गुडघा प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया वर्षांनुवर्षे अद्ययावत होत गेल्या आहेत. संपूर्ण गुडघा प्रत्यारोपण आणि गुडघ्याचा केवळ खराब झालेला कप्पा बदलण्याच्या शस्त्रक्रियेपासून आताच्या काळापर्यंत आलेली आधुनिकता आणि गुडघा प्रत्यारोपणात नव्याने येत असलेले तंत्रज्ञान यांचा हा आढावा.

संपूर्ण गुडघाबदल शस्त्रक्रिया

Gold Hits All Time High, 2400.35 doller an Ounce, global market gold price, global market gold high, all time gold high in world, Global Economic Uncertainty , gold,finance news, finance article, marathi news, vietnam, america,
सोन्याची विक्रमी तेजीची दौड कायम, जागतिक बाजारात प्रति औंस २,४००.३५ डॉलरचा उच्चांक
The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?
Loksatta chavdi happening in Maharashtra politics news on Maharashtra political crisis
चावडी: नाना अन् तात्याचे पारावर उपोषण!
three workers died due to electric shock
अंबरनाथ: विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू, जांभूळ जल शुद्धीकरण केंद्रातील घटना

‘टोटल नी रीप्लेसमेंट’ म्हणजे गुडघ्याचा संपूर्ण सांधा बदलणे. त्याची सुरुवात ७०च्या दशकात झाली. गुडघ्याचे दोन गोलाकार कप्पे असतात. त्या दोन्ही कप्प्यांना मिळून एकच सांधा घालायचा अशी सुरुवातीची कल्पना होती. वैद्यकीय भाषेत त्यालाच ‘डय़ूओ कोंडायलर’ शस्त्रक्रिया म्हणतात. हा सांधा यशस्वी झाला, तर तो १५ ते २० वर्षे व्यवस्थित टिकू शकेल असे सिद्ध झाले आणि जगभर या शस्त्रक्रिया होऊ लागल्या.

त्यानंतर १०-१५ वर्षांनी ‘रोटेटिंग प्लॅटफॉर्म’ नावाची शस्त्रक्रिया आली. आपण जसा गुडघा वाकवतो व सरळ करतो, तसाच गुडघा आतल्या आत गोलाकारही फिरू शकतो. गुडघा वाकवून सरळ करताना तो थोडा आतील बाजूस आणि थोडा बाहेरील बाजूस वळत असतो. असा आतमध्ये गोलाकार फिरू शकणारा एक कृत्रिम गुडघा त्या वेळी आला. परंतु त्यामुळे शस्त्रक्रियेच्या यशस्वितेत फार मोठा फरक पडला नाही. अजूनही शस्त्रक्रियेचा हा प्रकार वापरतात व काही लोकांना तो पसंत पडतो.

त्यामुळे संपूर्ण गुडघाबदल शस्त्रक्रियेत गोलाकार फिरू शकणारा (रोटेटिंग) गुडघा आणि स्थिर (फिक्स्ड) गुडघा असे दोन प्रकारचे ‘इम्प्लांट’ वापरले जातात. त्यांची यशस्विता जवळपास सारखी मानली जाते.

संपूर्ण गुडघा प्रत्यारोपणातील नवीन पद्धत

संपूर्ण गुडघाबदल शस्त्रक्रियेनंतर गुडघा पायाच्या सरळ रेषेतच यायला हवा, अशी सुरुवातीला धारणा होती. म्हणजे मांडीचा सांधा, गुडघ्याचा सांधा आणि घोटय़ाचा सांधा हे सर्व सांधे एका रेषेत असावेत अशा प्रकारे प्रत्यारोपणाची रचना होती. या पद्धतीला ‘अ‍ॅनाटॉमिकल अलाइंगमेंट’ असे संबोधतात. अजूनही ९० ते ९५ टक्के संपूर्ण गुडघा प्रत्यारोपणांमध्ये हीच पद्धत वापरतात. गेल्या ८-९ वर्षांत मात्र आणखी एक शस्त्रक्रिया पद्धती विकसित झाली आहे. सर्व रुग्णांचे गुडघे सारखे नसतात. त्यामुळे माणसाच्या गुडघ्याची शस्त्रक्रियेपूर्वीची नैसर्गिक रचना काय आहे हे पाहिले जाते आणि संपूर्ण गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतरही ती रचना कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. ‘किनॅमॅटिक अलाइंगमेंट’ नावाचा हा नवा प्रकारही जगात लोकप्रिय होऊ लागला आहे.

गुडघ्याचा केवळ खराब कप्पा बदलणे

गुडघ्याच्या दोन कप्प्यांसाठी मिळून एकच सांधा बसवण्याऐवजी त्याच्या आतील व बाहेरील कप्प्यांसाठी दोन वेगवेगळे सांधे बसवणे ही शस्त्रक्रियांमध्ये आलेली आणखी आधुनिकता होती. १९८०च्या आसपास ही शस्त्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीला जसे आपण एकसंध सांध्यासाठी ‘डय़ूओ कोंडायलर नी रीप्लेसमेंट’ असे नाव पाहिले होते, तसे दोन कप्प्यांना दोन सांधे बसवण्याला ‘बाय कोंडायलर नी रीप्लेसमेंट’ म्हटले जाऊ लागले. यात गुडघा प्रत्यारोपणाच्या एकाच शस्त्रक्रियेत दोन शस्त्रक्रियांचा समावेश असतो. एक आतील कप्पा बसवण्याची आणि दुसरी बाहेरील कप्पा बसवण्याची. ही शस्त्रक्रिया मात्र विशेष यशस्वी ठरली नाही.

