|
|
कव्हर स्टोरी
दिवस : सोमवार २३ ऑगस्ट.
वेळ : संध्याकाळची.
ठिकाण : दहिसर क्राइम ब्रँच.
पोलीस ठाण्यात फोन वाजला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या कुणाला वाटलंही नव्हतं की हा फोन आपला पुढचा सगळा आठवडा खराब करणार आहे! खराबच म्हणायला हवं, कारण पुढचे चार-पाच दिवस क्राइम ब्रँचच्या इथल्या युनिटला रात्रीची साधी झोपही घेता आली नाही..
तब्बल सहा कोटींच्या हिऱ्यांची चोरी झाली होती! तीसुद्धा देशातल्या पोलीस व्यवस्थेत क्रमांक एकवर असलेल्या ‘मुंबई पोलिसांच्या मुंबईतून’!
सहा कोटींचे हिरे चोरीला गेल्यामुळे देशाचं आणि मुंबई पोलिसांचंही नाकच कापलं गेलं होतं. त्यामुळे आता त्या चोरांना पकडून नाक जागच्या जागी लावण्याची जबाबदारी आली होती दहिसरच्या क्राइम ब्रँच पोलिसांवर.. |
|
विकास
विकास की पर्यावरण.. प्रगती की निसर्ग.. अर्थार्जनाच्या चढत्या आलेखाला बसलेली खीळ की मानवी अधिकारांची पायमल्ली.. राज्याची घोडदौड की स्थानिकांना विस्थापित आयुष्य न जगता मिळणारी रोजी-रोटी.. संपूर्ण राज्याचा विकास की काही लाख लोकांच्या आयुष्यावर होणारे दूरगामी परिणाम? महत्त्व कशाला द्यायचं? प्रगतीचे निकष काय आहेत? या प्रकल्पांशिवाय विकास शक्य नाही का? पर्यावरणाचं, निसर्गाचं आपल्या आयुष्यात स्थान काय आहे?.. वादामध्ये सापडलेलं नवी मुंबईतलं विमानतळ, कोकणातले अणूऊर्जा प्रकल्प, सिंधुदुर्गातल्या खाणी, गोव्यातल्या खाणी, नियामगिरीचा लढा, देशातले धरण प्रकल्प अशा प्रकल्पांच्या अनुषंगाने वारंवार उद्भवणारे हे प्रश्न आहेत. हा फक्त पर्यावरणवाद्यांचा लढा आहे का, की यामागे पर्यावरण, अर्थकारण आणि राजकारण असे तीनही घटक कार्यरत आहेत याचा आढावा घेणं गरजेचं आहे. |
|
रंगभूमी
एकेकाळी मराठी नाटकवाल्यांचा हक्काचा अड्डा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एनसीपीएमधून गेल्या काही वर्षांत मराठी नाटक हद्दपारच झालं होतं. पण नुकतंच ऑगस्टमध्ये ‘प्रतिबिंब’ हा प्रायोगिक मराठी नाटकांचा एक दमदार फेस्टिवल सादर झाला. ललित कला केंद्र, आसक्त, आविष्कार यासारख्या संस्था, मनस्विनी लता रवींद्र, अनिरुद्ध खुटवड, सुषमा देशपांडे, गितांजली कुलकर्णी यांसारखे दिग्दर्शक, अनिता दाते, पद्मनाभ बिंड, वीणी जामकर यांसारखे कलाकार यांनी प्रतििबब चांगलाच गाजवला. ‘प्रतिबिंब’ यशस्वी करण्यात आणखी एका व्यक्तीचा महत्त्वाचा वाटा होता, त्या म्हणजे एनसीपीएच्या थिएटर अॅण्ड फिल्म प्रोग्रॅिमग हेड दीपा गेहलोत. दीपा गेहलोत यांनी मे २०१०मध्ये नुकताच पदभार स्वीकारला याबद्दल त्यांच्याशी केलेली बातचीत. |
|
लाइफ जिंगालाला
तू चारचौघांत काहीही बोलतेस म्हणून तुला घाबरणारे इंडस्ट्रीत बरेच आहेत असं म्हणतात हे खरं आहे का..
