कोकण म्हटलं की समुद्र किनारे, हापूस, पुलंचा अंतू बर्वा आणि रत्नागिरीच्या आळीतले लोकोत्तर पुरुष अशीच काहीशी माझी कोकणशी ओळख होती. पण २०१२ मध्ये वेळास या गावाची ओळख झाली आणि मग ते गाव व तिथल्या कासव महोत्सवामुळे वर्षांतून दोन-चार वेळा तरी तिथे जाणे होते.

इथे मी काढलेले ‘ऑलिव्हर रिडले’चे छायाचित्र ‘नॅशनल जिओग्राफी’ मासिकात झळकले. त्याने फार ओळखी वाढल्या. पण मला ‘आवडता’ छायाचित्रकार केलं ते इथल्या आजी आणि नातवाच्या फोटोने. २०१४ च्या फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात मी वेळासला गेलो होतो. ही माझी या गावाला भेट देण्याची जवळपास ७८ वी वेळ होती. वाइल्ड लाइफ फोटोग्राफीशिवाय पोर्टेट आणि प्रवास चित्रण सुरू केलेलं. कॅमेरा घेऊन फिरत असताना एका आळीमध्ये जुन्या घराच्या अंगणात मला ही आजी तिच्या नातवाला घेऊन बसलेली दिसली. आजीचे सगळे दात जवळपास पडले होते (पुलंच्या भाषेत अन्नू गोगटय़ा झालेला). पण नातवाला खेळवता खेळवता तिने नातवाच्या गालाचा मुका घेतला आणि लोणी गालावर फिरवल्यासारखं तिचा नातू खळखळून हसायला लागला. मी १०-१५ मिनिटे छायाचित्रे काढत होतो. नंतर काढलेली छायाचित्रे आजीला दाखवली. पण कॅमेऱ्याने काढलेले हे तिचे बहुधा पहिले छायाचित्र असावे.

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
How to draw a cat using 5 four times
Video : चार वेळा इंग्रजीत पाच लिहून काढले सुंदर मांजरीचे चित्र, व्हिडीओ एकदा पाहाच
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

मी सर्व छायाचित्रे वेबसाइटवर टाकली तेव्हा आजी आणि नातवाचे हे छायाचित्र सर्वाना फार आवडले. नंतर दोन वष्रे काही वेळासला जाणे जमलं नाही. पण, आता नातू मोठा झाला असेल आणि छायाचित्राची प्रिंट आजी-नातवाला द्यायची, असे मी मनोमन ठरवत होतो. तसा २०१६ च्या उन्हाळ्यात तिथे गेलो. पण, आजी गेल्या वर्षीच देवाघरी गेल्याचं कळलं. तिला फोटो पिंट्र द्यायची राहून गेल्याची रूखरूख अस्वस्थ करून गेली. आठवण म्हणून मी त्या छायाचित्रातल्या छोटय़ा बाळाचे, (तो आता अडीच-तीन वर्षांचा आहे) छायाचित्र काढले.

ganeshbgl23@gmail.com