पावसाळ्यात सरधोपट मार्गापासून जरा वाट वाकडी केली की असं जलमोत्यांचं मनोहारी दृश्य हमखास दिसतं. अर्थात त्यासाठी शोधक नजर हवी. या सुंदर आणि नाजूक निसर्ग कलाकृतीचे छायाचित्र टिपण्यासाठी मात्र काळ -वेळ जुळून यावा लागतो. एक तर अशा वेळी वारा कमी हवा, जेणेकरून हे जलमौक्तिक निसटून जाणार नाहीत. दुसरे म्हणजे आपल्याकडे ट्रायपॉड असायला हवा. आपला कॅमेरा मॅन्युअल फोकस मोडवर ठेवत अपार्चर ८-१० ठेवावं. अ‍ॅटोफोकस ठेवू नये. कारण कोणत्याही क्षणी वारा आला तर हे मोती आऊट ऑफ फोकस होऊ शकतात. शक्यतो वारा शांत असतानाच हे छायाचित्र टिपावे.