४ सप्टेंबर २००९
गणेश विशेष
सध्या प्रसारमाध्यमांनी स्वाइन फ्लूवरच्या बातम्यांमुळे त्याचप्रमाणे सर्वसामान्यांच्या डोळ्यांवर अपुऱ्या माहितीची पट्टी बांधून ‘स्वाइन फ्लू’च्या रेल्वे ट्रॅकवरून धावण्यास भाग पाडले आहे. पण या ट्रॅकवरून एवढय़ा मोठय़ा संख्येने रेल्वेगाडय़ा काही जीवन घेण्यासाठी धावत नाही आहेत आणि आपण सर्वजण या संकटातून सहीसलामत बाहेर येऊ हे सर्वसामान्यांना कोणीतरी पटवून सांगायला हवे. विशेष म्हणजे डॉक्टरांनी या आजाराविषयी लोकांची भीती घालवायला हवी, तेही सर्दी, खोकला, ताप आला तरी धाय मोकलून रडताहेत. म्हणून ‘स्वाइन फ्लू’ची साथ नक्की संपेल, पण भीतीच्या साथीने कितीतरी लोक रोज मरत आहेत.


प्रतिक्रिया
‘फलज्योतिषाची ऐशीतैशी’ या लेखात फलज्योतिष संस्कृती कशी घडत गेली याचा इतिहास जाणून घेणे प्रबोधनकारी ठरू शकते, असा डॉ. रायकरांचा प्रतिपादनाचा मुद्दा आहे आणि तो त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने सविस्तरपणे मांडला आहे. त्यांच्या लिखाणात सत्य आहे, पण ते इतिहासपूर्ण विवेचन आहे. फलजोतिष शास्त्र आहे किंवा ते थोतांड आहे हे ते सिद्ध करू शकत नाहीत. तात्त्विक विचारसरणीचा विचार शास्त्रीय पद्धतीने होणे आवश्यक असते. इतिहास हे एक शास्त्र असेल, पण ते विषयाच्या तात्त्विक विचारसरणीचे मूल्यमापन करण्यास कितपत योग्य आहे, याचा विचार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. शास्त्राच्या तत्त्वज्ञानाचा ऊहापोह वेगळा आणि त्याचा इतिहास सांगणे वेगळे; हे दोन स्पष्ट वेगळे विचारप्रवाह आहेत. माननीय डॉ. रायकर यांनी ऐतिहासिक बाजू फार स्पष्टपणे व तर्कशुद्ध पद्धतीने मांडली आहे ही गोष्ट निर्विवाद आहे.

प्रतिक्रिया
डॉ. यशवंत रायकर यांच्या ‘फलज्योतिषाची ऐशीतैशी’ या लेखावर डॉ. श्री. श्री. भट यांनी सतरा मुद्दे उपस्थित करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. एक वाचक म्हणून त्यातील अनेक मुद्दे असंयुक्तिक वाटले.
१) राशींचा शोध प्रथम खाल्डियन लोकांनी लावला हे झाले एक ऐतिहासिक सत्य. वैज्ञानिकांनी त्यावर बरेचसे परिपूर्ण संशोधन केले आहे. अशा मूळ शोधावर आपल्या लोकांनी केलेली रुपके या नंतरच्या केवळ कविकल्पना.

कव्हरस्टोरी
छान स्वच्छता करायची म्हणजे केर लोटून घ्यायचा, पाणी शिंपायचं आणि भिंतीच्या कोपऱ्यांवर आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूलाही डीडीटीची रांगोळी काढायची..
हा असला मूर्खपणा कालपरवापर्यंत सुरू होता. डीडीटी किंवा एजंट ऑरेंजसारखी कीटकनाशकं कर्करोगाला निमंत्रणं ठरू शकतात, हे स्पष्ट झाल्यामुळं जगभरातील प्रगत देशांनी या कीटकनाशकांवर बंदी आणली तरी आपण अशीच स्वच्छता करत होतो आणि आपल्या फुफ्फुसांमध्ये डीडीटीचे थर जमा करत होतो. कोकाकोला प्यायल्यानंतर कशी जबरदस्त स्फूर्ती येते हे मनावर िबबवणाऱ्या जाहिरातीत कोणी क्रिकेटपटू किंवा अभिनेता कोकाकोलाची बाटली रिचवताना दिसला की त्याचे अंधानुकरण करायला आपण तत्पर. बिचाऱ्या सुनीता नारायणने या प्रकारच्या पेयांमध्ये कीटकनाशकांचे अंश असल्याचं सांगितलं तरी आपण पैसे देऊन असा विषप्रयोग स्वत:वर करवून घेणं थांबवलं नाही.

इतिहास
‘मी आत्मचरित्र लिहिणार नाही’, असं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी फार पूर्वीच जाहीर केलेलं आहे. त्यामुळे एक व्यंगचित्रकार ते शिवसेनेसारख्या एका आक्रमक पक्षाचा सर्वोच्च (हुकूमशहा)नेता या वादळी जीवनातील शेकडो नाटय़मय प्रसंगांना एक वाचक म्हणून सगळ्यांनाच मुकावं लागलं. पण शिवसेनाप्रमुखांनी आत्मचरित्र लिहिलं नाही म्हणून त्यांच्याविषयी माहिती मिळवण्याची, त्यांच्या जीवनात डोकावण्याची सर्वसामान्यांची उत्सुकता मात्र तसूभरही कमी झाली नाही. उलट ती वाढलीच. शिवसेनाप्रमुखांच्या ह्याच लोकप्रियतेमुळे असेल कदाचित, त्यांच्याविषयी प्रसिद्ध झालेलं प्रत्येक पुस्तक किंवा विशेषांक हातोहात खपले. प्रकाश अकोलकरांचं ’जय महाराष्ट्र’ असेल किंवा राज ठाकरेंनी प्रसिद्ध केलेली ‘बाळ केशव ठाकरे फोटोबायोग्राफी’, वाचकांनी त्याला उचलून धरलं. पण गेल्या आठवडय़ात प्रसिद्ध झालेलं ’गजाआडील दिवस’ हे पुस्तक ‘बाळ ठाकरे’ हा माणूस आणि ‘शिवसेना’ हा पक्ष यांवर प्रसिद्ध झालेल्या इतर सर्व पुस्तकांपेक्षा वेगळं आहे, कारण ते स्वत: बाळासाहेबांनी लिहिलेलं आहे!

भविष्य