वैद्यकशास्त्रामध्ये पोटाला ‘पंडोरा बॉक्स’ असे म्हणतात. ग्रीक कथेप्रमाणे पंडोरा ही जगातली पहिली स्त्री आहे. तिला एक सुंदर जार मिळाला व तिला सांगितले की हा जार उघडू नको. तिने कुतूहलाने तो उघडला व avinashजगातली सर्व वाईट/अनपेक्षित गोष्टी त्यातून निघाल्या. पोटामध्ये अनेक अवयव असतात. एखाद्या वेळी पोटात दुखत असेल तर त्याची अनेक कारणे असतात व पंडोरासारखे त्यामध्ये काहीही अनपेक्षित निघू शकते. 

indias first hydrogen powered ferry
विश्लेषण : पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या देशातील पहिल्या बोटीचे उदघाटन, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
UK First Lady Akshata Murty visits Bengaluru book market with Narayana Murthy Video Viral
“याला म्हणतात साधेपणा!” ब्रिटीश पंतप्रधानांच्या पत्नी असूनही रस्त्यावर पुस्तक खरेदी करताना दिसल्या अक्षता मूर्ती, Video Viral
UPSC Preparation Facing the Prelims Exam
यूपीएससीची तयारी: पूर्व परीक्षेला सामोरे जाताना..

क्ष-किरणांचा शोध लागून आता १०० हून जास्त वर्षे लोटली तरी सोनोग्राफी, सिटी स्कॅन, चुंबकीय लहरी (एम.आर.आय.) व किरणोत्सर्गी परमाणू इत्यादींचा उपयोग करून रुग्णांच्या शरीरातील इंद्रियांची व त्यांच्या कार्याची सूक्ष्म व सखोल माहिती प्रतिमेच्या स्वरूपात मिळवणे या तत्त्वावर आधारलेल्या प्रतिमाशास्त्राचा आवाका खूप मोठा आहे. कुठलीही चाचणी किंवा तपासणी डॉक्टर आपल्याला सांगतात तेव्हा या चाचण्या व त्याचा खर्च यामुळे आपण घाबरून जातो. पण या चाचण्यांचा खर्च हा चुकीच्या औषधांमुळे धोका वाढल्यावर होणाऱ्या खर्चापेक्षा कमीच असतो, हे लक्षात घेतले पाहिजे.
पोटाचा एक्स-रे
हल्ली सोनोग्राफी सर्वत्र उपलब्ध झाल्याने पोटाचे एक्स-रे काढण्याचे प्रमाण घटले आहे. तरीही पोटाच्या काही अवयवात (मूत्रपिंड, मूत्राशय) खडे असल्यास किंवा आतडे अडकले असल्यास फोटो कधी कधी काढला जातो. या फोटोसाठी आदल्या दिवशी पोट साफ होण्याचे औषध घेऊन उपाशीपोटी सकाळी गेल्यास हा फोटो चांगला येतो. आतडय़ाला पीळ पडला असेल किंवा अडकले असेल तर उभा राहून फोटो काढला जातो.
बेरियम तपासण्या
अन्नमार्गाच्या आतल्या भागातील आजाराचे निदान करण्यास बेरियम तपासण्या करतात. आदल्या दिवशी जुलाबाचे औषध घेऊन पोट साफ केले जाते. दुसऱ्या दिवशी उपाशीपोटी बेरियमचे मिश्रण पिऊन अन्नमार्गाने एक्सरे काढले जातात. अन्नमार्गाच्या विविध अवयवांसाठी कमी-जास्त वेळेनंतर एक्सरे काढले जातात. त्यामध्ये अल्सर, गाठी किंवा क्षयरोग इत्यादी गोष्टींचे निदान होऊ शकते. मोठय़ा आतडय़ाच्या तपासासाठी बेरियम एनिमा दिला जातो. यामध्ये बेरियम गुदद्वारामार्फत हळूहळू मोठय़ा आतडय़ात जाते. एकदा एक्सरे काढला की यात हवा फुगवून डबल ूल्ल३१ं२३ एनिमा काढतात. त्यामुळे मोठय़ा आतडय़ातील गाठ, ढ’८स्र्, अल्सर इत्यादी आजार दिसतात.
सोनोग्राफी
गेल्या वीस वर्षांत बेरियमपेक्षा सोनोग्राफी व एण्डोस्कोपी यांचा जास्त वापर केला जातो. सोनोग्राफीमध्ये मुख्यत: यकृत, प्लीहा, पित्ताशय, मूत्रसंस्था, रक्तवाहिन्या चांगल्या दिसतात. आतडे व स्वादुपिंड हे सोनोग्राफीत स्पष्ट दिसत नाही. फुप्फुसाखाली साचलेले पाणी किंवा पोटात साठलेले थोडेसे पाणी सोनोग्राफीवर पटकन दिसून येते.
