01vijayमेष – स्वभावत: तुमची रास प्रचंड उत्साही आहे.  पूरक ग्रहमानामुळे तुम्ही थोडेसे बिनधास्त बनाल. व्यापार-उद्योगात मात्र तुमच्या कृतीला नियोजनाची जोड दिली तर सोन्याहून पिवळे. कारखानदारांना नवीन कामाचा विस्तार करण्यापूर्वी संबंधित निष्णात व्यक्तीचा सल्ला घेऊन मगच निर्णय निश्चित करावे. नोकरीमध्ये एका विशिष्ट कामगिरीकरिता तुमची निवड होईल. नवीन नोकरीच्या कामात यश लाभेल. घरामध्ये समारंभाच्या निमित्ताने पाहुण्यांची हजेरी लागेल आणि खरेदीचे बेत ठरतील.

वृषभ– नियोजनाचा फारसा उपयोग न झाल्यामुळे शेवटी तुम्ही धक्कास्टार्ट पद्धतीने काम करायचे ठरवाल. व्यापार-उद्योगात तुमच्या कामाचा विस्तार करण्यासाठी नवीन पद्धतीचे काम हाती घ्यावेसे वाटेल. त्याचाच एक भाग म्हणून देशात किंवा परदेशात नवीन शाखा उघडावीशी वाटेल. नोकरीमध्ये जे काम तुमच्यावर सोपवलेले आहे ते काम चांगल्या पद्धतीने पूर्ण कराल, पण वरिष्ठ लगेचच दखल घेणार नाहीत. ज्यांना कामात बदल हवा असेल त्यांनी प्रयत्न सुरू करावेत. घरात एखादे मंगलकार्य ठरण्याची शक्यता आहे.

मिथुन ‘कळते पण वळत नाही’ अशी तुमची स्थिती असणार आहे. व्यापारामध्ये एखादी गोष्ट आपल्याला परवडत नाही, हे माहीत असूनही नेमकी तीच पूर्ण करण्याकरिता जनसंपर्क आणि प्रसिद्धीचा चांगला उपयोग होईल. गिऱ्हाईकांकडून प्रतिसाद चांगला मिळेल, पण प्रत्यक्ष फायद्याचे प्रमाण मात्र कमी राहील. नोकरीमध्ये संस्थेकडून मिळणाऱ्या सुखसुविधांचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा उठविण्याचा प्रयत्न कराल. घरामध्ये मनोरंजनाचा कार्यक्रम ठरवाल. कुटुंबीयांसह देशात किंवा परदेशात दौरा करायचे ठरेल.

कर्क थोडीशी काटकसर करायची असे तुम्ही ठरवाल, पण आयत्या वेळेला भावनेच्या भरात तुम्हीच पसे खर्च कराल, यावरून तुमच्यावर थोडीशी टीका होईल. व्यवसाय-उद्योगात गिऱ्हाईकांना आकर्षति करण्याकरिता वेगळी योजना घोषित कराल. त्यामध्ये बरीच गुंतवणूक करावी लागेल. नोकरीमध्ये कामाचा झपाटा उत्तम राहील, पण वरिष्ठ आणि सहकारी त्याचा गरफायदा घेतील. घरामध्ये सगळ्यांच्या आवडीनिवडीनुसार एखादा खास कार्यक्रम ठरेल. बऱ्याच दिवसांनंतर जुन्या मित्रांची गाठभेट होईल.

सिंह ज्या गोष्टी पूर्वी तुम्हाला हातातोंडाशी येऊन सोडून द्याव्या लागल्या होत्या त्यामध्ये मुसंडी मारावीशी वाटेल. व्यापार-उद्योगात एखादा नवीन उपक्रम तुम्ही सुरू केला असेल तर त्यातून चांगला प्रतिसाद मिळेल. सध्या चालू असलेल्या कामाव्यतिरिक्त एखादे नवीन पद्धतीचे काम तुम्हाला हातात घ्यावेसे वाटेल. नोकरीमध्ये तुमच्या गुणांना वाव मिळाल्यामुळे भरपूर काम करण्याची तुमची तयारी असेल. घरामधल्या व्यक्तींसमवेत काही महत्त्वाचे कार्यक्रम ठरतील. त्यांच्याबरोबर प्रवासाला जावेसे वाटेल.

कन्या ज्या कामात अडथळे आले होते, त्यामध्ये शक्ती आणि युक्तीचा उपयोग करून असे प्रश्न मार्गी लावण्याचा तुम्ही निश्चय कराल. व्यापार-उद्योगात एखादी नवीन योजना कार्यान्वित होऊ शकेल. योग्य त्या व्यक्तींकडून तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने काम करताना मजा वाटेल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या अडचणी  समजून घेऊन त्यावर योग्य तो उपाय सुचवतील. बेकार व्यक्तींना एखादी नवीन संधी दृष्टिक्षेपात येईल. घरामध्ये जे कार्य लांबलेले होते त्यावर सर्व जण एकत्र बसून काही तरी निर्णय होईल.

