उत्तराखंड दोन प्रदेशांत विभागला आहे. गढवाल आणि कुमाऊ. कुमाऊतील ननिताल हे थंड हवेचे ठिकाण. प्रसिद्ध ननी तलाव आणि ननी मंदिरावरून हे नाव पडले. ननितालच्या सभोवती सात टेकडय़ा आहेत. ननिताल उन्हाळ्याच्या सुट्टीत पर्यटकांसाठी एक सुप्रसिद्ध ठिकाण. येथील प्रेक्षणीय राजभवन सगळ्यासाठी खुले असते. येथील आर्यभट इन्स्टिटय़ूट खगोलशास्त्राच्या अभ्यासकांसाठी एक सुवर्णसंधीच आहे. ननीदेवी मंदिर, मुक्तेश्वर मंदिर बघण्यासारखे आहे, स्नो व्ह्यू पॉइंटला केबल कार जाते. येथील टीफिन पॉइंटवरून कुमाऊ टेकडय़ाचा परिसर फार सुरेख दिसतो. शांत निसर्गाच्या सान्निध्यात खूपशी बदकेआजूबाजूला मजेत पोहताना पाहायची असल्यास बोटिंग भीमताल

येथे करावे.

mayawati west up statehood
उत्तर प्रदेशचा तुकडा पडणार? मायावतींचे पश्चिम उत्तर प्रदेशाचे आश्वासन
China claim on Arunachal Pradesh and its hegemony strategy continues
लेख: चीनचा कावा वेळीच ओळखा..
owaisi apana dal pdm
अखिलेश यांच्या ‘पीडीए’ सूत्राला ओवेसींचे ‘पीडीएम’ देणार टक्कर? उत्तर प्रदेशात तिसरी आघाडी
Naxalites killed
बालाघाट जिल्ह्यात पोलीस – नक्षल चकमकीत दोन नक्षलवादी ठार

पक्षी निरीक्षणासाठी किलबरी पक्षी अभयारण्य आहे. हिमालयातील एक लहानशा पंगोत गावी मुक्काम करून भल्या पहाटे पक्षी निरीक्षणासाठी बाहेर पडावे. ओक आणि पाइनच्या जंगलातला हा किलबिलाट नक्कीच अनुभवण्यासारखा आहे. जिम कॉब्रेट नॅशनल पार्कमध्ये बेंगाल टायगरसाठी जास्त गर्दी असते. जिम कॉब्रेटमध्ये धीकाला प्रदेशात वाघ तर सोनानंदी प्रदेशात हत्ती फिरताना आढळतात.

ननितालपासून एका तासावर असलेल्या राणीखेतचे बिनसर महादेव मंदिर, गोल्फ कोर्स, चौबातिया गार्डन प्रसिद्ध आहेत. अनेक औषधी वनस्पती आणि सफरचंदाची झाडे इथे बघायला मिळतात. इथे स्थानिक लोणची, जाम, ज्यूस उत्तम मिळतात.

जून ते ऑगस्ट महिन्यात तयार फळे झाडावर लगडलेली बघण्यात मजा असते. माकडांपासून सुरक्षित राहण्यासाठी त्यावर जाळी आच्छादून ठेवतात. चौबातिया बाग शासन पुरस्कृत आहे. ती पाहणे पर्यटनाचा अनुभव अधिक समृध्द करते. चौबातिया बाग नीटपणे समजून ती बघण्यासाठी एखादा गाईड घेता येतो. हा परिसर अतिशय रमणीय आहे. ननिताल आणि आसपासच्या परिसरात पाराग्लायिडग करता येते.

दिल्लीहून ननितालपर्यंतचा प्रवास सहा तासांचा आहे. बसेस तसेच स्लीपर कोच असतात. दिल्ली ते रुद्रपूर ट्रेनने आणि तेथून गाडी भाडय़ाने घेता येते. दिल्ली, लखनौ, कोलकाता ते काठगोदाम रोज ट्रेन जाते. हे कुमाऊतील रेल्वे स्टेशन ननितालच्या पायथ्याशी आहे. जवळचा विमानतळ दिल्ली असून कुमाऊतील पंतनगर येथे खासगी छोटी विमाने उतरवण्यासाठीचा विमानतळ आहे. कुमाऊतला हा फेरफटका आणि हिमालयदर्शन तितकेच महत्त्वाचे आहे. त्यातून उर्जा मिळते आणि पर्यटनाचा आनंद द्विगुणित होतो.

सोनाली चितळे sonalischitale@gmail.com