३ जुलै २००९
राजकारण
विधिमंडळाचे सूप वाजताना या वेळी बऱ्याच विचित्र घटना घडल्या. काही संस्मरणीय तर काही दु:खदायक. विद्यमान अकराव्या विधानसभेचे हे निरोपाचे अधिवेशन होते, पण शेवटचा दिस काही गोड-धोड झालाच नाही. संस्मरणीय घटना म्हणाल तर सतत एकमेकांच्या विरोधातील मुद्दे शोधणारे दोन नेते एका बाजूला आलेले दिसले! महसूल मंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्ष नेते रामदास कदम हे एका सुरात बोलले ही फारच मोठी घटना म्हणावी लागेल! ‘‘अकराव्या विधानसभेचे अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी गेल्या पाच वर्षांत विरोधी व सत्तारूढ बाजूंना सारखेच सांभाळून घेत सभागृहाचा गाडा चांगल्या रीतीने हाकला, त्याबद्दल त्यांचे कौतुक झाले पाहिजे,’’ अशी भावना राणेंनी व्यक्त केली. कुपेकरांचे आभार मानणारा ठराव यावा असे मत राणेंनी व्यक्त करताच कदमांनी मोकळेपणाने त्याचे स्वागत केले. अनेकांना ही बाब बरीच धक्कादायक वाटलेली दिसली. २००५ मध्ये नारायण राणेंनी शिवसेनेचा त्याग केला तेव्हापासून कोकणातीलच दुसरे मराठा नेते रामदास कदम यांच्याकडे विरोधी पक्ष नेतेपद आले. आणि जणू त्याच्या वारसातच कदमांना राणेंच्या विरोधात लढण्याचे बळ मिळाले.


कव्हरस्टोरी
मराठीत एक म्हण आहे, ‘तेलही गेले, तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे’.. आता लवकरच ही म्हण शब्दश: खरी ठरण्याची वेळ येऊन ठेपलीय. सतत भरभराट, सतत समृद्धी, औद्योगिक प्रगती, वेगानं जवळ येणारं जग या साऱ्या संकल्पनांना लवकरच तिलांजली देण्याची वेळ आता जवळ येतेय. आणि हे असं झालं तर कदाचित तुम्हा-आम्हाला परत एकदा खेडय़ात, जंगलात आदिमानवासारखं राहण्याची पाळीही येण्याची शक्यता आहे. हे सारं वाचायला कल्पनाविलास वाटेल पण दुर्दैवानं हे वास्तवाच्या अगदी जवळ आहे. जगातल्या काही अति-उच्चशिक्षित, विचारी, बुद्धिवंत अशा भूगर्भ आणि भौतिक विज्ञानातल्या शास्त्रज्ञांनी अभ्यासाअंती काढलेलं हे एक महाभयानक अनुमान आहे. हा अभ्यास आहे एका प्रचंड जागतिक घडामोडीचा ज्याला इंग्रजीत ‘पीक ऑईल’ असं म्हणतात. मराठीत याला नक्की काय म्हणतात हे माहिती नाही पण आपण ‘तेल पराकोटी’ असं आपल्या सोयीसाठी याला नाव देऊ.

इतिहास
‘सुद बोल रे नाऱ्या तर म्हणे मांडवाला लागली आग’, असे वाटणारा एक अभद्र विचार, Death of God and death of man! पण पवित्र आवरणाखाली झाकलेले मानवी अस्तित्वाचे खरे रूप उघडे पाडण्यासाठी केलेला तो एक धमाका आहे. अश्मीभूत झालेल्या जुनाट संस्कारांना लावलेला सुरुंग आहे. निद्रिस्त मनांना खडबडून जाग यावी म्हणून वापरलेले धक्कातंत्र आहे. पाश्चिमात्य जगात हे विचारमंथन घडून आले. तेथे अशी स्फोटक विधाने कोणी, केव्हा वा कोणत्या अर्थाने केली याचा मागोवा घेत गेल्यास एक आगळी शोधयात्रा घडून येते. `Dead are all gods’ असे जळजळीत विधान जर्मन तत्त्वज्ञ फ्रेड्रिक नित्शे याने १८८३ साली केले. झरतुष्ट्रावरील गद्यकाव्यात त्याने मांडलेला विचार थोडक्यात असा. एके काळी मानवांमध्ये बळी तो कान पिळी हा न्याय उघडपणे होता. पुढे सुसंस्कृत अवस्थेत धटिंगणांवर मात करण्यासाठी दुबळ्या लोकांनी धर्म निर्माण केला. ‘‘तू पापी आहेस’’ असे माणसाच्या मनात भरविले. त्याला नरकाची भीती व स्वर्गाचे आमिष दाखविले आणि आपली सत्ता प्रस्थापित केली. ख्रिस्ती धर्माचा उदय म्हणजे गुलामी वृत्तीच्या नीतिमत्तेची स्थापना.

मेतकूट
क्रिकेट हा कोणे एके काळी चेंडूफळीचा खेळ असेलही पण आज मात्र तो केवळ फळीचा खेळ राहिलाय. ‘मिस्टर इंडिया’ने ‘मोगँबो’ला मारल्यावर व्हावा तसा आनंद फलंदाजाने गोलंदाजाची धुलाई केल्यावर क्रिकेटप्रेमी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रेक्षकांना होत असतो. जणू फलंदाज म्हणजे वाघ व गोलंदाज म्हणजे त्या वाघाने मारून खाण्यासाठी ठेवलेला बोकड. आपण ही शिकार बघायची व बोकडाचे जेवढे लचके निघतील तेवढय़ा आनंदाने टाळ्या वाजवायच्या. माणसाने माणसाचा केलेला शारीरिक व मानसिक छळ या हिंस्र करमणुकीला मिळणारा उदार लोकाश्रय हे स्वरूप आज क्रिकेटला आलंय.

माइण्ड ओव्हर मॅटर
शायनीच्या शयनगृहातली मोलाची गोष्ट सध्या इंग्रजी माध्यमांच्या चव्हाटय़ावर चवीचवीने चर्चिली जात आहे. या शायनी आहुजा नामक ठोकळ्याला काल-परवापर्यंत कुणी ओळखतही नव्हतं. मात्र सध्या त्याचे फोटो सर्वत्र झळकताहेत. हाच तो शायनी आहुजा असं जो तो सांगत सुटलाय.
त्याचे संदर्भ रेडियो डीजे देतायत. बोलताना जागोजाग ‘नॉट दी शायनी आहुजा स्टाइल’ अशी उदाहरणपेरणी करतायत.
टीव्ही चॅनेलवाले तर त्याचे कुटुंब सदस्य असल्यासारखेच वागतायत.

भविष्य