हो नक्कीच. मी माझ्या मनात जे काही आहे ते पटकन बोलते. मुख्य म्हणजे मी स्पष्ट बोलते. तोंडावर एक आणि माझ्या मनात काहीतरी दुसरंच आहे असं माझं कधीही होत नाही. त्यामुळेच मी आल्यावर असं अनेकांना होतं की आता ही काय बोलतेय बाप रे.. मी काही बोलले तर तो एक चर्चेचा विषय नक्कीच होतो. मग त्यात काय वाईट आहे..
तू खूप फटकळ आहेस..
हो. मला आवडतं असंच राहायला. त्यामुळे का होईना पुरुष माझ्यापासून वचकून तरी आहेत. एक गोष्ट अगदी स्पष्ट सांगू का.. मी अशी फटकळ आहे म्हणून मी आजपर्यंत इथे टिकून राहिल्येय असं मला वाटतं. त्यामुळे फटकळपणाचा फायदा मला फील्डमध्ये राहण्यासाठी नक्कीच खूप झाला. या फील्डमध्ये असे अनेकजण आहेत की त्यांच्या अनेक गोष्टी मी जाणून आहे. मग त्यांना वठणीवर आणायचं किंवा कंट्रोलमध्ये ठेवायचं तर हा फटकळपणा अंगी हवाच. |
|
पर्यटन
दक्षिण आफ्रिकेच्या पर्यटन विभागाचं आमंत्रण मिळालं आणि दक्षिण आफ्रिकेला जाण्याची तयारी सुरू केली तेव्हा डोक्यातली आदिम आफ्रिका घट्ट होती. पिसांचे आखूड स्कर्ट घातलेले मलखांबी पायाचे ड्रम वाजवणारे आफ्रिकन डोळ्यासमोर तरळत होते. त्याचवेळी सॅफ्रिकाची क्रिकेट टीम, सन सिटीत झालेली विश्वसुंदरी स्पर्धा, फिफा २०१०चं आयोजन वगैरे आधुनिक गोष्टींनी बुचकळ्यात टाकलेलं. त्यात दक्षिण आफ्रिकेचं काळं-पांढरं संतुलन काही केल्या लक्षात येत नव्हतं. साऊथ आफ्रिकन एअरवेजमध्ये गोऱ्या आणि काळ्या हवाई सुंदऱ्या आणि पर्सरही एकत्र सेवा देताना दिसले तेव्हा साधारण तिथल्या नव्या समाज व्यवस्थेची झलक लक्षात आली. पण जोहानसबर्ग विमानतळावर उतरल्यावर झटक्यात सामोरा आला तो अत्याधुनिक दक्षिण आफ्रिका हा देश. |
|
आरोग्य
श्रावणात घन निळा बरसला.. रिमझीम रेशीम धारा हे गाणं गुणगुणताना श्रावणात बरसणाऱ्या या रेशीम धारात चिंब चिंब भिजून आनंद लुटण्याची मजा काही औरच! पण सध्या या रेशीम धारा बरसत असतानाही या आनंदापासून वंचित आहेत ते मुंबई आणि ठाणेकर. कारण ते सध्या साथीच्या तापाच्या वादळात सापडलेत. जुलै महिन्यात सुरुवात झालेल्या पावसापासून मलेरियानं जे थैमान घालायला सुरुवात केलीय ते अजूनही आटोक्यात येत नाहीय.
खरं तर दरवर्षी पावसाबरोबर साधा ताप, व्हायरल फिव्हर, मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, कावीळ, लॅप्टोस्पायरोसिस हे साथीचे आजार जास्त प्रमाणात दिसतात. या वर्षी व्हायरल फिव्हर, मलेरिया याचं प्रमाण जास्त आहे. |
|
|
|