खोपोली-पाली रस्त्यावर पालीच्या अलीकडे साधारण सहा-सात किलोमीटरवर पडसरे गावाला जाणारा फाटा आहे. या फाटय़ापासून पडसरे गाव आठ किलोमीटरवर आहे. कधी काळी असलेला आणि आता जवळपास संपूर्ण उखडलेला तीन-चार कि.मी.चा रस्ता पार केल्यावर डावीकडे असणारा विस्तीर्ण असे कावळे धरण आपलं लक्ष वेधून घेतो. मुख्य रस्त्यापासून छोटय़ाशा पायवाटेने या बंधाऱ्यापर्यंत पोहोचायला पाच-दहा मिनिटे पुरेशी आहेत. अतिशय निसर्गरम्य अशा या ठिकाणी तास मजेत जातो.

पुढे तीन किलोमीटरचे अंतर नागमोडी वळणे घेत हळूहळू डोंगर चढू लागतो. रस्त्याच्या दुतर्फा पसरलेले दाट जंगल अणि एका विशिष्ट उंचीवर ढग खाली उतरल्यामुळे धुक्यात बुडून जायला होते. जणू काही एखाद्या हिल स्टेशनवरच आल्याचा अनुभव त्या तीन-चार किलोमीटरच्या पट्टय़ात घेता येतो.

Kalamboli, 8 thousand Electricity Consumers , Left Without Power , for Hours, Accidental Power Line Cut, kalamboli no electricity, kalamboli electricity cut,
कळंबोलीतील ८ हजार विजग्राहक सात तास विजेविना
meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…
March 2024, March 2024 Records Hottest Temperatures, March 2024 Records Hottest in 175 Years, hottes march 2024 globally, Global Average Temperatures Up by 1.35°C, heat, summer march, summer season
यंदाचा मार्च आजवरचा सर्वांत उष्ण; पश्चिमी झंझावाताचा भारताला दिलासा
Nashik, Onion auction, Onion, Lasalgaon
नाशिक : लासलगाव बाजारात आठ दिवसांनंतर कांदा लिलाव पूर्ववत, सरासरी दीड हजार भाव

पडसरे गावाच्या अलीकडे अगदी रस्त्याला लागूनच पडसरे धबधबा आहे. तुलनेने उंची कमी, मात्र रुंदीला बराच मोठा असल्यामुळे त्याखाली भिजण्याचा मनसोक्त आनंद घेता येतो. तळाशी बरीच विस्तीर्ण जागा आहे. त्यात डुंबण्याचा आनंद काही औरच आहे. येथे येण्यासाठी स्वत:चे वाहन असेल तर उत्तमच. नसेल तर पालीवरून सहा आसनी रिक्षा मिळू शकते. मात्र त्यांची वर्दळ तुलनेने कमीच आहे.

धोदाणी

धोदाणी हे माथेरानच्या पायथ्याशी वसलेले गाव. पनवेल स्थानकापासून अवघ्या १९ किलोमीटर अंतरावर आहे. गावाकडे जाण्यासाठी एक मोठा ओहोळ ओलांडून पुलावरून जावे लागते. गावाला वळसा घालून वाहणारा हा ओहोळ म्हणजे माथेरान आणि नजीकच्या विकटगडाच्या डोंगरातून वाहत येणाऱ्या अनेक झऱ्यांचे एकत्रीकरण होय. गावापासून या ओहोळाच्या कडेकडेने डोंगराकडे जाणाऱ्या पायवाटेने चालत गेल्यास साधारण पाऊण तासात आपण एका नयनरम्य धबधब्यापाशी पोहोचतो. प्रपाताचे काही पाणी खडकामुळे विभागले जाऊन प्रपात दोन भागात कोसळतो. सुमारे १०० फुटांवरून कोसळणाऱ्या मुख्य  प्रपाताच्या तळाशी खोल डोह तयार झाला आहे. तर शेजारूनच वाहणारे पाणी ८० अंशी तिरकस खडकावरून खळाळत वाहत असते. धबधब्याच्या पाठीमागे असलेल्या माथेरानच्या डोंगरातील वेताळ कडा कातळ भिंतीवरून एका मोठा  प्रपात रोरावत कोसळत असतो. त्यामुळे लांबून पाहताना धबधब्याच्या जोडगळीवर आणखी एक मोठा  धबधबा असा सुंदर देखावा येथे पाहायला मिळतो. ट्रेकर मंडळींनी धोदाणी ते माथेरान (सनसेट पॉइंट) हा दीड तासाचा छोटासा सोपा ट्रेक करायला हरकत नाही. पनवेल बस स्थानकापासून धोदाणी गावासाठी नियमित बससेवा सुरू असून खासगी टमटम रिक्षाही सहज उपलब्ध होतात.