बूट हे ट्रेकिंगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.   ट्रेकिंगसाठी बूट निवडताना कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात, ते पाहू.

ट्रेकिंगसाठी निवडलेली वाट कशी आहे?

Mr. Gay Nepal 2024
‘मिस्टर गे नेपाळ २०२४’ चा किताब लक्ष्मण मगर यांनी जिंकला; आता लंडनमध्ये करणार प्रतिनिधित्व
Indian Premier League Cricket Mumbai vs Chennai ipl 2024 match sport news
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: मुंबई-चेन्नई आमनेसामने! पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत आज वानखेडेवर होणाऱ्या द्वंद्वात धोनीवर लक्ष
Why stress test of mutual fund is important
तुमच्या म्युच्युअल फंडाची स्ट्रेस टेस्ट काय सांगते? म्युच्युअल फंडाची स्ट्रेस टेस्ट महत्त्वाची का?
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी

सपाट भूप्रदेश – जर तुम्ही सरळ वाटेने म्हणजे जास्त खाचखळगे, दगड नसलेल्या वाटेने ट्रेकिंग करणार तर तुम्हाला नॉर्मल बूट वापरून ट्रेक करणे चालू शकते.

खडकाळ भूप्रदेशातून एक दिवसापेक्षा जास्त दिवसांचा ट्रेक – तुम्ही चढ-उतार असलेल्या निसरडय़ा किंवा खडकाळ वाटेवरून ट्रेक करणार असाल आणि एक दिवसापेक्षा जास्त दिवसांचा ट्रेक असेल, तर तुमची सॅक सामानाने जड झालेली असेल. त्यामुळे तुमच्या पायांवर जास्त ताण पडेल. अशावेळी चांगली ग्रिप आणि शॉक अ‍ॅब्सॉर्बिग असलेले बूट निवडावेत.

हिमालयातील ट्रेक – तुम्ही हिमालयात ट्रेक करणार असाल व त्या ट्रेकच्या वाटेवर दगडांचे टप्पे असतील. तसेच काही प्रमाणात बर्फही लागणार असेल, तर चांगल्या शॉक अ‍ॅब्सॉर्बिग रचना असलेल्या सोलबरोबरच हाय अँकल बूट उपयुक्त ठरतात. हाय अँकलमुळे पाय मुरगळण्यापासून आणि बुटात बर्फ जाण्यापासून बचाव होतो.

बूट घेताना हे लक्षात ठेवा

वजनाने हलके – वजनाने हलके असलेले बूट निवडावेत. जास्त वजन असलेले बूट निवडल्यास पायावर अतिरिक्त ताण पडतो.

हवा जाण्यासाठी रचना असलेले – बुटाच्या वरील भागात वापरलेले साहित्य व त्याची रचना अशी असावी की बुटांमध्ये हवा जाईल. यामुळे गरम कमी होईल व घामही कमी प्रमाणात येईल.

पायांना सुसहय़ – तुम्हाला तुमच्या पायांना कोणत्या क्रमांकाचे बूट योग्य बसतात, ते माहीत असायला हवे. जर कमी-जास्त क्रमांकाचे बूट वापरल्यास ते पायांना बोचू लागतील किंवा सल असल्यास पाय आतल्या आत घसरून फोड येण्याची शक्यता असते.

भूप्रदेशानुसार निवड – तुम्ही कोणत्या भूप्रदेशात ट्रेक करणार आहात, याचा विचार बूट घेताना अवश्य करा. वाळवंटी प्रदेश, बर्फाळ प्रदेश आणि खडकाळ प्रदेशात बुटाची रचनाही वेगळी असेल.

लवचीक -बूट आणि त्याचा सोल हा लवचीक असावा. उंच-सखल भाग, निसरडय़ा वाटेवर चालण्यासाठी सोल लवचीक असायला हवा.

टिकाऊ – बूट विकत घेताना त्याचा टिकाऊपणा विचारात घ्यावा. बूट घातल्यानंतर जर बोटे बुटाच्या पुढच्या भागाला टेकून वाकली जात असतील तर जास्त क्रमांकाचा बूट घालून पाहावा.

बुटांची रचना/मुख्य भाग

वरचा भाग – बुटाचा वरचा भाग हा पायाच्या वरच्या भागाला संरक्षण देतो. हा भाग सिंथेटिक मटेरिअलपासून बनवला जातो. हे मटेरिअल हलके, लवकर सुकणारे व कमी किंमत असलेले असते.

सोल – सोल हा आपल्या पायाच्या तळव्यांना संरक्षण देणारा भाग. यात इनर सोल, मिड सोल व आऊट सोल यांचा समावेश होतो. आतल्या आत पाय घसरू नये म्हणून इनर सोल वापरला जातो. सोलला गादीसारखा नरमपणा येऊन शॉक अ‍ॅब्सॉर्बिगची क्षमता येण्यासाठी मिड सोलचा वापर केला जातो. आऊट सोल एकसंध असावा. छोटे-छोटे भाग चिकटवलेले असतील तर  दगडधोंडय़ांमध्ये टिकाव लागत नाही. चांगल्या ग्रिपसाठी उच्च प्रतीचा सिंथेटिक रबर वापरला जातो.

लेसिंग – लेसिंगच्या साहाय्याने बूट पायांमध्ये व्यवस्थित बांधता येतात. व्यवस्थित बसलेल्या बुटांनी चांगली ग्रिप घेता येते. लेसिंगची रचना वेगवेगळय़ा प्रकारे केली जाते. आयलेट्स वापरून किंवा काही वेळा हूक्स, डी िरग्ज, वेबिंग किंवा त्यांचे काँबिनेशन वापरून लेसिंगची रचना केली जाते.

ashok19patil65@gmail.com