खळाळते वाहणारे ओढे हे पावसाळ्यात डोंगरात आढळणारे अगदी हमखास दृश्य. हे मनमोहक, अनोखे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करायचे असेल तर काही सेटिंग्ज ठरवून कराव्या लागतील. ट्रायपॉडचा वापर हा अपरिहार्य आहे. तुमची लेन्स ज्या क्षमतेपर्यंत अपार्चर सेटिंग्जला परवानगी देते ती वापरावी. अगदी एफ १६ पर्यंत अपार्चर असेल तरी चालेल. शटर स्पीड मात्र कमी असावा. शक्य असेल तर एनडी फिल्टर उपलब्ध असेल तर त्याचा वापर करू शकता. अमित कुलकर्णी