रजोनिवृत्तीपूर्व काळातील अनेक लक्षणांचा आपण विचार केला. मूत्रदाह व मूत्ररोगजंतुसंसर्ग दुर्लक्षित राहिल्यास पुढील काही वर्षांत याचा त्रास होऊन स्त्रीरुग्ण बेजार होऊ शकतो. असाच त्रास स्त्रीस गरोदरपणीही होतो.

शरीररचनेनुसार मूत्रदाह व तेथील रोगजंतुसंसर्ग याचा त्रास अगदी वयाच्या आठ वर्षांपासून ते ऐंशी वर्षांपर्यंत स्त्रियांना केव्हाही होऊ शकतो. रजोनिवृत्तीनंतर होणारा त्रास हा इस्ट्रोजेन संप्रेरक द्रव्याच्या अभावामुळे होत असल्याने यात वारंवार लघवी होणे, विशेषत: मूत्राशयाचा भाग हा योनीमार्गातून खाली येणे, लघवी मूत्राशयात काही काळ राहणे, योनीमार्गास कंड सुटणे, लघवी होताना व झाल्यानंतर मूत्रदाह होणे अशा प्रकारे प्रदíशत होतो.

या सर्व बाबतीतील अतिशय त्रासदायक म्हणजे लघवी वारंवार होणे, त्यावर कोणत्याही प्रकारचा ताबा नसणे. वयोपरत्वे मूत्रनलिकेत होणारा बदल हे यामागचे एक कारण. मूत्रनलिकेच्या आतील आवरणातील पातळपणा, मूत्रनलिकेतील स्नायूतील होणारे बदल, मूत्र-उत्सर्जति क्रियेत कमी दाबानेही मूत्रनलिकेचे तोंड उघडणे तसेच मूत्राशयाचा व उत्सर्जति मूत्रनलिकेच्या कोनातील काही अंशांचा फरक यामुळे उत्सर्जति होणाऱ्या मूत्रावर ताबा राहात नाही. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे वारंवार होणारा रोगजंतुसंसर्ग.

मूत्रदाहाच्या उपचारांबाबत त्याच्याशी संबंधित इतर आजारांचाही विचार करायला हवा. प्रथम त्या आजारांसाठी-विशेषत: मधुमेहींच्या रुग्णाबाबत मधुमेह आटोक्यात हवा- घेण्यात येणारी औषधे ही युरीन कल्चर सेन्सिटीव्हीटीनंतर कमीत कमी १० ते २० दिवस घेण्यात आल्यास हा त्रास कायमचा बंद होऊ शकतो हे अनेकांना माहीत नसतं. तसेच त्यानंतरही २ आठवडय़ांनंतर मूत्रतपासणी करून घ्यावी. काही वेळेस योनीमार्गातील रोगजंतुसंसर्गाकडेही लक्ष द्यावे लागते.  प्रत्येक रुग्णास रुग्णालयात भरती होण्याची गरज नसली तरी योग्य प्रमाणात आवश्यक तितके दिवस आवश्यक प्रमाणात औषध अपरिहार्य आहे.

मूत्रदाहाचा विकार हा प्रत्येक स्त्री रुग्णास होत असला तरी डोळसपणे औषधोपचार करून तो वेळीच आटोक्यात आणता येतो.

मूत्रदाह व रोगजंतुसंसर्ग हा कशा प्रकारे प्रदर्शित होतो?

मूत्र उत्सर्जति करताना वारंवार बेंबीखाली दुखते व उत्सर्जति झाल्यानंतरही दाह होतो तसेच मूत्रउत्सर्जन क्रियाही वारंवार होऊ लागते. स्त्रीरोगतज्ज्ञाकडे न जाता इतर डॉक्टरांकडे गेलात तर लगेचच औषधे सुरू केली जातात, परंतु अशी लक्षणे दिसल्यास साधी औषधे देऊन त्यानंतर कल्चर करणे आवश्यक असते. कल्चर सेन्सिटीव्हीटी केल्यानंतरच योग्य ते औषध (प्रतिजैविक) सुरू करावे. असे न केल्यास औषधोपचार अयोग्य होतो.

* मूत्रनलिकेचा वा मूत्राशयाचा रोगजंतुसंसर्ग होण्याची कारणे पडताळून पाहायला हवीत.

* सात वा अधिक दिवस वारंवार होणारा मूत्रदाह दुर्लक्षित वा साधे औषध घेऊन पुढे ढकलला जातो.

* आधीच मूत्रिपडाचा आजार असल्यास असा जंतुसंसर्ग लवकर होतो.

* क्ष-किरण उपचारामुळे मूत्रनलिकेचे आवरण पातळ होते.

* वयोपरत्वे, गरोदरपणी वा रुग्णालयातील इतर रोगजंतुसंसर्गाबरोबर हा त्रास सुरू होतो.

* कोणत्याही कारणास्तव देण्यात येणाऱ्या औषधांनी रोगप्रतिबंधकशक्ती कमी होते.

* मूत्राशय वा मूत्रिपड यातील मूतखडय़ांमुळे

* मूत्रनलिकेतून घातल्या जाणाऱ्या मूत्रवाहक नलिकेचा वापर काही काळ अधिक झाल्यास असा रोगजंतुसंसर्ग होऊ शकतो.

* इतर कोणत्याही आजारासाठी दिल्या जाणाऱ्या प्रतिजैविकांमुळे मूत्राशयातील नैसर्गिकरीत्या उपस्थित असलेले जीवाणू मारले जातात व रोगजंतुसंसर्गाची शक्यता वाढते.

* आधी वापरण्यात आलेल्या प्रतिजैविकांमुळे जंतुसंसर्ग हा वेगळ्या प्रकाराने प्रदíशत होतो.

* महत्त्वाचे म्हणजे मूत्रनलिकेतील रोगजंतुसंसर्ग उपचार होण्यास मूत्राची कल्चर सेन्सिटीव्हीटी होणं आवश्यक असतं. काही वेळेस कोणताही खूप त्रास न होता असा रोगजंतुसंसर्ग बळावतो. यानंतर काही स्त्री रुग्णाबाबत क्ष-किरणाद्वारे मूत्रनलिकेचा अभ्यास केला जातो, अल्ट्रासोनोग्राफीने संपूर्ण मूत्रिपडापासून ते मूत्रनलिकेपर्यंत कुठे अडथळा आहे का हे तपासले जाते. काही वेळेस सीटी स्कॅनची मदत घेतली जाते. मूत्रदाह वारंवार होत असल्यास दुर्बणिीद्वारे मूत्राशयाचा आकार, मूत्राशयातील पेशींची वाढ, मूत्रनलिकेचा अभ्यास करून मग उपचार केले तर फायदा होतो. विशेषत: मधुमेही स्त्रीरुग्णास काही वेळेस रोगजंतुसंसर्ग होऊन मूत्राशयात रक्तस्रावही होऊ शकतो.

डॉ. रश्मी फडणवीस,  स्त्रीरोगतज्ज्ञ

rashmifadnavis46@gmail.com