पोटात वायू कसा तयार होतो, त्याचे प्रमाण कशावरून ठरते, त्याला वास का येतो हे मागील आठवडय़ात पाहिले. पोटातील वायू वाढल्याची लक्षणे आणि ही समस्या दूर करण्यासाठी आहारात करायचे बदल यासंबंधी आता माहिती घेऊ या. पोटात वायू वाढला की ढेकर,

पोट फुगणे, अधोवायू, ओटीपोटात दुखणे अशा समस्या जाणवतात.

Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
Kitchen Jugaad To Avoid Potatoes Sprout Or Batata Turning Green Bad
बटाट्याला कोंब येऊ नये, बटाटा हिरवा पडू नये म्हणून घरी आणताच करा हा सोपा उपाय; पैसे व आरोग्य दोन्ही वाचवा
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता

ढेकर

प्रत्येकजण कधीतरी, विशेषत: जेवणानंतर ढेकर देत असतो. प्रत्येक वेळी जेवण किंवा पाणी पिताना त्यासोबत हवाही शरीरात घेतली जाते. गिळण्याची क्रिया जितकी जास्त वेळा होते, तेवढय़ाच जास्त प्रमाणात हवा पोटात जाते. ही सर्व हवा तोंडावाटे बाहेर काढण्याची क्रिया म्हणजे ढेकर.

बाटलीतून पाणी किंवा काबरेनेटेड शीतपेय प्यायल्यामुळे किंवा वेगाने जेवल्यामुळे जास्त प्रमाणात हवा तोंडातून पोटात जाते. धूम्रपान, च्युइंगगम चघळणे, पान खाणे, दातांच्या कवळी सैल असणे, काही दात नसणे यामुळेही पोटातील हवेचे प्रमाण वाढते. अनेकदा लोकांना ते अशा प्रकारे अधिक हवा पोटात घेत असल्याची जाणीव नसते. हवा शरीरात घेणे टाळणे किंवा गरम पाणी प्यायल्यामुळे ढेकर देण्याची समस्या कमी होऊ शकेल.

पोट फुगणे

पोट फुगण्याचा प्रकार बहुतेकदा स्त्रियांमध्ये आढळतो. पोट आणि आतडय़ांमधील आंकुचन सुरळीत होत नसल्याने ही समस्या उद्भवते. ही क्रिया मंदावल्याने वायू साठून राहतो आणि आतडय़ांच्या आतल्या बाजूवर दाब वाढतो. त्यामुळे पोट फुगल्याचे किंवा पोटात कळा येण्याचा प्रकार घडतो. काही वेळा पोटदुखी किंवा शौचाला जाणे टाळल्यासही ही लक्षणे दिसतात. काही वेळा लहान आतडय़ांचा आजार, लहान आतडय़ांमध्ये जीवाणूंची अतिरिक्त वाढ किंवा लहान आतडय़ांची शस्त्रक्रिया यामुळेही वायूनिर्मिती वाढते. अस्वस्थता आणि ताण यामुळेही पोट फुगते.

आहारात केलेल्या लहान बदलांमुळे ही समस्या सुटू शकते. काही वेळा ओटीपोटाचा एक्स-रे आणि एन्डोस्कोपी (कॅमेरा लावलेली लवचिक नळी तोंडावाटे शरीरात घालून पचननलिकेची केलेली पाहणी) केली जाते. सोनोग्राफीनेही कारण समजू शकते. काही वेळा हायड्रोजन ब्रेथ चाचणीने लहान आतडय़ांमधील जीवाणूंची अतिरिक्त वाढ समजू शकते.

पोट तसेच आतडय़ांच्या आकुंचनाचा वेग वाढवण्यासाठीही औषधे उपलब्ध आहेत. त्यामुळे आतडय़ांमधून अन्न पुढे ढकलले जाते व पोटात वायू साठण्याचे प्रमाण कमी होते.

ओटीपोटात दुखणे

पोटात वायू साठल्याने कळा मारतात, वेदना होतात आणि वेदनेची जागा सतत बदलते. बद्धकोष्ठतमुळे वायू बाहेर पडण्यात अडथळे येऊन पोट फुगते. अर्थात काही वेळा आतडय़ांचे आजार, पोटाला सूज येणे अशा गंभीर स्वरूपाच्या आजारांचीही ही लक्षणे असू शकतात. हृदयविकार, पित्ताचे खडे किंवा अपेंडिक्ससारख्या आजारांशी पोटातल्या अतिरिक्त वायूच्या समस्येशी गल्लत होऊ शकते. त्यामुळे सतत ओटीपोटात दुखणे, शौचासोबत रक्त जाणे किंवा शौचाला जाण्याच्या संख्येत बदल होणे, वजन कमी होणे, छातीत दुखणे, सतत उलटी आल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हे सर्व पदार्थ पूर्ण टाळण्याची गरज नाही तर त्याचे प्रमाण कमी केले पाहिजे. या पदार्थाची दिवसातील मात्रा ५० ग्रॅम झाली की ते उच्च प्रमाण तर ९ ग्रॅम प्रति दिन हे कमी प्रमाण आहे. उदाहरणार्थ लहान आकाराच्या एका सफरचंदामध्ये १०.७४ ग्रॅम फ्रुक्टोज असते व ते प्रमाण उच्च मानले जाते. मात्र जर अर्धे सफरचंद खाल्ले तर पोटातील वायूचा त्रास होणार नाही.

