुधारते. ज्यांचे वजन काही केल्या वाढत नाही, त्यांनी खारकेचे चूर्ण करून गरम तुपात सोडावे आणि ते पुरेशा प्रमाणात खावे. कृश बालकांना सशक्त करण्यासाठी साखरी खारकेचे तुकडे नियमितपणे द्यावेत. वृद्ध व अति दुर्बल व्यक्तींसाठी खारीक हे उत्तम टॉनिक आहे. लहान मुलांना दात येत असताना खारकेचे तुकडे जरूर चावून खाण्यास सांगावे. त्यामुळे दातांचे आरोग्य सुधारते. खारकेपासून तयार केलेला ‘जोशकाढा’ अति कृश मुलांना आणि वृद्धांना इन्स्टंट ताकद देतो. इथे मला या निमित्ताने मी ज्या अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयात शिकलो, त्याच्या संस्थापकांची म्हणजे स्व. वैद्य हरीभाऊ परांजपे यांची आठवण येते. सुमारे ४० वर्षांपूर्वी हरीभाऊ परांजपे लहानसहान देणग्या गोळा करण्यासाठी घरोघर जायचे. दुपारच्या जेवणाला टाळा! मधल्या वेळेत दोन खारकांवर गुजराण करून राहायचे. असे आयुर्वेदातले गुरुजी आजही नाहीत, भविष्यातही होणार नाहीत. हरीभाऊ परांजपे यांना अनेक प्रणाम!

Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
nashik police conduct combing operation across the city due to festivals celebrations
नाशिक : सण, उत्सवांमुळे अवैध शस्त्रसाठा शोध मोहीम
Rsmssb Recruitment 2024
सरकारी नोकरी करण्याची ‘ही’ शेवटची संधी, ‘या’ विभागात ६७९ पदांसाठी बंपर भरती, लगेच करा अर्ज

ज्या व्यक्ती भरपूर शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी व्यायाम करतात, सूर्यनमस्कार घालतात, जोर बैठका घालतात, त्यांच्यासाठी डिंकलाडूचा वापर मोठय़ा प्रमाणावर होत असे. त्यातील खारीक हे प्रमुख घटकद्रव्य आहे.