मग गुडघ्याच्या आतील बाजूचा खराब कप्पा तेवढा नव्याने बसवण्यास सुरुवात झाली. सर्वसाधारणपणे गुडघ्याच्या बाहेरच्या कप्प्याऐवजी आतला कप्पा प्रामुख्याने खराब होतो. तेवढाच बदलून टाकण्याची नवी शस्त्रक्रिया ‘ऑक्सफर्ड’मध्ये विकसित झाली. त्यामुळे या नव्या शस्त्रक्रियेला अर्थातच ‘ऑक्सफर्ड पार्शल नी रीप्लेसमेंट’ असे नाव पडले. १९८५च्या सुमारास ती विकसित झाली आणि लोकप्रिय होऊ लागली.

अस्थिबंधनांना हात न लावता शस्त्रक्रिया

शस्त्रक्रियांमधील अद्ययावतता वाढत गेली तसे आता गुडघ्याच्या दोन कप्प्यांसांठी दोन वेगळे सांधे बसवण्याच्या पद्धतीचे पुनरुज्जीवन झाले आहे. एखाद्या व्यक्तीच्या गुडघ्याचे दोन्ही कप्पे झिजले असतील, तर ते वेगवेगळे छोटे सांधे बसवून बदलता येतात. यात गुडघ्याच्या आतील अस्थिबंधनांना (-म्हणजे ‘लिगामेंट्स’ना) हात लावला जात नाही. परंतु गुडघ्याचे दोन्ही कप्पे खराब झालेले रुग्ण तुलनेने कमी असल्यामुळे या शस्त्रक्रिया अद्याप खूप मोठय़ा प्रमाणावर होत नाहीत. अस्थिबंधन हे दोन हाडांना बांधून ठेवते व गुडघा अस्थिर होऊ देत नाही. त्यामुळे गुडघा वेडावाकडा न हालता विशिष्ट पद्धतीनेच हलतो आणि गुडघ्याच्या आतील कुर्चेला संरक्षण मिळते.

आपण उभे राहून डोळे मिटले, तरी आपला गुडघा वाकवलेला आहे की सरळ आहे किंवा पाय जमिनीवर टेकवला आहे की हवेत उचललेला आहे, याची आपल्याला जाणीव असते. याला ‘स्थितीभान’ असे म्हणतात. ही जाणीव आपल्याला अस्थिबंधनांमुळे मिळत असते. संपूर्ण गुडघाबदल शस्त्रक्रियेत यातील विशिष्ट अस्थिबंधने कापावी लागतात. त्यामुळे गुडघ्याचा एकच कप्पा खराब असेल, तर अस्थिबंधने न कापता नुसता तेवढा कप्पा बदलणे फायद्याचे ठरते. त्यामुळे चालताना अधिक नैसर्गिकरीत्या हालचाल होऊ शकते. खुर्चीवर बसलेले असताना उठून उभे राहणे, उभे राहिलेल्यावर चालण्यास सुरुवात करणे, चालता-चालता जिना चढू लागणे या एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाण्याच्या हालचाली. या हालचाली सहजपणे होण्यासाठीही गुडघा स्थिर असणे महत्त्वाचे असते आणि हे स्थैर्य अस्थिबंधने देतात.

सर्वात आधुनिक पद्धती

गुडघ्याचा एक कप्पादेखील पूर्ण खराब झालेला नसेल, तर त्या एका कप्प्याच्या केवळ खराब झालेला भाग तेवढा बदलण्याची ‘बायोपॉली’ शस्त्रक्रियाही शोधण्यात आली आहे. गुडघ्याचा अगदी ‘५ बाय ५’ मिलीमीटरचा छोटा खराब भागही यात बदलता येतो. अशा खराब भागाच्या जागी विशिष्ट प्रकारच्या प्लास्टिकपासून बनवलेले बटण बसवले जाते. ही पद्धत इंग्लंडमध्ये काहीच ठिकाणी केली जात असून अद्याप ती भारतात आलेली नाही.

अमेरिकेत रुग्णाची ‘थ्री-डी सीटी स्कॅन’ चाचणी करून त्याच्या गुडघ्याच्या मापाने संपूर्ण गुडघाबदल शस्त्रक्रियेसाठी ‘इम्प्लांट’ बनवणे सुरू झाले आहे. हा इम्प्लांट प्रत्येक रुग्णासाठी वेगळ्या मापाचा असतो. ही शस्त्रक्रिया गेल्या २-३ वर्षांपासून सुरू आहे, परंतु अजून ती भारतात केली जात नाही. अर्थात कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया किमान दहा वर्षे वापरली गेल्यानंतरच त्याच्या यशस्वितेबद्दल बोलता येते.

डॉ. संजीव गोखले, अस्थिरोगतज्ज्ञ

(शब्दांकन- संपदा सोवनी)