अधोवायू ही सर्वसामान्य शरीरक्रिया आहे. ती आयुष्यभर सोबत राहणार. गरम पाणी, घरगुती उपायांनी अधोवायूचा त्रास कमी होतो. वेगाने व मोठय़ा प्रमाणात वायूनिर्मिती करणारे अन्नपदार्थ टाळल्याने किंवा कमी प्रमाणात घेतल्याने अधोवायूचा त्रास होणार नाही.

आहारात बदल

अधोवायू सोडणे ही अगदी सामान्य क्रिया आहे व व्यक्तिगणिक या वायूचे प्रमाण खूप बदलते. गुदद्वाराकडे येणाऱ्या मार्गाच्या लवचीकतेवर अधोवायू सोडण्याची प्रक्रिया अवलंबून असते. अधोवायूचे प्रमाण किंवा वासावरून निष्कर्ष काढता येत नाही. सतत तीन दिवस शौचाची तपासणी करून विविध घटकांचे – स्निग्ध, पिष्टमय, शर्करा, तंतुयुक्त घटक यांचे प्रमाण ठरवले जाते. त्यावरून लहान आतडय़ातील संसर्गाची कल्पना येऊ शकते. त्यावरून आहारात बदल करण्याचा सल्ला दिला जातो.

अधोवायूची समस्या कमी करण्यासाठी आहार

* आहारात केलेल्या लहानशा बदलामुळे शरीरात वायू निर्माण होण्याचे प्रमाण कमी होते तसेच वायू त्वरेने शरीराबाहेर काढला जातो.

* त्रासदायक ठरणारे पदार्थ ओळखून ते टाळावेत. काही पदार्थामुळे (फॉडमॅप) जास्त प्रमाणात वायू तयार होतो. त्यांची माहिती पुढे दिली आहे.

* तळलेले आणि चरबीयुक्त पदार्थ कमी करणे. या पदार्थामुळे पोट रिकामी होण्यास वेळ लागतो आणि पोट भरल्यासारखे वाटते.

* जास्त तंतुयुक्त पदार्थावर तात्पुरत्या स्वरूपात काट मारणे आणि काही आठवडय़ांच्या कालावधीत हळूहळू त्यांचे प्रमाण वाढवणे.

* दिवसभरात द्रवपदार्थ पुरेशा प्रमाणात पिणे.

* दुग्धजन्य पदार्थाची मात्रा कमी करणे. दुधाऐवजी दही खाणे. दुग्धजन्य पदार्थ कमी प्रमाणात आणि इतर पदार्थासोबत खाल्ल्याने त्यांचे पचन चांगले होते.

जास्त वायू निर्माण करणारे पदार्थ

* कमी लांबीच्या किण्वनप्रक्रियेने विघटन होणाऱ्या कबरेदकांचे प्रमाण कमी करून अधोवायूवर नियंत्रण ठेवता येते. अशा पदार्थाना फॉडमॅप (एफओडीएमएपी – फर्मिटेबल, ऑलिगोसॅचराइड्स, डायसॅचाइड्स, मोनोसॅचराइड्स आणि पॉलयोल्स) म्हणतात.

* या पदार्थामध्ये तीन घटक समान असतात.

* लहान आतडय़ांमध्ये ते कमी प्रमाणात शोषले जातात.

* जीवाणूंमुळे खूप वेगाने विघटन होते. त्यामुळे कमी वेळात जास्त वायूची निर्मिती होते.

आतडय़ांमध्ये द्रवाचे प्रमाण वाढते.

* आहारातील हे पदार्थ म्हणजे मध, फळे, खूप पिकलेले केळे, सफरचंद, दूध

गहू, कांदा, लसूण

द्वीदल धान्य (मटार, घेवडय़ाच्या बिया इ. ), मसूर.

सिरपमधील सॉर्बिटॉल, च्युइंगगममधला झायलिटॉल, अ‍ॅप्रिकोट, प्लम.

– डॉ. रेखा भातखंडे, उदरविकारतज्ज्ञ.