शिकागोतील मिलेनिअम पार्कमधील ही भव्य कलाकृती म्हणजे ’क्लाउड गेट’. शिकागो शहराचे आकर्षण असलेल्या या कलाकृतीच्या पृष्ठभागावरील ८० टक्के भागावर आकाशाचे प्रतिबिंब पडते. ’क्लाउड गेट’ ब्रिटिश शिल्पकार अनिश कपूरच्या संकल्पनेतून साकारले आहे. ६६ फूट लांब, ४२ फूट उंच आणि ३३ फूट रुंद असलेले ’क्लाउड गेट’ उत्तम दर्जाच्या स्टेनलेस स्टीलच्या प्लेट्सनी बनविण्यात आले आहे. बहिर्गोल पृष्ठभागामुळे शिकागोमधील उंच इमारती यामध्ये प्रतिबिंबित होतात आणि त्याची भव्यता आणखीनच वाढते.
प्रभाकर कोशे