शहरांमधील वाहतुकीची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्यावर उपाय म्हणून युरोप आणि अमेरिकेतील अनेक देशांमध्ये सार्वजनिक वाहतुक आणि सायकलिंगला प्रोत्साहन दिलं जातंय. परदेशात अनेक देशांमध्ये सायकल संस्कृती फार पूर्वीपासून रूजलेली असताना अलिकडच्या काळात तर विकासाचे प्रकल्प राबवताना त्यामध्ये सायकलिंगसाठीच्या सोयी-सुविधांचाही आवर्जुन समावेश केला जातो. त्यातूनच ‘बाईक शेअर’ (सार्वजनिक सायकल सेवा) ही संकल्पना उदयास आली असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.

भारतात ही संकल्पना अद्याप रूजली नसली तरी त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. हैदराबाद, म्हैसूरसारख्या शहरांसोबतच मुंबईतही घाटकोपरमध्ये पहिली सार्वजनिक सायकल सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा नेमकी कसं काम करते, त्याचे फायदे काय आणि लोकसहभाग याबाबत गप्पा मारण्यासाठी सेवेचे प्रमुख किसनराव गोपाळे यांना सायकल कट्ट्यावर आमंत्रित करण्यात आलंय. यासोबतच बीआरएम सायकलिंगबाबतही कट्ट्यावर गप्पा रंगणार आहेत. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई भागात कार्यरत असलेल्या सायकल गटांनाही त्यांच्या सायकल सफरींचे अनुभव लोकांसमोर मांडण्यासाठी आमंत्रित केलं आहे. सायकल कट्टा सर्वांसाठी मोफत खुला असणार आहे.
कधी – रविवार, ५ मार्च २०१७
वेळ – सकाळी ९ ते दुपारी ११.३०
स्थळ – महाराष्ट्र नेचर पार्क सोसायटी, वांद्रे-सायन लिंक रोड, धारावी बस डेपोजवळ, धारावी – ४०००१७
संपर्क – ९८१९७४९०५० किंवा ९८९२९४२६२८

how to make fish egg omelette Fish egg recipe in marathi
झटपट नाश्त्यासाठी बनवा “माशाच्या अंड्याचे ऑमलेट” लहान मुलंही खातील आवडीने
NASA captures mysterious ‘surfboard-shaped’ object orbiting moon
चंद्राभोवती घिरट्या घालतेय UFO? नासाने शेअर केला रहस्यमयी फोटो, नक्की काय आहे प्रकरण?
Essel Propack Limited Attractive durable quality in packaging
वेष्टनांतील आकर्षक, टिकाऊ गुणवत्ता
market is loaded with cakes candies chocolates for Easter festival
ईस्टर सणासाठी बाजारात केक, कॅन्डी, चॉकलेटची रेलचेल