वृद्धापकाळात ऐकू न येणे, चालण्यास त्रास होणे, तोल जाणे यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्याचबरोबर सर्वात मोठी समस्या भेडसावते ती स्मृतिभ्रंशाची. अनेकदा कित्येक प्रसंग, नावे वृद्धांच्या विस्मरणात जातात. आपण केलेली कृती ते कालांतराने विसरून जातात. वृद्धापकाळात सर्वानाच या आजाराला सामोरे जावे लागते, असे असले तरी त्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेतला तर उपचारांमुळे ही समस्या थोडीफार आटोक्यात येऊ शकते. स्मृतिभ्रंश झालेल्या वृद्धांना कशी वागणूक दिली जावी, यावर काय उपचार करता येऊ शकतात, याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांकडून घेतली जाऊ शकते.

वृद्धांमध्ये असलेल्या स्मृतिभ्रंशाच्या आजाराला वैद्यकीय भाषेत ‘डेमेनशिया सिंड्रोम’ असे संबोधले जाते. वाढत्या वयामुळे मानवी मेंदूंच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. हा परिणाम प्रामुख्याने स्मृती, भाषा, गणित, प्रश्न सोडविणे यांसारख्या बौद्धिक कार्यावर होतो. या बौद्धिक ऱ्हासाबरोबरच वृद्धांच्या स्वभावात, वागणुकीत आणि व्यक्तिमत्त्वातही बदल होतो. वयपरत्वे बौद्धिक झीज झाल्यामुळे होत असलेल्या या बदलांबरोबरच, विस्मरणाच्या या मानसिक विकारात रक्तवाहिन्या, चयापचय प्रक्रियेवरही परिणाम होतो. ही सर्व लक्षणे वाढत्या वयानुसार अधिक गंभीर होतात आणि हळूहळू या आजाराची लक्षणे प्रकर्षांने दिसायला लागतात. मात्र बऱ्याचदा याची पुढची पायरी म्हणजे अर्धागवायूचा झटकाही असू शकतो. स्मृतिभ्रंशाचे मूळ कारण शोधून, योग्य ती उपचारपद्धती अवलंबल्यास वयोवृद्धांचे जगणे अधिक सुकर होऊ शकते.

World Parkinson's Day 2024 Parkinson's disease Symptoms and causes
World Parkinson’s Day 2024 : कंपवाताच्या १० टक्के रुग्णांमध्ये आनुवंशिक कारणाने आजार; डॉ. चंद्रशेखर मेश्राम म्हणतात…
Loksatta explained Due to the continuous increase in mustard production, the discussion of yellow revolution is starting
विश्लेषण: देश पिवळय़ा क्रांतीच्या दिशेने..
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!
history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा

दिवसेंदिवस स्मृतिभ्रंश हा समाजातील वाढत्या चिंतेचा प्रश्न ठरत आहे. ६५ वर्षांहून अधिक वय असलेल्या वृद्धांमध्ये या विकाराचे प्रमाण अधिक प्रमाणात आहे. विकारग्रस्त वृद्ध व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांचा यामुळे मानसिक, आíथक आणि सामाजिक ताणांचा सामना करावा लागतो. घरातील वातावरण बिघडते. मात्र घरातील व्यक्तींनी वृद्धांमधील आजाराबाबत माहिती घेतली आणि त्यानुसार उपचार सुरू केले तर आजारावर नियंत्रण आणण्याबरोबरच हे ताणतणावही टाळता येऊ शकतील.

स्मृतिभ्रंशाचे प्रकार आणि त्यांची वैद्यकीय चिकित्सा

स्मृतिभ्रशांचे विविध प्रकार आहे. त्यातील बहुतांश प्रकारांमध्ये सर्वसाधारणपणे कमी-जास्त फरकाने लक्षणे सारखीच आढळतात. फ्रंटोटेम्पोरल, सबकॉर्टकिल सिन्ड्रोम्स, वॅस्क्युलर, टॉक्सिक मेटाबॉलिक कंडिशन, मायलिन डिसऑर्डर, नॉर्मल प्रेशर हायड्रोसेफॉलस, निओप्लास्टिक, इन्फेक्शन रिलेटेड (संसर्ग), ट्रॉमॅटिक, सायक्रेटिक डिसऑर्डर, इन्फ्ल्युमेटरी हे स्मृतिभ्रशांचे प्रकार आहेत.

शारीरिक आणि मानसिक परिणाम

* सर्वसाधारणपणे या आजारात विस्मरण वाढते. माणसे ओळखता येत नाहीत. बोलणे आणि व्यक्त होणे अवघड होते. व्यक्तिमत्त्वात बदल, औदासिन्य आणि नराश्य वाढीस लागते.

* अनेकदा एकाग्रता हरविते. एखादी गोष्ट सांगितल्यानंतर ती पटकन कळत नाही, समजण्यास वेळ लागतो. गतस्मृतीतील एखादी घटना आठवायची असेल तर पटकन आठवत नाही. इतरांनी मदत केल्यानंतर आठवतात. सोपे प्रश्न सोडवतानाही गोंधळ उडतो. अनेकदा मान मागच्या बाजूस टाकली जाते.

* मेंदूला होणारा रक्तपुरवठा अचानकपणे कमी होतो. मेंदूच्या कोणत्या भागावर आणि याचा किती परिणाम झाला आहे, त्यानुसार याची तीव्रता ठरते. दिवसेंदिवस या विकारात वाढ होत जाते. दैनंदिन कामकाजावर याचा परिणाम होतो.

* मधुमेह, थायरॉईडसारख्या आजारांसाठी घेत असलेल्या औषधांचे वृद्धांवर दुष्परिणाम पाहायला मिळतात. विटामिन ‘बी १२’च्या कमतरतेमुळेही हे घडते. मद्यपि वृद्धांमध्येही ही लक्षणे पाहायला मिळतात. हातपाय थरथर कापतात.

* एड्स या आजारामुळे किंवा शरीरात अधिक क्षार जमा झाल्याने बद्धिक क्षमतेवर परिणाम होतो. काही आनुवांशिक रोगांमुळेही हे परिणाम जाणवतात.

* मेंदू किंवा मेंदूच्या ज्या भागात रोगसंक्रमण होऊन कर्करोग होतो किंवा मेंदूच्या ज्या भागास हा आजार जडतो, त्यानुसार परिणाम जाणवतो.

* वृद्धापकाळात पडल्यामुळे डोक्याला दुखापत झाल्याचे प्रकार घडतात. अशा प्रसंगांनंतर वृद्धांच्या वागणुकीत बदल होतो. बोलताना विशेषत: वाक्यरचना करताना अडचण येते. डोक्याला मार लागलेल्या वयोवृद्धांमध्ये ही लक्षणे आढळतात.

डॉ. प्रकाश खलप

drpjkhalap@gmail.com