१० जुलै २००९
तथास्तु

४ हा अंक अतिविचारशील व रचनात्मक मूलांक आहे. या अंकाचा स्वामी हर्षल असून, याला इंग्रजीमध्ये युरेनस असं म्हटलं जातं. हर्षलवर भारतापेक्षा पाश्चात्य देशांमध्ये अधिक माहिती उपलब्ध आहे. हर्षल हा सूर्याचे प्रतीक आहे. त्यामध्ये गुण आणि अवगुणही आहेत.
हर्षल हा ग्रह अतिविचार करणारा ग्रह मानला जातो. नवे काही विचार किंवा परंपरा सुरू करण्यात हर्षलचा हातखंडा असतो. ३ संख्या म्हणजे ज्ञान तर ५ म्हणजे बुद्धी यांच्या मध्ये हा अंक किंवा येतो.
स्वरूप: ४ हा मूलांक कधी खूप आकर्षक तर कधी अति अनाकर्षक वाटतो. छान मूडमध्ये या व्यक्ती आकर्षक दिसतात.
व्यक्तिमत्व: ४ हा मूलांक असलेल्या व्यक्तींचे एकूण व्यक्तिमत्व विशाल असते. पण कधी कधी हे अगदी याउलट निदर्शनास

 

येतात. यांचे स्वतचे असे एक वेगळेच व्यक्तिमत्व असते. कुठल्याही गोष्टीकडे पाहताना हे एका वेगळ्या नजरेतूनच पाहतात. या लोकांना आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे दाखविण्याची प्रबळ इच्छा असते. यामुळेच अनेकदा समोरच्या व्यक्तींचा गैरसमज निर्माण होतो. अर्थात बऱ्याचदा विरोधकही यांचे विचार नंतर स्वत मान्य करतात. ४ मूलांक असलेल्या व्यक्ती अति विचारशील आणि अतिकल्पनाशील असतात. परंपरा आणि कायदा सुव्यवस्था यांच्यासंदर्भात अनेक मतभेद होऊ शकतात. क्वचित प्रसंगी या व्यक्ती अतिधार्मिक तर त्याविरूद्ध टोकाच्या भूमिकेतही दिसू शकतात. यांचे जीवनही अस्थिर असून, कधी हे राजाप्रमाणे जगतात, तर कधी रंकाप्रमाणेही यांना जगायला लागते. यांच्या आर्थिक स्थितीमध्येही झपाटय़ाने बदल होत असतात. कधी श्रीमंत तर कधी गरीब असे बदल यांच्यात बऱ्याचदा दिसतात. नवीन विचार आणि नवीन काही उपक्रम करण्यात हे कायम अग्रेसर असतात. यांचे जीवन सामान्य कधीच नसते, सतत काही ना काही मोठय़ा घटना किंवा गोष्टी यांच्या आयुष्यात घडत असतात. कधी या व्यक्ती अचानक प्रसिद्ध होतात तर त्याच क्रमाने यांना लोकांच्या टोमण्यांनाही सामोरं जावं लागतं. यांच्या जीवनात उत्कर्ष, प्रगती, प्रेम, धनलाभ, भाग्योदय, व्याधी, कष्ट, मान, अपमान, विरोध, समर्थन या अशा काही गोष्टी अकस्मात घडत असतात. यांची आर्थिक स्थिती नेमकी काय आहे याचा कुणालाच पत्ता लागत नाही. स्वतजवळ काय आहे यांचा सुगावाही या व्यक्ती लागु देत नाहीत. स्वतच्या प्रतिमेबद्दल सतर्क असणारे हे लोक अनेकदा अविचारीपणाने चुका करतात. समोरच्या व्यक्तीवर यांचा लगेच प्रभाव पडतो पण तो फार काळ मात्र टिकत नाही. गुप्त आणि गुढविद्या यासारख्या गोष्टीत यांना अधिक रस असतो. ज्योतिष, तंत्र-मंत्र, वास्तू अशा तत्सम गोष्टीत यांना अधिक रस असतो. राजकारणात देखील यांना रस असतो, पण त्यामध्ये एका विशिष्ट पदापर्यंत पोहोचण्यास मात्र यांना वेळ लागतो. संगीत, कला, लिखाण, अभिनय याकडे यांचा कल हा स्पष्टपणे दिसून येतो. या लोकांना पैसा कमवायचा असतो व तो ते कमवतातही, पण तो सुरक्षित ठेवता मात्र यांना येत नाही. यांच्या डोक्यातून अनेक नव्या सुपीक कल्पना सतत जन्म घेत असतात. परंतु याचा लाभ मात्र यांना स्वतला होत नाही. दुसऱ्या व्यक्तींना मात्र यांच्या विचाराचा खूप फायदा होतो. दिखाऊपणाला या व्यक्ती अधिक प्राधान्य देतात. सहजासहजी हार पत्कारणं हे यांच्या स्वभावतच नाही. फिरणं, छानछोकीत जीवन जगणं आणि प्रसिद्धी याकरता हे पैसा खर्च करतात. या व्यक्ती अति भावुक असून, यांना रागही फार लवकर येतो. जितक्या लवकर यांना राग येतो तितक्याच लवकर ते शांतही होतात. आजूबाजूची सर्व सुखं प्राप्त करण्याकडे यांचा कल असतो आणि ते करतातही. ४ मूलांक असणाऱ्यांनी भविष्यासाठी बचत ही करायला हवी. त्याचबरोबर जवळ
असलेल्या धनाचा संचय व्यवस्थित करायला हवा. नाहीतर यांना संकटाला सामोरं जावं लागेल.
स्वभाव: घराबाहेरील व्यक्तींसाठी या व्यक्ती एकदम मधुर आणि विनोदप्रिय अशा असतात. पण घरातील व्यक्तींना मात्र या व्यक्ती अतिशय कठोर भासतात. शत्रूलाही मदत करण्यात हे मागेपुढे पाहात नाहीत. त्यामुळे तो शत्रू हा त्यांचा कायमचा शत्रू राहात नाही.
गुण: विचारशीलता, चिंतन आणि दयाळुपणा हा यांचा वाखाणण्याजोगा गुण आहे. दुसऱ्यांच्या दुखामुळे यांना खूप त्रास होतो. विचारशीलता हा यांचा गुण ठरतो तर अतिविचार हा यांच्याकरता अवगुणही ठरतो याचीही नोंद घ्यायला हवी. अतिविचार करण्यामुळे ते स्वतची कार्यक्षमता गमावून बसतात.
शुभ तारीख: १, २, ४, १०, ११, १३, १९, २०, २२, २८, २९, ३१ या प्रत्येक महिन्याच्या शुभ तारखा आहेत. यादिवशी महत्त्वाची कार्ये करावीत.
अशुभ तारीख: ३, ९, १२, १८, २१, २७ या तारखांना महत्त्वाचे कार्य करू नये.
भाग्यशाली रंग: नीळा, हिरवा, सफेद, राखाडी
भाग्यशाली दिवस: शनिवार, बुधवार
भाग्यशाली र्वष: १०, ११, १३, १४, १९, २०, २८, २९, ३१, ३७, ३८, ४०, ४१, ४६, ४७, ५०
भाग्यशाली मंत्र-
ऊॅं वं वरद मुत्तर्यै नम।
ऊॅं ही घृणि सुर्याय आदित्य श्री श्रीं श्रीं।
ऊॅं ऐं हीं क्लीं श्रीं क्लीं हीं ऐं ऊॅ।
anandjohri@gmail.com