गौरी हे शिवाच्या शक्तीचे रूप मानले गेले आहे. विविध पुराणे आणि ग्रंथांमधून गौरीची प्रतिमालक्षणे दिलेली आहेत. पकी रूपमंडन या ग्रंथानुसार गौरी ही गोधासना, चार हात, तीन डोळे आणि आभूषणांनी युक्त असावी असे म्हटले आहे. गौरी ही घोरपड या वाहनावर उभी असल्याचे दाखवले जाते. अशीच एक सुंदर आणि देखण्या हरगौरीची प्रतिमा लातूर जिल्ह्यातल्या निलंगा गावातील नीलकंठेश्वर मंदिरात पाहायला मिळते.
निलंगा येथील नीलकंठेश्वर मंदिर हे एक त्रिदल पद्धतीचे मंदिर आहे. मंदिराच्या बाह्यांगावर मोहक अशा सुरसुंदरींच्या प्रतिमा पाहायला मिळतात. मुख्य गर्भगृहात शिविपडी असून, उजवीकडील गर्भगृहात उमामहेश्वर आिलगन मूर्ती दिसते. शिवाच्या डाव्या मांडीवर देवी बसली असून शिवाचा डावा हात तिच्या डाव्या खांद्यावर ठेवलेला दिसतो. परंतु, इथेच एक अजून वैशिष्टय़ आहे. ते म्हणजे शिव आणि पार्वती ज्या पीठावर पसलेले दाखवले आहेत त्याच्या पायाशी एका घोरपडीचे शिल्प कोरलेले आहे. घोरपड ही चिवटपणासाठी प्रसिद्ध आहे. एखाद्या ठिकाणी जर तिने पकड घेतली तर अत्यंत चिवटपणे ती धरून ठेवते. तिथून तिला हलवणे कठीण असते. पार्वतीने शिवाच्या प्राप्तीसाठी अत्यंत तीव्र आणि कठोर तपश्चर्या केली होती. तिची शिवप्राप्तीची इच्छा अत्यंत प्रबळ होती. तिची अवस्था एखाद्या पर्णहीन वृक्षाप्रमाणे झालेली होती, या वरूनच तिला अपर्णा असे नाव मिळाले आहे. पार्वतीच्या या चिवट तपश्चय्रेला घोरपडीच्या चिवटपणाची उपमा दिलेली दिसते आणि त्याचे प्रतििबब आपल्याला मूर्तीशास्त्रामध्ये सुद्धा पडलेले दिसते. ‘गोधासना भवेदगौरी’ असे तिचे वर्णन रूपमंडन या ग्रंथात केले असल्यामुळे या निलंग्याच्या प्रतिमेला शिवपार्वती असे न म्हणता हरगौरी प्रतिमा असे संबोधले जाते. शिव म्हणजे हर आणि पार्वतीची होते गौरी. या अशा हरगौरी प्रतिमा खूपच दुर्मीळ आहेत. अत्यंत देखण्या अशा या प्रतिमेवर दक्षिण भारतातल्या शिल्पकलेची छाप पडल्याचे जाणवते. हिंदू विवाह पद्धतीत गौरीहराची पूजा करण्याचा विधी प्रामुख्याने केला जातो. त्यामागेही घोरपडीच्या चिवटपणाचेच तत्त्व सांगितले आहे. पती-पत्नींनी एकमेकांशी एकनिष्ठ राहावे हे या विधीमधून सुचवायचे असावे. तत्त्वज्ञानाचा मूर्तिकलेवर तसेच समाजजीवनावर पडलेला प्रभाव इथे प्रकर्षांने जाणवतो. ही निलंग्याची हरगौरी प्रतिमा आणि नीलकंठेश्वर मंदिर दोन्हीही मुद्दाम जाऊन पाहण्याजोग्या आहेत.
आशुतोष बापट ashutosh.treks@gmail.com

Hanuman Jayanti 2024
हनुमान जयंती २०२४: मारुतीची जन्मकथाच निराळी!
bhau rangari ganpati temple fire marathi news
भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळील जुन्या लाकडी वाड्याला आग
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन
khajina vihir Vitthal temple
सदाशिव पेठेतील खजिना विहीर विठ्ठल मंदिरात चोरी