तूळ ग्रहमान तुम्हाला कोडय़ात टाकणारे आहे. व्यापार-उद्योगात कोणतेही नवीन प्रकल्प किंवा योजना हातात घेण्यापूर्वी त्यातून खरोखर फायदा होणार आहे का, याचा नीट अभ्यास करा. गरज वाटल्यास त्या क्षेत्रातल्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. ज्यांचा जोडधंदा आहे त्यांना जादा काम स्वीकारण्यापूर्वी हातात असलेले काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या गुणांचे कौतुक करतील. त्याला भुलून जाऊन तुम्ही जास्तीचे काम स्वीकाराल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तीचे विचार सहजगत्या पटणार नाहीत.

वृश्चिक सभोवतालची परिस्थिती जरी तुमच्या प्रगतीला फारशी पूरक नसली तरी त्यातून एखादा मार्ग काढून तुम्ही वाटचाल करीत आहात. व्यवसाय-उद्योगात एकीकडे प्राप्तीचे प्रमाण तात्पुरते वाढण्याची लक्षणे दिसू लागतील तर दुसरीकडे अनपेक्षित खर्च उद्भवल्यामुळे तुम्ही कोडय़ात पडाल. मशिनरीची देखभाल, दुरुस्ती वगरे गोष्टी अपरिहार्य होतील. नोकरीमध्ये सहकारी चुकीचा सल्ला देतील, पण वरिष्ठांचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींचा सल्ला अमलात आणावासा वाटणार नाही.

धनू एखादा नवीन संकल्प तुमच्या मनात असेल आणि त्याला काही कारणाने अडथळे आले असतील तर ती कोंडी फोडण्याचा तुम्ही निश्चय कराल. व्यापार-उद्योगात उत्पन्नाचे एखादे नवीन साधन शोधण्याचा तुमचा मानस असेल. ज्या कामात स्पर्धकांनी तुमची अडवणूक केली होती. त्यामध्ये तुम्ही आक्रमक पवित्रा घ्याल. नोकरीमध्ये तुमच्या कामाला महत्त्व आल्यामुळे संस्थेतर्फे तुमची बडदास्त ठेवली पाहिजे. घरामधल्या व्यक्ती मौजमजेच्या मूडमध्ये असतील. एखादे शुभकार्य ठरण्याची शक्यता आहे. मात्र हे खर्चीक असेल.

मकर पुढील तीन-चार आठवडे वाढणाऱ्या खर्चाकरिता तुम्हाला तयार व्हावे लागेल. हे खर्च चांगल्या कारणाने असल्यामुळे तुमची तक्रार नसेल. व्यापार-उद्योगात एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने कमवायचे असा प्रकार असेल. हातामध्ये भरपूर पसे येतील. ज्यांचा जोडधंदा आहे, त्यांना कमाई करण्याची संधी मिळाल्याने खूश असतील. नोकरीमध्ये तुम्ही येणाऱ्या प्रत्येक संधीचा फायदा घ्याल. तरीही तुमचे समाधान होणार नाही. घरामध्ये एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळ्या व्यक्तींना भेटण्याचा योग येईल.

कुंभ तुमचे ग्रहमान खर्चाची नांदी करणारे आहे. असे असूनही या आठवडय़ात तुमच्या प्रिय व्यक्तीच्या हट्टाला तुम्हाला बळी पडावे लागेल. व्यापार-उद्योगात बाजारातील चढ-उतारांचा फायदा घ्यायचे ठरवाल. नोकरीमध्ये तुम्हाला एखाद्या ठिकाणी बदली हवी असेल तर वरिष्ठ ती करायला तयार होतील. पण त्याच्या बदल्यात तुमच्याकडून काही अटी मान्य करून घेतील. नेहमीच्या कामात तुमचा वेग आणि कार्यक्षमता उत्तम राहील. त्यांच्याबरोबर विविध प्रकारचे आनंददायी कार्यक्रम ठरवाल.

मीन तुमची रास स्वभावाने अत्यंत उदार आणि परोपकारी आहे. या आठवडय़ात गिऱ्हाईकांना आकर्षति करण्याकरिता व्यावसायिक जागेची रंगरंगोटी आणि सजावट करण्याचे बेत तुमच्या मनात येतील. आवश्यक असणारे भांडवल उपलब्ध होईल. नोकरीमध्ये आर्थिक फायदा मिळवून देणारे एखादे अचानक असे काम तुमच्या वाटय़ाला येईल की जे तुमच्या खऱ्या आवडीचे असेल. घरामध्ये एखाद्या मंगलकार्याची मुहूर्तमेढ रोवली जाईल. पाहुण्यांना तुम्ही आगत्याने निमंत्रण द्याल.

 

भविष्य- विजय केळकर