सोनोग्राफी कृष्णधवल किंवा कलरमध्ये असते. अवयवासाठी कृष्णधवल तर रक्तवाहिन्यांच्या तपासासाठी कलर डॉप्लरचा उपयोग केला जातो. पित्ताशयातील खडे, यकृतातील चरबी, गाठी, प्लीहेचे विविध आजार, किडनीस्टोन, मूत्राशयाखाली असलेली ग्रंथी (ढ१२३ं३ी) तसेच स्वादुपिंडाचे आजार या सर्वाचा सोनोग्राफीद्वारे अभ्यास करता येतो.
सी.टी.स्कॅन (पोटाचा)
गेल्या दोन दशकात नवीन तंत्र व संगणकशास्त्रातील प्रगतीमुळे पूर्ण शरीराचे सी. टी. स्कॅन होऊ लागले. सी. टी. स्कॅनमध्ये कांदा कापल्यावर जशा चकत्या होतात तशाच पोटाच्या अवयवांच्या प्रतिमा चकत्या रूपाने स्क्रीनवर दिसतात. त्यापासून आपण थ्रीडी प्रतिमाही घडवू शकतो. यामुळे अवयवांच्या आकाराबद्दल व त्यांच्यामधील आजारांचा आपल्याला अंदाज येतो. सी.टी. स्कॅनमध्ये या अवयवांचे अतिसूक्ष्म व काळ्या पांढऱ्या शेड्स (ग्रे स्केल्स) मध्ये चकत्यामध्ये प्रतिमा येतात.
सीटी स्कॅन करायला जाताना दोन-तीन तास उपाशी राहणे आवश्यक असते. बहुतांशी या तपासात कॉन्ट्रास्ट (उल्ल३१ं२३) इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे अवयवांच्या आजाराचे निदान होते. या स्कॅनमुळे मुख्यत: कॅन्सर किती पसरलेला आहे हेही समजते. अवयवात, अवयवाबाहेरील लिंफ नोड (छ८ेस्र्ँ-ल्लीि) व इतर अवयवांत तसेच आजूबाजूला रक्तवाहिन्यात कॅन्सर किती पसरला आहे याची माहिती मिळते. त्यामुळे शस्त्रक्रिया व इतर उपचारांचे नियोजन सुकर होते.
सोनोग्राफी व सी.टी.स्कॅनच्या साहाय्याने अवयवातील गाठींची बायॉप्सी घेता येते. त्यामुळे आजाराचे योग्य व अचूक निदान होऊ शकते.
एम.आर.आय.
मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग यात विद्युत चुंबकीय क्षेत्राचा वापर करून, संगणकाच्या साहाय्याने शरीराच्या विविध भागांच्या उभ्या, आडव्या, तिरक्या अशा कोणत्याही अँगल्समध्ये प्रतिमा काढून प्रतिमा विच्छेदन केले जाते. यामध्ये इंद्रिये जशी आहेत तशी हुबेहूब दिसू लागली. निदान करण्याची सूक्ष्मता सी. टी. स्कॅनपेक्षाही वाढली.
ज्या रुग्णांमध्ये धातूचे पार्ट्स असतात त्यांनी डॉक्टरांना हे आधी सांगितले पाहिजे. तसेच या तपासात लोहचुंबक (विद्युत चुंबक) वापरत असल्याने रुग्णाने मोबाइल फोन्स, पैसे (नाणी), चाव्या, पट्टा इत्यादी धातूंचे ऐवज जवळ ठेवू नयेत. पित्त नलिकेतील अचूक निदानासाठी तसेच स्वादुपिंडातील नलिका यांचा चांगला अभ्यास करण्यास एमआरसीपीही करता येते. त्यामुळे या आजाराच्या तपासामधील धोका कमी होतो.
ढएळ (पेट) स्कॅन
पेट मशीनमध्ये पॉझ्रिटॉनचा उत्सर्ग करणारे पदार्थ असतात. पेट व सी.टी.स्कॅन यांचा एकत्र उपयोग करून कॅन्सर व इतर आजार किती पसरलेले आहेत ते समजते.
पोटाची अ‍ॅन्जिओग्राफी
पोटातील रक्तवाहिन्यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी या धमन्यांमध्ये उल्ल३१ं२३ हे इंजेक्शन देऊन त्या भागाचे पटापट एक्सरे / प्रतिमा रेकॉर्ड केल्या जातात. दोन चार फेजेसमध्ये प्रतिमा रेकॉर्ड केल्यामुळे धमन्या व नीलामधील बदलांचा अंदाज येतो. कॉम्प्युटरमुळे इतर अवयवांच्या प्रतिमा वजा करून फक्त रक्तवाहिन्यांच्या प्रतिमेस डी.एस.ए.म्हणतात. यामुळे एखाद्या ठिकाणाहून होणाऱ्या रक्तस्रावाचे निदान व उपचारही होतो. शस्त्रक्रियेच्या नियोजनासही मदत होते. याशिवाय एण्डोस्कोपी विषयी पुढील भागात-