अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या गरजा आहेतच, पण त्यातील अन्न मिळवणे व ग्रहण करणे यापेक्षाही ते सुसंस्कृत करून ग्रहण करणे ही एक मोठी प्रक्रिया आपण विसरत चाललो आहोत. आहार योग्य नसेल तर बाळाची वाढ होत असता जी कमतरता राहते त्यानेच बाळास मोठेपणी मधुमेह, उच्च रक्तदाब, संधिवात अशांसारखे आजार मोठेपणी उद्भवतात. उदा. मॅग्नेशियमची लहानपणीची कमतरता मधुमेहाच्या उद्भवास कारणीभूत असते.
मासिक पाळी सुरू होण्यापूर्वीच रक्तातील लोहाचे, जीवनसत्त्वांचे व इतर द्रव्यांचे प्रमाण यथायोग्य राहण्यासाठी सर्व पालेभाज्या, कढईतल्या (निल्रेप वा िहडालियम नसलेल्या) मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळी, ऋतुमानाप्रमाणे मिळणाऱ्या फळभाज्या, परवडणारी फळे यांचा समावेश असावा. सुकामेवाही आहारात महत्त्वाचा आहे. आहार हा विपुल प्रमाणात असण्यापेक्षा सकस असावा. आपल्या जीवनशैलीचा, विशेषत: पूर्वापार चालत आलेल्या जेवणातील पदार्थाचा जरूर विचार व्हावा. तसेच आíथक बाजू व स्वयंपाकास आपण किती वेळ देऊ शकतो याचे नियोजन हवे.
अतिशय महत्त्वाचे म्हणजे सकाळची न्याहारी. हे बहुतेकदा ब्रेड, बटर, बिस्कीटवर अवलंबून असते. सकाळच्या न्याहारीच्या तयारीस व खाण्यासाठी वेळ नसतो. अशा वेळी दुधातून सातूचे पीठ, राजगिरा लाह्य़ा, वेळप्रसंगी ओटस यास उकडलेल्या कडधान्यांची जोड असल्यास योग्य. विशेष करून बटाटा, इडली, ब्रेड, ब्राऊन ब्रेड यांचा वापर कमी करावा. आपल्या पचनसंस्थेस आपण काय खातो याचा त्रास होऊ शकतो. तसेच जेवणात पोळी कमी वा भाज्या, कोिशबीर (फोडणी नसलेल्या) अधिक व एक फळ असावे. हे फळ जेवणानंतर वा आधी एक तासाने घ्यावे. यामुळे फळाचा पुरेपूर उपयोग आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यात होतो. वेळेच्या अभावी आपण साऱ्याच गोष्टी पोटात कोंबतो.
जेवण करताना, जेवताना व त्यानंतरही सेवन करण्यात येणाऱ्या अन्नाची प्रत व अन्नपदार्थ शिजविताना घेतलेली काळजी महत्त्वाची असते. विशेषत: गरोदर स्त्रियांबाबत. लिस्टेरायोसिस, विषमज्वर, टोमोप्लास्मोसिस यासारखे विषाणूसंसर्गामुळे होणारे आजार बळावल्यास बाळाच्या जिवास धोका पोहोचतो. त्यामुळे फळे, पालेभाज्या, फळभाज्या स्वच्छ धुऊन, स्वच्छ सुरीने कापणे वा विळी स्वच्छ करून भाज्या चिरणे आणि भाज्या मंदाग्नीवर शिजविणे महत्त्वाचे आहे. जीवनसत्त्व अ महत्त्वाचे असले तरी त्याचे अतिसेवन म्हणजेच कॉडलिव्हर ऑइल गरोदर स्त्रियांनी घेऊ नये.
गरोदरपणी होणारा मधुमेह हा आहारास आव्हानात्मक असतो. जेवणानंतरच्या वाढणाऱ्या शर्करेच्या प्रमाणाने बाळात शारीरिक व्यंग उद्भवू शकते. पिष्टमय पदार्थाचे संतुलन, तेलकट, तुपकट पदार्थावर संयम आणि प्रथिनांचा विपुल वापर हे कितीही माहिती असले तरी आहार हा प्रत्येकाच्या जीवनशैलीवर, आíथक संतुलनावर व शैक्षणिक पातळीवरच विचारात घेतला जातो. हल्ली साखरेच्या बदल्यात आलेल्या कृत्रिम स्वीटनेसमुळे अगदी हळूहळू प्रमाणात शरीराची हानी होते हे आपल्याला कळतच नाही.
एक तत्त्व आहाराबाबत लक्षात ठेवावे. पांढऱ्या दिसणाऱ्या आहारतत्त्वांचे सेवन कमी करावे म्हणजेच साखर, मीठ, मदा याचे भान तरुणपिढीने ठेवल्यास पॉलिसिस्टिक ओव्हरीसारखे आजार होत नाहीत. स्त्रियांनी मूत्राशयाचे विकार टाळण्यासाठी पाणी २-३ लिटर पिणे व आहारात प्रथिनांचा योग्य वापर करून पिष्टमय पदार्थाचा कमी वापर करणे महत्त्वाचे आहे. विशेषत: काही खाल्ल्यानंतर अधूनमधून उठून फेऱ्या मारणे. दर चार तासांनी खाणे जरुरीचे आहे. जेवणात शेवग्याच्या शेंगा, मेथी, जवस अशा पदार्थाचा समावेश असावा.
अतिशय महत्त्वाचे म्हणजे सकाळची न्याहारी. हे बहुतेकदा ब्रेड, बटर, बिस्कीटवर अवलंबून असते. सकाळच्या न्याहारीच्या तयारीस व खाण्यासाठी वेळ नसतो. अशा वेळी दुधातून सातूचे पीठ, राजगिरा लाह्य़ा, वेळप्रसंगी ओटस यास उकडलेल्या कडधान्यांची जोड असल्यास योग्य. विशेष करून बटाटा, इडली, ब्रेड, ब्राऊन ब्रेड यांचा वापर कमी करावा. आपल्या पचनसंस्थेस आपण काय खातो याचा त्रास होऊ शकतो. तसेच जेवणात पोळी कमी वा भाज्या, कोिशबीर (फोडणी नसलेल्या) अधिक व एक फळ असावे. हे फळ जेवणानंतर वा आधी एक तासाने घ्यावे. यामुळे फळाचा पुरेपूर उपयोग आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यात होतो.
डॉ. रश्मी फडणवीस rashmifadnavis46@gmail.com