lp06तरुण कलावंतांच्या पोटेन्शिअल या गटातर्फे या आठवडय़ात एक कृष्णधवल प्रदर्शन पार पडले. यातील चित्रे— छायाचित्रे सारी कृष्णधवल होती. त्या कृष्णधवलमधील मजा काही औरच असते. त्याकडेच रसिकांना वळविण्याचा हा एक प्रयत्न होता. यात मृत्युंजय कुमार याने टिपलेले हे छायाचित्र. यामध्ये चित्रचौकटीची एक मजा आहे. माती उकरणाऱ्या यंत्राच्या हाताची रचना पाश्र्वभूमीस ठेवून केलेले हे चित्रण विषयाच्या बाबतीत म्हणूनच वेगळे ठरते. त्यातही त्या यंत्राच्या चालकाच्या केबिनमधील तडकलेली काच या छायाचित्राला आणखी एक वास्तवाची मिती प्राप्त करून देते.
मृत्युंजय कुमार – response.lokprabha@expressindia.com