मणिपूर हे नागालँड, आसाम, मिझोराम या राज्यांच्या व म्यानमार देशाच्या सीमांनी वेढलेले छोटेसे राज्य आहे. इम्फाळ हे राजधानीचे शहर असून येथे विमानतळ आहे. तसेच येथे कोहिमामाग्रे (१४५ किमी) येता येते.

या राज्याचा सुमारे ७०% भूभाग जंगलाने व्यापलेला आहे. त्यातील वन्य प्राण्यांमध्ये डान्सिंग डिअर म्हणजेच नाचणारे हरीण हा दुर्मीळ प्राणी अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.

येथे मेईतेई, नागा, कुकी-चिन मिझो, गुरखा व इतर जमातीचे लोक राहतात. लोकगीत, नृत्य, कला, खेळ, मार्शल आर्ट तसेच हातमाग व हस्तकला हा येथील लोकांच्या जीवनाचा भाग झालेले आहे. तसेच राधा कृष्ण हे येथील संस्कृतीचे प्रतीक आहे.

इम्फाळमध्ये सर्व शहरी सुविधा आहेत. इम्फाळचे वैष्णवांचे केंद्र गोिवदजी मंदिर रॉयल पॅलेसच्या जवळ आहे. येथे सादर केले जाणारे रासलीला नृत्य अद्वितीय असते. इम्फाळचे ख्वाईरामबंद बझार किंवा आयएमए मार्केट हे एकमेवाद्वितीय आहे. येथे सुमारे तीन हजार आयमाज किंवा मदर्स ही दुकाने चालवतात. ही दुकाने रस्त्याच्या दुतर्फा असतात. एका बाजूला भाजीपाला, मासे, किराणा मालाची दुकाने तर दुसऱ्या बाजूला हातमाग, हस्तकला, घरगुती उपयोगाच्या वस्तू असतात. नगराच्या मध्यभागी शहीद मिनार उभारलेला आहे. सन १८९१ मध्ये इंग्रजांशी लढताना प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा स्तंभ उभारण्यात आला आहे. तसेच दुसऱ्या महायुद्धात धारातीर्थी पडलेल्या इंग्रज व भारतीय सनिकांचे युद्ध स्मारकही येथे आहे.

मणिपूरमध्ये किमान ५०० प्रकारचे ऑíकड आहेत. त्यापकी किमान ११० प्रकारचे ऑíकड इम्फाळपासून सात किमी अंतरावरील ऑíकडरियममध्ये पाहायला मिळतात. तसेच सहा किमी अंतरावर मणिपूर झूलॉजिकल गार्डन आहे.

इम्फाळपासून ४५ किमीवर मोईरंग येथे थांगजिंग देवतेचे पुरातन मंदिर आहे. मोईरंग  येथे १९४४ मध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या इंडियन नॅशनल आर्मीचा ध्वज फडकविण्यात आला होता. येथील संग्रहालयात याबाबतच्या वस्तू जतन केलेल्या आहेत.

इम्फाळपासून ४५ किमीवर पूर्वाचलातील सर्वात मोठय़ा तलावापकी असलेला लोकटाक तलाव आहे. या तलावाच्या दक्षिण भागात जगातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान आहे. या तलावाचा संपूर्ण परिसर नयनरम्य आहे. मणिपूरचे प्रसिद्ध उखरूल हिलस्टेशन ८३ किमी वर आहे. येथील सिरोई लीली प्रसिद्ध आहेत.

तसेच येथील कांगखुई हे चुनखडीचे भुयार पाहण्यासारखे आहे.

इंफाळहून सिलचर माग्रेही गुवाहाटीला रस्ता आहे. परंतु हा रस्ता खूप खराब व अशांत प्रदेशातून जाणारा आहे. त्यामुळे इंफाळला जाण्या-येण्यासाठी कोहिमामाग्रेच जाणे श्रेयस्कर. त्यामुळे मणिपूरनंतर नागालँडची भटकंती करावी.

नागालँड व मणिपूर या राज्यांत दिवसाउजेडी भ्रमंती करणे व अंधार पडण्यापूर्वी आपल्या निवासस्थानी परतणे उत्तम असते.  मणिपूर भ्रमंतीसाठी नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी उत्तम असतो.

हृषीकेश यादव – hrishikeshyadav@hotmail.com